महाराष्ट्र

निवडणुकीच्या मुद्द्यावरून वाघमारे Raju Karemore यांना धरायला लावणार चरण 

उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर Charan Waghmare आक्रमक 

Post View : 29

Author

विधानसभा निवडणुकीनंतर अनेकांनी न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. भंडाऱ्यातील माजी आमदार चरण वाघमारे यांचाही यात समावेश आहे.

राज्यामध्ये सध्या विधानसभा निवडणूक हा एकच मुद्दा गाजत आहे. निवडणुकीच्या निकालामध्ये महायुतीला बहुमत मिळाले आहे. महायुतीचे बहुमत आणि आपला पराभव अद्यापही महाविकास आघाडीने स्वीकारलेला नाही. त्यामुळे निवडणुकीमध्ये गैरप्रकार झाल्याच्या अनेक तक्रारी अद्यापही दाखल होत आहेत. आता तर पराभूत झालेल्या अनेक उमेदवारांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. निवडणूक प्रक्रियेच्या विरोधात याचिका दाखल करणाऱ्यांमध्ये माजी आमदार चरण वाघमारे यांचाही समावेश आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कारेमोरे यांच्या विजयाला आव्हान देणारी याचिका चरण वाघमारे यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. ही याचिका लढवण्यासाठी वाघमारे यांनी वकिलांची मोठी फौज तैनात केली आहे. कारेमोरे यांच्या विरोधात निवडणूक संदर्भातील अनेक गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांचा संदर्भ घेत वाघमारे यांनी याचिकेमध्ये अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यामुळे कायदेशीर आयुधांचा वापर करीत वाघमारे यांना ‘चरण’ धरायला लावणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हेलिकॉप्टरनं उड्डाण घेत मुख्यमंत्री Nana Patole यांच्या घरी

प्रशासनावर आरोप 

माजी आमदार चरण वाघमारे यांनी निवडणूक प्रक्रियेवर संशय व्यक्त केला आहे. निकाल लागल्यानंतर त्यांनी व्हीव्हीपॅट मधील मोजणीसाठी अर्ज केला होता. फेर मोजणीसाठी लागणारी रक्कम देखील वाघमारे यांनी भरली होती. मात्र त्यांना योग्य प्रतिसाद मिळाला नाही. काही केंद्रावरील व्हिडीओ फुटेज देखील माजी आमदार वाघमारे यांनी मागितले होते. मात्र प्रशासकीय यंत्रणेकडून त्यांना हे फुटेज देण्यात आले नाही. त्यामुळे एकूणच निवडणूक प्रक्रियेवरील त्यांचा संशय बळावला. प्रशासकीय यंत्रणा दाद देत नसल्यामुळे अखेर वाघमारे यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.

अलीकडेच भारत राष्ट्र समितीमधून शरण वाघमारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात आले. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगला होता. निवडणुकीच्या काळामध्ये राजू कारेमोरे यांनी आरोग्य शिबिर आणि महाप्रसाद वितरण केले. आचारसंहिता भंग केल्याच्या अनेक तक्रारी देखील चरण वाघमारे यांनी दाखल केल्या होत्या. परंतु निवडणूक विभागाकडून वाघमारे यांचे नाव उघड करण्यात आले. त्यामुळे न्यायालयाचा दरवाजा ठोठावत वाघमारे यांनी अधिकाऱ्यांनाही पाया पडायला लावेल, असा चंग बांधलेला दिसत आहे.

चरण वाघमारे यांनी न्यायालयाच्या दरवाजात पाऊल ठेवल्याने प्रशासकीय यंत्रणेला देखील आता भीती वाटत आहे. न्यायालयामध्ये वकिलांचा युक्तिवाद सुरू झाल्यानंतर आपल्यावर एखादे संकट तर ओढववणार नाही ना? अशी चिंता आता अनेक अधिकाऱ्यांना सतावत आहे. दोन नेत्यांमधील राजकीय स्पर्धेचा हा वाद आता न्याय मंदिरापर्यंत पोहोचला आहे. ही याचिका निकाली काढताना कोर्टाकडून कोणाला दणका बसणार, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित यांनी अनेक वर्ष सकाळ माध्यम समूहासोबत रिपोर्टर म्हणून काम केलं. साम टिव्हीचे ते रिपोर्टर होते. याशिवाय सरकारनामा या सकाळ समूहाच्या राजकीय वेब पोर्टलचे प्रतिनिधी देखील होते.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!