प्रशासन

IPS Archit Chandak : बलात्काराच्या राक्षसाला खाकीच्या तावडीत आणणार

Akola Crime : अत्याचाराच्या काळ्या सावटावर न्यायाचा प्रहार

Post View : 98

Author

महाराष्ट्रातील अनंत चतुर्दशीच्या दिवशी सर्वत्र गणेश विसर्जनाचा भक्तिमय आनंद रंगत असताना, अकोल्यात एका गुन्हेगाराने या आनंदमय प्रसंगाला काळा डाग लावला आहे.

महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला होता. ढोल-ताशांचा गजर, टाळ-मृदंगाचा नाद आणि बाप्पाच्या भक्तीत रंगलेलं वातावरण यामुळे संपूर्ण महाराष्ट्र आनंदात न्हाऊन निघाला होता. रस्त्यांवर भक्तांचा उत्साह, मिरवणुका आणि गणपती बाप्पाच्या जयघोषाने सर्वत्र उत्सवी माहोल होता. पण या आनंदाच्या लाटेत अकोला शहरात एका भयंकर घटनेने सगळ्यांना हादरवून सोडले. जिथे भक्ती आणि उत्साह यांचा संगम होता, तिथेच एका काळ्या डागाने सर्वांचे मन सुन्न केले. शनिवार, 6 सप्टेंबर 2025, दुपारचे साडेचार वाजले असतील.

अकोल्यातील डाबकी रोड परिसरात गणेश विसर्जनाच्या तयारीने सर्वजण व्यस्त होते. घराघरातून नातेवाईक मिरवणुकीसाठी बाहेर पडले होते. याच वेळी एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या आयुष्यातील सर्वात भयंकर क्षण येऊन ठेपला. तिचं कुटुंब विसर्जनासाठी बाहेर गेले असताना, तौहिद समीर बैद नावाच्या व्यक्तीने तिच्या घरात घुसून चाकूचा धाक दाखवत तिच्यावर बलात्कार केला. ही घटना इतकी भयावह होती की, अकोला शहरात एकच खळबळ उडाली. या घटनेने संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली. आरोपी विरुद्ध अनेक स्वरूपाचे गुन्हेही पोलीस तपासामध्ये उघडकीला आले आहे.

Maharashtra Politics : वाद घालून दादा ठरले ‘व्हिलन’ अंजना झाल्या ‘लेडी सिंघम’

पीडितेला तात्काळ न्याय

परंतु याच वेळी अकोल्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी या प्रकरणाला आपल्या हातात घेतले. चांडक यांचा रुद्रावतार पाहून गुन्हेगारांचे धाबे दणाणले. त्यांनी तातडीने डाबकी रोड पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आणि स्वतः या प्रकरणाच्या तपासावर लक्ष ठेवले. या भयंकर घटनेत आरोपी तौहिद समीर बैद याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने चाकूचा धाक दाखवून हे अमानुष कृत्य केले. या प्रकरणाचा तपास आता वेगाने सुरू आहे. चांडक यांनी स्पष्ट केले की, अशा गुन्हेगारांना सोडणार नाही. खाकीचा झटका त्यांना लवकरच बसेल. त्यांच्या या संकल्पामुळे अकोला पोलिसांनी तपासाला गती दिली आहे.

संपूर्ण घटनेने अकोल्यात तणाव निर्माण झाला असला, तरी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या नेतृत्वाखाली लोकांचा विश्वास दृढ झाला आहे. त्यांनी केवळ तपासच तीव्र केला नाही, तर पीडितेला तात्काळ न्याय मिळवून देण्यासाठी कठोर पावलं उचलली आहेत. डाबकी रोड पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या या घटनेने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. चांडक यांचा हा स्ट्रेट ॲक्शनचा पवित्रा आणि त्यांचा गुन्हेगारांना धडा शिकवण्याचा निर्धार यामुळे अकोल्यात पुन्हा एकदा न्यायाची ज्योत तेवत आहे. गणेशोत्सवाच्या पवित्र वातावरणात घडलेली ही घटना प्रत्येकाच्या मनाला चटका लावणारी आहे. पण अर्चित चंडक यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यामुळे अकोल्यातील जनता आता निर्भय होत आहे.

Devendra Fadnavis : महाज्योतीतून ओबीसींसाठी नवे संधीचे पर्व सुरू

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!