पूर्व विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाले नवे पाठबळ. खासदार प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी केली घरवापसी.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. प्रत्येक पक्षांनी आपापल्या तऱ्हेने निवडणूक तयारीला जोर दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर प्रभाग रचना आणि वॉर्ड क्रमांक निश्चितीच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. या तयारीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रवेश आणि घरवापसीचा सत्रसुद्धा तितकाच वेगाने सुरू आहे. पूर्व विदर्भात महायुती सरकारची सत्ता सध्या बळकट आहे. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार प्रफुल पटेल यांच्या नेतृत्त्वाखाली पक्षाची नव्याने संघटना आणि बळकटपणा दिसून येतो आहे.
गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील लाखेगाव, बोपेसर, बिरसीसह अनेक गावांतील असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी केली आहे. हा मोठा सोहळा खासदार प्रफुल पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. विकासवादी भूमिका आणि पक्षाच्या धोरणांवर विश्वास ठेवून या कार्यकर्त्यांनी पुन्हा पक्षात प्रवेश केला आहे. गोंदिया येथील प्रफुल पटेल यांच्या जनसंपर्क कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते पक्षाचा दुपट्टा घालून औपचारिक स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रेमकुमार रहांगडाले आणि पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
Devendra Fadnavis : खेळाडूंचा ट्रॅक गोल्डन रनवे बनविण्यास सरकार सज्ज
नेतृत्वावर कार्यकर्त्यांचा विश्वास
तिरोडा तालुक्यातील नरेश जुनेवार, भास्कर जुनेवार, अंकित गोखले, रामेश्वर खोब्रागडे, अजयवंता पाटिल, सुनीता कोहडे, प्रीती चौरे, भूमेश्वरी खोब्रागडे, दिलीप बिंझाडे यांसह अनेक नामवंत कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून पक्षाला नव्या उमेदीने बळ दिले आहे. घरवापसी करताना कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले की, राष्ट्रवादी काँग्रेसचा विकासाचा दृष्टिकोन आणि प्रफुल पटेल यांचे दूरदर्शी नेतृत्व हेच आम्हाला पुन्हा पक्षात येण्यामागील मुख्य कारण आहे. यामुळे तिरोडा तालुक्यात पक्ष संघटन अधिक सशक्त होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पक्षप्रवेशामुळे येथील राजकीय वातावरणात नवीन ऊर्जा निर्माण होणार आहे.
कार्यक्रमात राजेंद्र जैन, प्रेमकुमार राहंगडाले, राजलक्ष्मी तुरकर, देवेंद्रनाथ चौबे, योगेंद्र भगत, केतन तुरकर, जगदीश बावनथड़े, नानू मुदलियार, संदीप मेश्राम, बाड़ा हलमारे, राजकुमार ठाकरे, राजेश तुरकर, श्याम शरणागत, खिलेंद्र चौधरी, टेकलाल सोनवाने, देवेन्द्र चौधरी यांसारखे पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या घरवापसीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीचा पूर्व विदर्भातील पाया अधिक बळकट होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. प्रफुल पटेल यांचे प्रभावी नेतृत्व, स्पष्ट धोरणे आणि पक्षासाठी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न यामुळे पूर्व विदर्भातील पक्षात पुनरुज्जीवन झाले आहे.
Nagpur : सर्कल रचनेतील बदलांमुळे नेत्यांमध्ये नाराजीचे वातावरण
आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला महत्त्वाचा वाटा मिळण्याची शक्यता आहे. तिरोडा तालुक्याच्या या नव्या प्रवासात प्रफुल पटेल यांचे नेतृत्व कसे दिशा दाखवते याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.