महाराष्ट्र

Wardha : चार महिन्यांचे आमदार पण कामगिरी दमदार

Vidarbha : सुमित वानखेडे यांच्या मतदारसंघात निधीचा धबधबा

Author

नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमात आर्वी मतदारसंघासाठी 720 कोटींच्या विकासकामांची घोषणा झाली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत आमदार सुमित वानखेडे आणि पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांचा समन्वय ठळकपणे दिसून आला.

वर्धा जिल्ह्यातील आर्वी मतदारसंघात विकासाचे दालन खुले झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमात आमदार सुमित वानखेडे यांनी 720 कोटी रुपयांच्या विकासकामांचे प्रास्ताविक सादर करताना भविष्यातील गरजांनुसार वाढीव निधीची अपेक्षाही मांडली. हे ऐकून अनेकांचे भुवया उंचावल्या, मात्र स्थानिक जनतेसाठी हा क्षण अभिमानाचा ठरला.

मुख्यमंत्र्यांचे विशेष विश्वासू म्हणून ओळख असलेले आमदार सुमित वानखेडे केवळ चार महिन्यांपूर्वी विधानसभेत दाखल झाले, आणि त्यांच्या प्रयत्नातून इतक्या मोठ्या प्रमाणावर निधी मिळणं, हे त्यांच्या राजकीय सूक्ष्मता आणि प्रभावी पाठपुराव्याचे द्योतक ठरले.

Bhandara NCP : पटेलांच्या नोंदणी अभियानातून फुकेंनी केले दोघं हायजॅक

सकारात्मक दृष्टिकोन

व्यासपीठावर झालेल्या हलक्या कुजबुजेकडे दुर्लक्ष करत पालकमंत्री डॉ. पंकज राजेश भोयर यांनी भाषणात आर्वीच्या विकासासाठी मिळालेल्या निधीचे जाहीर स्वागत केले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, प्रभावी आणि अभ्यासू आमदार कसा असावा, याचे उत्तम उदाहरण वानखेडे यांनी निर्माण केले आहे. त्यांच्या या विधानाने उपस्थितांमध्ये सकारात्मक ऊर्जा संचारली.

डॉ. भोयर यांनी सभागृहात आमदार समीर कुणावार यांच्या भाष्याचा उल्लेख करत अत्यंत संयम आणि सुसंवादातून ती गोष्ट हास्यविनोदात परिवर्तित केली. त्यांनी वानखेडे यांच्या 15 वर्षांच्या राजकीय प्रशिक्षणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून मिळालेल्या अनुभवाचे मोल अधोरेखित केले. त्यांच्या या सूचक आणि सुसंवादी वक्तव्याला मोठा प्रतिसाद मिळाला.

Gadchiroli Police : आत्मसमर्पित माओवादींसाठी विपश्यना शिबीर

समन्वयातून विकासाची नवदिशा

कार्यक्रमात आमदार सुमित वानखेडे यांनी डॉ. भोयर यांचा उल्लेख पालक म्हणून करत त्यांच्या मनःपूर्वक सहकार्याची साक्ष दिली. कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी राजस्थानात असतानाही डॉ. भोयर यांनी कार्यक्रमाची तयारी आणि अडचणीबाबत स्वतःहून संवाद साधला होता. त्यांच्या या सक्रियतेमुळे एक विश्वासार्ह प्रशासकीय नेतृत्व पुढे आले आहे.

वानखेडे आणि भोयर यांच्यातील समन्वय जिल्ह्याच्या राजकारणात नवे समीकरण तयार करत आहे. निधीचा पाठपुरावा, कार्यक्षम सादरीकरण आणि वक्तशीर संवाद यातून विकासाच्या नव्या शक्यता उलगडल्या जात आहेत.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!