महाराष्ट्र

Akola Congress : पराभवाच्या कटुतेतून विजय अग्रवालांची बेताल विधानं

Development Politics : भाजप नेत्यावर काँग्रेस महानगराध्यक्षाची बोचरी टीका 

Post View : 105

Author

अकोल्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. काँग्रेसने भाजपवर टीका करत विजय अग्रवाल यांना चांगलेच डिवचले आहे. काँग्रेसचे महानगराध्यक्ष डॉ. प्रशांत वानखडे पाटील यांनी अग्रवाल यांच्या विधानांवर जोरदार प्रतिउत्तर देत भाजपवर निशाणा साधला आहे.

अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात राजकीय तापमान पुन्हा एकदा वाढले आहे. भारतीय जनता पक्षाचे पराभूत उमेदवार विजय अग्रवाल यांनी अलीकडेच दिलेल्या काही विधानांवरून काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काँग्रेसचे महानगर अध्यक्ष डॉ. प्रशांत वानखडे पाटील यांनी त्यांच्यावर घणाघात केला आहे. विजय अग्रवाल यांचे वक्तव्य म्हणजे पोकळ प्रसिद्धीची धडपड आहे. जनतेने त्यांना नाकारले आहे, हेच त्यांच्या चिडचिडीतून स्पष्ट होते, असे वानखडे यांनी म्हटले आहे.

डाबकी रोडच्या रुंदीकरणाचे काम सुरू असताना आमदार साजीद खान पठाण यांनी प्रत्यक्ष पाहणी करत नागरिकांच्या तक्रारींना प्रतिसाद दिला. ही बाब लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा कर्तव्यनिष्ठ दृष्टिकोन दर्शवते. कोणत्याही विकासकामाचे निरीक्षण करणे, त्यातील त्रुटी लक्षात घेणे हे आमदार म्हणून साजीद खान पठाण यांचे कर्तव्य आहे. त्यांनी ते अत्यंत जबाबदारीने पार पाडले, असे वानखडे म्हणाले आहेत.

घणाघाती टोला

प्रशांत वानखडे यांचा आरोप आहे की, साजीद खान पठाण यांच्या कामगिरीमुळे जनतेत निर्माण झालेली लोकप्रियता विजय अग्रवाल यांच्या सहनशक्तीपलीकडे गेली असून त्यातूनच ते बेताल विधानं करत आहेत. जनतेने जे स्पष्ट मत दिले आहे, ते स्वीकारण्याऐवजी त्यांनी विरोधकांवर खोटे आरोप करून स्वतःचं अस्तित्व दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.

Akola : रस्त्याच्या गतिमान विकासासाठी आमदाराचे निर्देश 

विजय अग्रवाल यांनी साजीद खान पठाण यांच्यावर डाबकी रोडच्या निधीबाबत गैरसमज पसरवण्याचा आरोप केला. मात्र, साजीद खान यांनी कधीही असे विधान केलेले नाही. त्यांनी कुठल्याही विकासकामावर व्यक्तिगत श्रेय घेण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांच्या दृष्टीने लोकसेवा हाच खरा हेतू आहे, असा दावा करत काँग्रेसने विजय अग्रवाल यांना डिवचले आहे.

आरोपांमागे नकाराची खंत

विजय अग्रवाल यांच्यावर टीका करताना वानखडे म्हणाले की, पराभवाच्या मानसिकतेतून त्यांनी बेताल विधानं केली आहेत. हे विधान म्हणजे केवळ वैयक्तिक द्वेष आणि राजकीय अपयश झाकण्यासाठीचा प्रयत्न आहे. पण जनता आता सुज्ञ आहे. जनतेच्या निर्णयाचा आदर न करता विरोधकांवर कीचडफेक करणं ही भाजपाची जुनाट पद्धत आहे.

आमदार पठाण हे केवळ लोकप्रियच नाहीत तर कार्यक्षमतेनेही सिद्ध झाले आहेत. त्यांच्या कार्यशैलीमुळे पश्चिम अकोल्यातील जनतेच्या समस्या कमी होऊ लागल्या आहेत. काँग्रेसचा विश्वास आहे की, “सज्जनता, जबाबदारी आणि सेवा हेच पठाण यांच्या यशाचे रहस्य आहे. या वादातून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे. अकोल्यातील राजकारणात द्वेषाची झलक वाढत आहे. काँग्रेसने आवाहन केलं की, विरोधकांनी विकासाच्या मुद्यांवर बोलावं, व्यक्तिगत टिका न करता विचारांची लढाई लढावी.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!