महाराष्ट्र

Nagpur : रामनवमीच्या रथावरून भाजपचे राजकीय शक्तिप्रदर्शन

NMC Election :भाजपच्या मार्गदर्शनाखाली फडणवीसांची रणनिती

Author

यंदाच्या रामनवमी उत्सवात मिरवणुकीमध्ये नागपूरमध्ये भाजपकडून जोरदार शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता आहे.

पाहता पाहता रामनवमी अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. संपूर्ण देशात हा सण भक्तिभावाने साजरा केला जातो. मात्र, नागपूरसाठी यंदाची रामनवमी काहीशा वेगळ्या रंगात रंगणार आहे. कारण केवळ धार्मिक सोहळा म्हणून नाही, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय शक्तिप्रदर्शनाचाही केंद्रबिंदू म्हणून हा उत्सव चर्चेत आहे. ज्यासाठी राजकीय पक्षांनी आपली कंबर कसली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि त्यांच्या समर्थकांकडून या सोहळ्यात भव्य सहभागाची तयारी आहे.

भाजपसाठी नागपूर हे कायमच महत्त्वाचे केंद्र राहिले आहे. विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नागपूर हे निवासस्थान आहे. यंदा नागपूरच्या धरमपेठ भागातील रामनवमी मिरवणुकीला विशेष महत्त्व आहे. कारण ती शताब्दी वर्ष साजरं करत आहे. या भागात देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थान आहे, तसेच भाजप आमदार संदीप जोशी यांचेही वास्तव्य याच परिसरात आहे. राम नगर परिसरात माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांचेही निवासस्थान आहे. त्यामुळे या भागात निघणाऱ्या मिरवणुकीला राजकीय संदर्भ अधिक गडद होताना दिसत आहे.

Nagpur : मनपाच्या तिजोरीत मोठी घट

महानगरपालिकेची निवडणूक तयारी

नागपुरातील दुसरी मोठी आणि भव्य मिरवणुक पोद्दारेश्वर राम मंदिरातून काढली जाते. ही मिरवणूक दरवर्षी मोठ्या उत्साहात पार पडते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा यात नेहमीच सक्रीय सहभाग असतो. त्यांच्या नेतृत्वाखाली ही मिरवणुक आणखी भव्य होणार आहे. त्यांच्या हस्ते पूजन केल्या जाते. यंदाही नितीन गडकरी या मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रामाच्या रथावर बसून शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहेत, तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही आपली ताकद दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत.

नागपूरमध्ये भाजपची मुळं खोलवर रुजलेली आहेत, आणि त्यामुळे या शक्तिप्रदर्शनाचा आगामी निवडणुकीवर मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. राजकीय दृष्टिकोनातून पाहता, रामनवमीच्या या दोन्ही मिरवणुकीतून भाजप आपली ताकद दाखवण्याच्या तयारीत आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मिरवणूक जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी एक प्रभावी माध्यम ठरणार आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महानगरपालिका निवडणूकीवर आता अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. यासाठी आता सगळीकडे जोरदार तयारी सुरु झाली आहे.

Chandrapur : माजी नागरसेवकाने आयुक्तांच्या गाडीवर उधळले पैसे

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!