प्रशासन

Nagpur : व्हॉट्सअॅपवरून आलेला मेसेज 21 लाखांना पडला महाग

Saoner : बनावट पोलिस अधिकाऱ्याने नागपूरकराला लुबाडले

Post View : 19

Author

नागपूरमध्ये एका व्यक्तीची 21 लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली, जिथे आरोपीने टेलिकॉम विभाग आणि मुंबई पोलिस अधिकारी असल्याचे भासवले.

नागपूर ग्रामीण भागात एक धक्कादायक ऑनलाईन फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. मुंबई पोलिस आणि टेलिकॉम विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून एका व्यक्तीला तब्बल 21 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी सावनेर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. समोर तपास सुरू आहे.

बोरगाव आदासा येथील 55 वर्षीय दिलीप धनराज धोटे यांच्याशी कोता राजशेकर नावाच्या व्यक्तीने व्हॉट्सअॅपवरून संपर्क साधला. त्याने स्वतःला टेलिकॉम विभाग आणि मुंबई पोलिसांचा अधिकारी असल्याचे सांगत धोटे यांना विश्वासात घेतले. 26 नोव्हेंबर 2024 ते 3 मार्च 2025 या कालावधीत हा प्रकार घडला.

Akola : महाराष्ट्र मंदिर-न्यास अधिवेशनाचे भव्य आयोजन

मनी लाँड्रिंगचा धक्का

कोता राजशेकर याने धोटे यांच्या आधार कार्डचा गैरवापर करून त्यांच्याच नावाने बँक खाते उघडल्याचा खोटा आरोप केला. त्यानंतर, त्याने स्वतःला मुंबई पोलिसांचा पोलीस सब-इन्स्पेक्टर हेमराज कोली असल्याचे सांगून बँक खात्यांची तपासणी करण्याच्या बहाण्याने मोठी रक्कम ट्रान्सफर करायला भाग पाडले.

धोटे यांनी 27 नोव्हेंबर 2024 रोजी राधे ट्रेडिंग कंपनीच्या खात्यात 11 लाख 9 हजार रुपये ट्रान्स्फर केले. 28 नोव्हेंबर रोजी के. आर.एस. ग्लोबल इंटरप्रायजेसच्या खात्यात 10 लाख रुपये असे एकूण 21 लाख 9 हजार रुपये ट्रान्सफर केले. काही दिवसांनंतर त्यांना फसवणुकीची जाणीव झाली आणि त्यांनी तात्काळ सावनेर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.

Nitesh Rane : राणेंच्या विधानांवर संतापाचा भडका, मोदींकडे तक्रारीचा तडका 

गुन्हेगाराचा पर्दाफाश

तपासादरम्यान उघड झाले की के. आर.एस. ग्लोबल इंटरप्रायजेसच्या खात्यात जमा झालेली 10 लाख रुपयांची रक्कम थेट आरोपी कोता राजशेकरच्या खात्यात वर्ग झाली होती. यानंतर ही संपूर्ण रक्कम जयपूर, राजस्थान येथून एटीएमच्या माध्यमातून काढण्यात आली.

सावनेर पोलिसांनी तांत्रिक तपास आणि आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेत आरोपीचा शोध घेतला आणि 25 मार्च रोजी त्याला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला 28 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिस आता या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. आरोपीच्या साथीदारांचा शोध घेत आहेत.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!