महाराष्ट्र

Nashik: महाकुंभ संपत नाही तोच सिंहस्थची तयारी सुरू

Devendra Fadnavis: भव्य-दिव्य आयोजनाचा निर्धार

Author

महाराष्ट्र सरकारने नाशिक सिंहस्थ कुंभ 2027 मध्ये ऐतिहासिक आणि अभूतपूर्व बनवण्यासाठी कंबर कसली आहे. आधुनिक तंत्रज्ञान, सुव्यवस्थित व्यवस्थापन आणि भाविकांसाठी उत्तम सुविधा देण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

महाराष्ट्र सरकारने 2027 मध्ये होणाऱ्या नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयोजनाची जोरदार तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच उच्चस्तरीय बैठक पार पडली. या ऐतिहासिक धार्मिक सोहळ्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयागराजच्या महाकुंभाच्या धर्तीवर भव्य सुविधा निर्माण करण्याचा निर्धार केला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, मुख्य सचिव सुजाता सौनिक, नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा आणि महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह 38 विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सिंहस्थ कुंभ ‘डिजिटल टेक्नॉलॉजी कुंभ’ म्हणून ओळखला जावा, यासाठी विशेष नियोजनाचे निर्देश देण्यात आले.

Bachchu Kadu: दोन आठवड्यांची मुदत, पण अध्यक्षपदावरची टांगती तलवार

कुंभसाठी विशेष कायदा

कुंभमेळ्याचे काम जलद गतीने आणि प्रभावी पद्धतीने पार पडावे, यासाठी प्रयागराजच्या धर्तीवर स्वतंत्र ‘नाशिक कुंभ कायदा’आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्तर प्रदेश सरकारप्रमाणेच कुंभ मेळ्यासाठी एक अधिनियम आणू इच्छितो,असे मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले. येत्या विधिमंडळ अधिवेशनात हा कायदा मांडण्यात येईल. मुख्यमंत्र्यांनी कुंभ आयोजनासाठी एक स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याची सूचनाही दिली आहे, जे सर्व यंत्रणांचे समन्वय साधत वेळेत कामे पूर्ण करेल. यामुळे कुंभाच्या आयोजनातील अडथळे दूर होतील आणि व्यवस्थापन अधिक सुकर होईल.

Mahayuti Politics : शिंदेंच्या नेतृत्वाखालील कारभारावर मुख्यमंत्री असमाधानी

गर्दी व्यवस्थापन

नाशिक कुंभमेळ्यासाठी देशविदेशातून 12 ते 14 कोटी भाविक येण्याची अपेक्षा असून, या प्रचंड गर्दीचे व्यवस्थापन सक्षमपणे करण्यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. रेल्वे सुविधांसाठी नाशिक रोड स्थानकावरील दोन प्लॅटफॉर्म वाढवून चार किंवा पाच करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, हवाई सेवेत सुधारणा करत शिर्डी, ओझर आणि छत्रपती संभाजी नगर विमानतळांवर अधिक विमानांची व्यवस्था करण्यात येणार आहे.

पार्किंग व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या पाच झोनऐवजी 15 झोन विकसित केले जातील. याशिवाय, नाशिक-त्र्यंबकेश्वर महामार्ग 24 मीटरने रुंद करण्याची योजना आखण्यात आली आहे, जेणेकरून वाहतूक अधिक सुलभ होईल. गोदावरी नदीच्या काठावर किनारी रस्ता आणि टेंट सिटी उभारण्याचा प्रस्ताव असून, यासाठी ड्रोन सर्वेक्षण करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या सर्व उपाययोजनांमुळे कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांना सुरक्षित आणि सोयीस्कर सुविधा मिळण्यास मदत होणार आहे.

Baramati: दादा’ विरुद्ध ‘साहेब’ – कोण गोड, कोण कडू

डिजिटल टेक्नॉलॉजी कुंभ

नाशिक कुंभमेळा केवळ धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्वाचा नसेल, तर तो ‘डिजिटल टेक्नॉलॉजी कुंभ’ म्हणूनही ओळखला जाईल. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने या भव्य सोहळ्याचे व्यवस्थापन अधिक शिस्तबद्ध आणि सुरक्षित करण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत. स्मार्ट ट्रॅफिक व्यवस्थापनासाठी विशेष उपाययोजना करण्यात येणार असून, भाविकांसाठी मोबाइल ॲप आधारित सेवा उपलब्ध करून देण्यात येईल. गर्दी नियंत्रणासाठी ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर केला जाणार असून, सुरक्षिततेवर अधिक बारीक नजर ठेवली जाईल. तसेच, ई-बस सेवा आणि पर्यावरणपूरक वाहतूक सुविधांमुळे भाविकांचा प्रवास अधिक सुलभ आणि स्वच्छ होणार आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे नाशिक कुंभमेळा एक स्मार्ट आणि सुव्यवस्थित धार्मिक उत्सव ठरणार आहे.

स्वच्छतेची हमी

सिंहस्थ कुंभमेळ्यात आरोग्य सेवा आणि स्वच्छता सर्वोच्च प्राधान्याने राबवली जाणार आहे. प्रत्येक प्रमुख घाटावर मोबाईल हॉस्पिटल आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे उभारण्यात येणार आहेत. तसेच, गोदावरी नदीच्या स्वच्छतेसाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. राज्यातील सर्वोत्तम डॉक्टर आणि मेडिकल पथके यावेळी कार्यरत राहणार असून, मोठ्या प्रमाणावर स्वच्छता कर्मचारी तैनात केले जातील.

Maharashtra Politics : शिंदेंच्या संकटांवर अमोल मिटकरींचा तडका 

सरकारचा आत्मविश्वास

भाविकांना सर्वोत्तम सुविधा मिळतील, कोणतीही अडचण येणार नाही याची हमी सरकार घेईल. नाशिक कुंभ हा केवळ आध्यात्मिक पर्व नसून, महाराष्ट्राच्या गौरवाचा एक भव्य सोहळा असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठामपणे सांगितले. मागील कुंभ सुरक्षित आणि भव्य होता, पण 2027 मध्ये कुंभ त्याहूनही भव्य आणि उत्तम करण्याचा आमचा संकल्प आहे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. महाराष्ट्र सरकारच्या सुव्यवस्थित नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि धार्मिक भावनांचा सन्मान यामुळे नाशिक सिंहस्थ कुंभ 2027 हा देशातील सर्वश्रेष्ठ कुंभमेळा ठरेल, यात शंका नाही.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!