महाराष्ट्र

Harshwardhan Sapkal : फुले चित्रपटातून सत्य लपवण्याचा प्रयत्न

Congress : भाजपसाठी बंच ऑफ थॉट्स म्हणजे बायबल

Author

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर संविधान विरोधी धोरणे राबवण्याचा आरोप करत चंद्रकांत पाटील यांना थेट सवाल केला.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुण्यात महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंतीनिमित्त फुलेवाड्यात जाऊन अभिवादन केले. यानंतर त्यांनी ईश्वरी भिसे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या दोन्ही घटनांचा संदर्भ देत सपकाळ यांनी सध्याच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर जोरदार टीका केली. त्यांनी भाजप सरकारवर आणि सेन्सॉर बोर्डावर गंभीर आरोप करत लोकशाही मूल्यांवर संकट असल्याचे मत मांडले.

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर भाष्य करताना सपकाळ म्हणाले, फुले दांपत्य ज्या सामाजिक अन्यायाविरुद्ध लढले, त्याच प्रवृत्ती आज पुन्हा एकदा डोके वर काढत आहेत. संविधानातील समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांना पायदळी तुडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ते पुढे म्हणाले की, महिला शिक्षणाला विरोध करणाऱ्या विचारसरणीला पाठिंबा देणाऱ्या लोकांकडून आजही त्याच पद्धतीने इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Prakash Ambedkar : महात्मा फुलेंच्या चित्रपटावर सेन्सॉरची कात्री

सेंसर बोर्डाची भूमिका

सेंसर बोर्डाने फुले चित्रपटातील महत्त्वाचे प्रसंग वगळण्याच्या सूचना केल्या आहेत. हे सत्य दडपण्याचा डाव आहे. भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी फुलेवाड्यावर जाऊन पूर्वी असे प्रकार होत असत, आता होत नाहीत, कारण संविधान आहे, असे विधान केले. यावर प्रत्युत्तर देताना सपकाळ म्हणाले, संविधानामुळेच आज परिस्थिती बदलली आहे, पण भाजपला संविधानातली ही मूल्ये मान्य आहेत का? भाजपसाठी बंच ऑफ थॉट्स हे बायबल आहे, आणि त्यात महिला शिक्षणाला विरोधच दर्शवला आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांनी मुलींच्या पहिल्या शाळेचा इतिहास चुकीचा सांगितल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. इतिहास साक्षी आहे की, सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी आणि अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली. मात्र, तोच इतिहास आज मोडतोड करून मांडला जात आहे, असा आरोप सपकाळ यांनी केला.महात्मा फुले यांचे योगदान मोठे आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचा शोध लावला, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

Devendra Fadnavis : नागपुरात होणार शेती, उद्योग आणि विकासाचा संगम 

इतिहासाचा अपमान

सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी पहिली शाळा सुरू करताना अनेक अपमान सहन केले. त्यांना त्रास देणारे भारतीयच होते, परदेशी नव्हते. आता मात्र, त्यांच्यावर येणाऱ्या चित्रपटातील वास्तव लपवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे ते म्हणाले. सेन्सॉर बोर्डाची भूमिका एका विशिष्ट दिशेने झुकलेली असल्याचा आरोप करत त्यांनी विचारले, सावित्रीबाई फुले यांना छळणारे कोण होते, याचा खुलासा का केला जात नाही? सत्य स्वीकारायची हिम्मत आहे का.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!