महाराष्ट्र

Maharashtra : यंदाच्या महापालिकेची माखनमय हंडी फोडणार कोण?

Devendra Fadnavis : भाजपचा 'गोविंदा'च रचणार यशाचा मनोरा

Post View : 64

Author

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेत परिवर्तन अटळ असल्याचा ठोक संदेश देत उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

महाराष्ट्राच्या मातीत सध्या श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह बहरलाय. त्यासोबतच राजकारणाचा रंगरंगोटीही रंगताना दिसतोय. ‘गोविंदा रे गोपाला’चा गजर आणि ‘गो गो गोविंदा’चा उत्साह सर्वत्र पसरलाय. जणू काही संपूर्ण राज्य वृंदावन झालंय. दहीहंडीच्या थरांप्रमाणे राजकीय पक्षही निवडणुकीच्या मैदानात उंच उंच मनोरे रचण्याच्या तयारीला लागलेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सहा वर्षांनी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रत्येक पक्षाने कंबर कसली आहे. या सगळ्या धामधुमीत श्रीकृष्ण जन्माष्टमीचा रंग उधळताना, राजकारण आणि उत्सवाचा अनोखा संगम पहायला मिळतोय. 

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्सव थाटामाटात साजरा होतोय. उंचच उंच मनोरे, सेलिब्रिटींच्या नृत्याने सजलेली मैफिल आणि गोविंदांच्या जोशाने भरलेली मंडळी, यामुळे सध्या सोशल मीडियावरही दहीहंडीचा बोलबाला आहे. श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाच्या या पवित्र क्षणी, राजकीय पक्षांनीही या उत्सवाला आपला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केलाय. शिवसेना, मनसे आणि भाजप यांनी दहीहंडीच्या उत्सवात आपला सहभाग दणक्यात नोंदवला आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत 10 ते 15 दहीहंडी उत्सवांना भेट देण्याचा मानस व्यक्त केलाय. वरळीतील परिवर्तन दहीहंडीपासून त्यांनी या उत्सवाला सुरुवात केली. जिथे गोविंदांच्या छावा मनोऱ्याचे कौतुक करत त्यांनी हंडी फोडली.

Amravati : पहलगाम हल्ल्यानंतर उफाळले बांगलादेशी स्थलांतरितांचे वारे

लोणी वाटणार जनतेत

वरळीपासून घाटकोपरपर्यंत, मुख्यमंत्री फडणवीस यांनी दहीहंडीच्या मंचावरून राजकीय रणशिंग फुंकले. घाटकोपर पश्चिम येथील आमदार राम कदम यांच्या दहीहंडी उत्सवात त्यांनी शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. यंदा मुंबई महापालिकेत परिवर्तन अटळ आहे. ‘पापाची हंडी आम्ही फोडली आहे, आता विकासाची हंडी लावली जाईल. त्यातील लोणी सर्वसामान्यांना वाटले जाईल,’ असं म्हणत त्यांनी उपस्थितांना विचार करायला भाग पाडले. आत्तापर्यंत महापालिकेचे लोणी कुठे गेले, हे तुम्हाला माहीत आहे, असा टोला लगावत त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले. या विधानाने राजकीय वातावरणात एकच खळबळ उडाली, जणू श्रीकृष्णाच्या माखनचोरीच्या खटपटीला राजकीय रंग चढला.

मुंबईच्या रस्त्यांवर रात्रीपासून पावसाने हजेरी लावली असली, तरी गोविंदांचा उत्साह पावसापेक्षाही मोठा आहे. असं मुख्यमंत्री म्हणाले. श्रीकृष्णाच्या कृपेने पावसाचा अडथळा गोविंदांच्या जोशापुढे फिका पडला. घाटकोपर येथील मनसेच्या दहीहंडी उत्सवात जय जवान गोविंदा पथकाने 10 थरांचा विक्रमी मनोरा रचला. ठाण्यातील प्रो. गोविंदा स्पर्धेतून बाद झालेल्या या पथकाने आजच्या दिवशी आपली किमया दाखवत सर्वांचे मन जिंकले. ठाण्यात राजन विचारे यांच्या निष्ठेच्या दहीहंडीनेही उपस्थितांचे लक्ष वेधले. या सगळ्या उत्साहात, श्रीकृष्ण जन्माष्टमीने महाराष्ट्राला एका वेगळ्याच रंगात रंगवले आहे. राजकारण, उत्सव आणि गोविंदांचा जोश यांचा हा अनोखा मेळ पाहताना, जणू श्रीकृष्ण स्वतः यमुनेच्या काठी नाचत असल्याचा भास होतो.

NCP : काका पुतण्याची जुगलबंदी रंगली, राजकीय मंचावर धमाल मचली

निवडणुकीच्या रणधुमाळीतही, दहीहंडीच्या या उत्सवाने सर्वांना एकत्र आणले आहे. विकासाच्या हंडीची लोणी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. आता प्रश्न हा आहे, की या राजकीय दहीहंडीत कोणता गोविंदा सर्वात उंच मनोरा रचणार?

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर यांनी नागपुरातील धनवटे नॅशनल कॉलेजमधून पत्रकारिता व जनसंज्ञापन विषयात पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. 2023-24 मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी द लोकहित लाइव्ह येथे आपल्या करीअरला सुरुवात केली.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!