प्रशासन

Maharashtra : चार तडफदार अधिकाऱ्यांना नवीन पदाचा डबल भार

Administrative Reshuffle : महाराष्ट्राच्या कारागृह विभागात नवे नेतृत्व

Post View : 72

Author

महाराष्ट्राच्या कारागृह प्रशासनात चार वरिष्ठ अधिकाऱ्यांना उप महानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार देऊन विभागीय सुधारणा आणि कार्यक्षमता वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

महाराष्ट्राच्या प्रशासकीय यंत्रणेत सध्या बदलांचे वारे जोरात वाहत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, नव्या नियुक्त्या आणि एकाच व्यक्तीकडे अनेक पदांचा कार्यभार यामुळे प्रशासनात सातत्याने हालचाल दिसून येत आहे. आता पुन्हा एकदा कारागृह प्रशासनात नवसंजनानी निर्माण करणारा महत्त्वपूर्ण शासन आदेश नुकताच समोर आला आहे. गृह विभागाने 29 मे 2025, 14 जुलै 2025 आणि 6 ऑगस्ट 2025 रोजीच्या आदेशांसह, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य यांच्या 7 ऑगस्ट 2025 पत्राला अनुसरून, कारागृह उप महानिरीक्षक या संवर्गातील रिक्त पदांवर चार ज्येष्ठ अधिकाऱ्यांना अतिरिक्त कार्यभार सोपवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय कारागृह प्रशासनाला नवे बळ देणारा ठरेल, अशी अपेक्षा आहे.

अनुभवी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला गतिमान आणि कार्यक्षम बनवण्याचा हा प्रयत्न आहे. या बदलांमुळे कारागृह सुधारसेवा अधिक प्रभावी होईल आणि रिक्त पदांचा प्रश्न तात्पुरता का होईना, सुटेल. प्रत्येक विभागात अनुभवी नेतृत्व मिळाल्याने सुधारणा आणि पारदर्शकतेला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. या शासन आदेशानुसार, चार वरिष्ठ अधिकाऱ्यांना अतिरिक्त जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. ज्यामुळे प्रत्येक विभागाला नवे आयाम मिळण्याची शक्यता आहे. योगेश दत्तात्रय देसाई, विशेष कारागृह महानिरीक्षक, पुणे, यांना दक्षिण विभाग, मुंबई येथील कारागृह उप महानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार मिळाला आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा आता मुंबईच्या कारागृह प्रशासनाला मिळणार आहे. त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली दक्षिण विभागातील कारागृहांना नवे चैतन्य मिळेल, अशी आशा आहे. 

Political Drama : ट्विट डिलिट, माफी मागितली, तरीही संजय कुमार अडचणीतच

नागपूर प्रशासनाला नवी दिशा

वैभव आगे, अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह, नागपूर, यांना पूर्व विभाग, नागपूर येथील कारागृह उप महानिरीक्षक पदाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. नागपूरच्या कारागृह प्रशासनाला त्यांच्या तडफदार नेतृत्वाची नवी दिशा मिळणार आहे. त्यांचा अनुभव आणि कार्यपद्धती पूर्व विभागातील आव्हानांना तोंड देण्यासाठी महत्त्वाची ठरेल. नितीन वायचळ, प्राचार्य, दौलतराव जाधव तुरुंगाधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय, पुणे, यांना मध्य विभाग, छत्रपती संभाजीनगर येथील कारागृह उप महानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. प्रशिक्षण क्षेत्रातील त्यांचे कौशल्य आणि प्रशासकीय अनुभव मध्य विभागाला बळकटी देण्यासाठी उपयुक्त ठरेल. त्यांच्या नेतृत्वाखाली मध्य विभागातील कारागृह प्रशासन अधिक सक्षम होईल, अशी अपेक्षा आहे. 

सुनिल ढमाळ, अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह, येरवडा, यांना पश्चिम विभाग, पुणे येथील कारागृह उप महानिरीक्षक पदाची अतिरिक्त जबाबदारी मिळाली आहे. येरवड्या सारख्या महत्त्वाच्या कारागृहातील त्यांचा अनुभव पश्चिम विभागाला नव्या उंचीवर नेण्यासाठी महत्त्वाचा ठरेल. त्यांच्या कार्यकुशलतेमुळे पश्चिम विभागातील कारागृह प्रशासनाला नवी गती मिळेल.हा बदल तात्पुरता असला तरी पुढील शासन आदेश येईपर्यंत कायम राहणार आहे. या नेमणुकींमुळे कारागृह प्रशासनातील रिक्त पदांचा प्रश्न सुटण्यास मदत होईल आणि विभागीय स्तरावर कार्यक्षमता वाढेल. या चारही अधिकाऱ्यांचा अनुभव आणि नेतृत्वगुण कारागृह सुधारसेवांना अधिक प्रभावी बनवतील, असा विश्वास गृह विभागाला आहे. नागरिकांमध्येही या बदलांचे स्वागत होत आहे. कारागृह प्रशासनात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या कारागृह प्रशासनाला एक नवी दिशा मिळेल. अनुभवी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली कारागृह सुधारसेवा अधिक गतिमान आणि प्रभावी होण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकले गेले आहे.

Government recruitment : राज्यातील सिंघम मित्रांनो, पोलीस भरतीसाठी सज्ज व्हा

आभा चव्हाण | Abha Chavhan

आभा चव्हाण | Abha Chavhan

आभा चव्हाण् यांनी आपल्या पत्रकारितेची सुरुवात द लोकहित लाइव्हपासून केली. त्यांना ऑनलाइन मीडिया आणि तंत्रज्ञानाचे सखोल ज्ञान आहे.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!