महाराष्ट्र

बीड पॅटर्न भ्रष्टाचाराच्या चौकशीची Vijay Wadettiwar यांची मागणी

एक रुपयात Insurance देण्याच्या मुद्द्यावर केली टीका

Post View : 20

Author

राज्यातील शेतकऱ्यांना एक रुपयात विमा देण्यात येत आहे. यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. यावर आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे.

शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पीक विमा योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत आहे. त्यामुळं एक रुपयात पीक विमा देण्याची योजना बंद करावी अशी शिफारस करण्यात आली आहे. कृषी मंत्री असताना धनंजय मुंडे यांच्या खात्यात हा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. यावरून काँग्रेसनं आता महायुती सरकारला घेरलं आहे. विधान सभेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी यावरून सरकारवर टीका केली आहे. कृषी खात्यात भ्रष्टाचाराचा हा बीड पॅटर्न झाला आहे. धनंजय मुंडे कृषिमंत्री असताना त्यांनी घेतलेल्या निर्णयाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. महायुती सरकारने एक रुपयात पीक विमा ही योजना आणली होती. ही योजना आपल्या मित्रांना फायदा देणारी होती, असं वडेट्टीवार म्हणाले.

सरकारनं एक रुपयात विम्याची योजना आणली. त्यातून आपली पाठ थोपटून घेतली. मात्र आता गुंडगिरीनंतर बीडचा भ्रष्टाचारी पॅटर्न पुढं आल्याची टीका केली जात आहे. या योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. यासाठी कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीनं राज्य सरकारला ही योजना बंद करण्याची शिफारस केली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या नावावर लुटमार करण्यात आल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली. योजनेत शेतकऱ्यांच्या नावे बोगस अर्ज केल्याची प्रकरण समोर आल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

यंदाच्या 25 जानेवारीला congress करणार आंदोलन

न्याय मागायचा कुठे?

शेतकऱ्यांच्या नावे बोगस अर्ज कोणी केले याचा शोध घेण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे. 2024 मधील खरीप हंगामात एकूण चार लाख अर्ज बोगस असल्याचं पुढं आलं आहे. त्यातील एक लाख अर्ज एकट्या बीड जिल्ह्यातील असल्याचं सांगण्यात येत आहे. परिणामी कृषी विभागातील भ्रष्टाचार खास बीड पॅटर्न असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली. कृषिमंत्री असताना धनंजय मुंडे यांनी कृषी साहित्य खरेदीची पद्धत बदलली होती. याबाबत उच्च न्यायालयानं प्रश्न उपस्थित केला आहे. बीडमध्ये सरपंचाची हत्याही झाली. या प्रकरणानंतर सबसिडीच्या नावाखाली पैसे उकळण्याचा आरोप देखील वाल्मीक कराडवर झाला. बारामती येथील ऊस तोडणी हार्वेस्ट चालकांकडून ही रक्कम उकळण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. कराड हे मुंडे यांचे नीकटवर्तीय असल्याचं वडेट्टीवार यांनी नमूद केलं.

धनंजय मुंडे कृषीमंत्री असताना त्यांनी घेतलेल्या सर्व निर्णयांची चौकशी झाली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी यासाठी समिती नेमावी. या संपूर्ण प्रकरणात त्यांनी लक्ष घालावं, अशी मागणी देखील वडेट्टीवार यांनी केली. एक रुपया पीक विमा प्रकरणात आता बोगस अर्जावरून शेतकऱ्यांना शिक्षा देऊ नये. एखाद्या मंत्र्याच्या पाठबळाशिवाय भ्रष्टाचार होऊ शकत नाही, असंही वडेट्टीवार म्हणाले. त्यामुळं मुंडे यांच्या कर्माची शिक्षा शेतकऱ्यांना होता कामा नये, अशी मागणी देखील विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!