महाराष्ट्र

Parinay Fuke : आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचे स्वप्न साकार

Gondia : भाजप आमदाराचे राजकारणातून समाजकारणाकडे पाऊल

Post View : 59

Author

गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण आणि निवासाच्या मूलभूत सुविधा मिळवून देण्यासाठी माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी केलेल्या अथक प्रयत्नांना यश.

राजकारण हे अनेकदा सत्ताकारण, पद आणि प्रसिद्धीसाठी केले जाते, असा सार्वत्रिक समज आहे. मात्र कधी कधी हेच राजकारण एखाद्या समाजाच्या उत्थानाचे साधन ठरते. हे गोंदिया जिल्ह्यातील एका महत्त्वपूर्ण घडामोडीवरून स्पष्ट होते. विदर्भातील आदिवासीबहुल गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये अनेक वर्षांपासून शिक्षण व निवासाच्या मूलभूत सुविधा अपुऱ्या आहेत. यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत होते. पण या परिस्थितीत आता बदलाची नांदी झाली आहे.

यामागे उभे राहिलेले एक राजकारणातील धुरंधर नेता म्हणजे भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके. सामाजिक बांधिलकी आणि विधायक राजकारणाची जाणीव असलेल्या डॉ. फुके यांनी केवळ ओबीसी नव्हे, तर आदिवासी आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या हितासाठी मोठे पाऊल उचलले आहे. गोंदिया जिल्ह्यातील चार शासकीय वसतिगृहे 1989 पासून भाड्याच्या इमारतींमध्ये कार्यरत आहेत. सध्या तिथे राहणाऱ्या पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांना अत्यंत निकृष्ट सुविधा मिळत आहेत. या समस्येकडे डॉ. फुके यांनी गांभीर्याने लक्ष दिले आहे.

Vijay Wadettiwar : सामाजिक न्याय विभागाच्या निधीचा गैरवापर

नव्या आशेचे किरण

डॉ. फुके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यांचा हा पुढाकार आता फळाला आला आहे. त्यांच्या पाठपुराव्यामुळे गोंदिया मौजा कुडवा येथील 1.91 हेक्टर विनावापर सरकारी जागा आदिवासी विकास विभागाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय झाला आहे. हे केवळ जागेचे हस्तांतरण नसून, हजारो आदिवासी विद्यार्थ्यांच्या भविष्यातील एक महत्त्वपूर्ण वळण आहे. येथे उभारले जाणारे आधुनिक, स्वच्छ, खेळासाठी व अभ्यासासाठी उपयुक्त अशा वसतिगृहाचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरू लागले आहे.

राजकारणाचा उपयोग केवळ मतांसाठी न होता, जर तो समाजाच्या खऱ्या गरजांसाठी वापरला गेला. तर त्याचे परिणाम किती सकारात्मक असू शकतात, याचे हे उत्तम उदाहरण डॉ. फुके यांनी साध्य केले आहे. डॉ. फुके यांचे हे कार्य जनतेच्या मनात जागा मिळवणारे आहे. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी नवा आशेचा किरण बनले आहे. ही केवळ योजना नाही, तर भविष्यातील उजळ आयुष्याची पायाभरणी आहे. महाराष्ट्रातील ओबीसी, विमुक्त जाती आणि भटक्या जमातींसंबंधीचे प्रश्न नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले आहेत.

Nitin Gadkari : केंद्रीय मंत्र्यांच्या पुढाकाराने अकोल्याच्या विकासरथाला लागली चाल

विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रगतीसाठी स्थापन झालेली महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच महाज्योती ही त्यांच्या आशेचा मजबूत आधार आहे. मात्र, आवश्यक निधीच्या अभावामुळे या संस्थेच्या विविध योजना अडथळ्यात सापडल्या होत्या. हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र डॉ. परिणय फुके यांनी या उपक्रमासाठीही महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Devendra Fadnavis : फडणवीसांच्या घोषणेनं वाढली राजकीय उत्सुकता 

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित यांनी अनेक वर्ष सकाळ माध्यम समूहासोबत रिपोर्टर म्हणून काम केलं. साम टिव्हीचे ते रिपोर्टर होते. याशिवाय सरकारनामा या सकाळ समूहाच्या राजकीय वेब पोर्टलचे प्रतिनिधी देखील होते.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!