महाराष्ट्र

महाराष्ट्रात आता Tourism Police नेमणार

मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची घोषणा

Author

राज्यातील पर्यटकांच्या सोयी-सुविधा व सुरक्षेसाठी सरकारनं महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता पर्यटन पोलिसांची नेमणूक करण्यात येणार आहे. 

महाराष्ट्रातील पर्यटन व्यवसायाला सरकारकडून चालना देण्यात येत आहे. यासोबतच आता पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी खास पोलिस नेमण्यात येणार आहेत. या पोलिसांना ‘टुरिजम पोलिस’ असं नाव देण्यात येणार आहे. नाशिक येथील राम-काल पथ विकास, सिंधुदुर्ग (मालवण) येथील समुद्रातील पर्यटन हे प्रकल्प वॉर रूमशी जोडण्यात येणार आहेत. याशिवाय राज्य लोकसेवा हक्क कायद्याअंतर्गत पर्यटन विभागाच्या 14 सेवा आपले सरकार संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे पर्यटन विभागाने करायच्या कामकाजाचा आढावा मुख्यमंत्री फडणीस यांनी घेतला.

पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मुख्य सचिव सुजाता सौनिक, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज सूर्यवंशी आदी अधिकारी यावेही उपस्थित होते. पुण्यातील आंबेगाव येथील पुरंदर शिवसृष्टी ऐतिहासिक थीम पार्कबाबत मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकासाची माहिती त्यांनी घेतली. अजंठा वेरूळ येथे पर्यटन विकासाची कामं सुरू करण्याचे आदेशही त्यांनी दिले. अहिल्यानगर येथे किल्ल्यावरील पर्यटक आकर्षणासाठी उपक्रम राबविण्याची सूचनाही त्यांनी केली.

मंत्र्यांच्या कामांबाबत Devendra Fadnavis झालेत कठोर

विकासाचे Project पूर्ण होणार

पालघर येथील आदिवासी विकास पर्यटनाला चालना देण्यात येणार आहे. शिवसृष्टी थीम पार्क राज्यातील पाच ठिकाणी उभारण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिली. पंढरपूर येथे सभा मंडप स्कायवॉकसाठी सल्लागार नेमण्यात येणार आहे. ही सर्व कामं तत्काळ सुरू करण्यात यावी, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पर्यटन विभागाला 31 मार्चपूर्वी उद्योग प्रमाणपत्र सुरू करावे असं फडणवीस यांनी सांगितलं आहे. याशिवाय कृषी पर्यटन युनिट नोंदणी प्रमाणपत्र, साहसी पर्यटन युनिट नोंदणी प्रमाणपत्र, कॅरव्हॅन पर्यटन नोंदणी प्रमाणपत्र, आई महिला उद्योजकता विकास कार्यक्रमाअंतर्गत नोंदणी, पर्यटन व्हिलाची नोंदणी देखील सुरू होणार आहे. पर्यटन अपार्टमेंटचे नोंदणी प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. ‘होम स्टे’ संदर्भातील नोंदणी प्रमाणपत्र, व्यवसायिक गृहाची पर्यटन नोंदणी प्रमाणपत्र या नवीन सेवा सुरू होणार आहेत.

राज्यातील पर्यटन आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे असंही मुख्यमंत्री म्हणाले. पर्यटन विकासासाठी मूलभूत सोयी सुविधा निर्माण करण्याची सूचनाही यावेळी देण्यात आली. कामकाजासाठी ई-ऑफिस प्रणालीचा वापर वाढविण्यात येणार आहे. पर्यटन विभागाची वेबसाइट देखील अद्ययावत होणार आहे. ‘एआय’च्या मदतीनं पर्यटन विभागातील उपक्रम यापुढं राबविण्यात येणार आहेत.

Madhya Pradesh प्रमाणे काम

मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रातील स्मारकांना अधिसूचित करण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात मत्स्यालय, धार्मिक स्थळं, विमानतळ येथेही कामं होणार आहे. पहिल्या टप्प्यात शिर्डी, पुणे, नागपूर, शेगाव येथे काम सुरू होणार आहे. गोराई आणि मनोरी येथे थीम पार्क विकसित करण्यात येणार आहे. याशिवाय राज्यात विंटेज कार संग्रहालयं विकसित करण्यात येणार आहे. मार्कडा, लोणार येथे टेंट सिटी देखील विकसित करण्यात येणार आहे. मार्कंडा, लोणार व कळसूबाई येथे फिरते तंबू शहर विकसित करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. कोकण किनारट्टीवरील तारकर्ली आणि काशिद बीचवर ‘ब्ल्यू बी’च मोहीम राबविली जाणार आहे. समुद्र किनाऱ्यावर वाळू कला प्रशिक्षण आणि पाहण्याची सुविधा निर्माण करण्यासाठी नामवंत कलाकार सुदर्शन पटनायक यांच्यासारख्या कलाकारांचे सहकार्य देखील घेण्याची सूचना यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!