महाराष्ट्र

दोन मंत्री बनले Ramtek महोत्सवाचे साक्षीदार

तरुणाईला आदित्यचे धमाकेदार सरप्राइज

Post View : 21

Author

रामटेक पर्यटन आणि सांस्कृतिक महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी गाण्यांनी सजलेल्या एका अविस्मरणीय संगीतसंध्येचा आनंद प्रेक्षकांनी लुटला. राज्यातील दोन मंत्री या सोहळ्याचे साक्षीदार ठरले. 

पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार विजेते उदित नारायण आणि त्यांचा मुलगा आदित्य नारायण यांनी आपल्या सुरेल गाण्यांनी रामटेकमध्ये उपस्थिताना वेड लावले. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह या महोत्सवाने प्रेक्षकांची मने जिंकली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी या कार्यक्रमाला पूर्णवेळ हजेरी लावली.

‘बडे मियां तो बडे मियां छोटे मियां सुभान अल्ला’ या संवादाने आदित्य नारायण यांनी आपल्या वडिलांना आदरपूर्वक मंचावर आमंत्रित केले. बाप-लेकाच्या जोडीने ‘पापा कहते हैं’ हे हिट गाणे सादर करत रसिकांना मंत्रमुग्ध केले. उदित नारायण यांनी आपल्या लोकप्रिय ‘आना ही पडा सजना’, ‘वादा रहा सनम’, ‘रामजी की चाल देखो’ या जुन्या गाण्यांनी प्रेक्षकांना नव्वदच्या दशकातील आठवणींमध्ये रमवले. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे देखील या गाण्यांमध्ये रमलेले दिसले.

नवीन जिल्ह्यांबाबत Chandrashekhar Bawankule यांनी फायनलच सांगितलं

जुन्या आठवणी जात्या

आदित्य नारायणच्या उर्जेने आणि उत्साहाने तरुणाईला आपल्या तालावर थिरकायला लावले. त्याने ‘शायद कभी न कह सकूं’, ‘केसरिया तेरा इश्क है पिया’ यांसारखी सद्यकाळातील लोकप्रिय गाणी सादर करत संपूर्ण सभागृहाला चैतन्यमय केले. त्याच्या एनर्जेटिक परफॉर्मन्सने प्रेक्षकांना ताजेतवाने केले. ही गितं ऐकताना चंद्रशेखर बावनकुळे यांना अगदी आपल्या कॉलेजमधील दिवसांची आठवण झाल्याचं उपस्थितांना सांगितलं.,

लोकप्रिय चित्रपट पुष्पा मधील संवादांवर आधारित सादरीकरणाने आणि गाण्यांनी महोत्सवाला रंगत आणली. स्थानिक कलाकारांनी तयार केलेल्या या स्किटने प्रेक्षकांना भरभरून हसवले. यानंतर सारेगामापा फेम गायिका ऐश्वर्या सहा यांनी जरा जरा महकता है, मेरे ख्वाबों में जो आए यांसारखी सदाबहार गाणी सादर करून आपल्या सुमधूर आवाजाने सांगीतिक मेजवानी दिली.

Sudhir Mungantiwar म्हणतात.. विरोधकाचेही घर असावे शेजारी

दोन महोत्सव पाठोपाठ

अलीकडेच नागपुरात खासदार नितीन गडकरी यांनी सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन केलं होतं. त्यातून नागपूरकरांना भरपूर मनोरंजन मिळालं. त्याच्या पाठोपाठ आता रामटेकमध्ये महोत्सव होत आहे. महोत्सवात स्थानिक कलाकारांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

रांगोळी, मेहंदी, सायकल, नौका, मातीकला आणि स्केटिंग अशा विविध प्रकारच्या स्पर्धांमध्ये स्थानिक नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. या स्पर्धांमुळे स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध झाले आणि त्यांना प्रोत्साहन मिळाले.

फूड फेस्टिव्हल, हॉट एअर बलून राइड आणि महिला बचत गटांच्या हस्तकलेच्या स्टॉल्सनेही प्रेक्षकांना आकर्षित केले. पारंपरिक आणि आधुनिक खाद्यपदार्थांनी सजलेल्या फूड फेस्टिव्हलने उपस्थितांची विशेष दाद मिळवली.

रामटेक महोत्सवात ढोलताशा पथक आणि आदिवासी नृत्यानेही रंगत आणली. प्रेक्षकांनी याचा भरभरून आनंद घेतला. आदिवासी नृत्यसादरीकरणाने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाची झलक दाखवली.

सुखविदंरची जादू

रामटेकधील तीन दिवसीय महोत्सवाचा समारोप २४ जानेवारी रोजी होणार असून, सुप्रसिद्ध गायक सुखविंदर सिंग यांच्या ‘लाईव्ह इन कॉन्सर्ट’ने कार्यक्रमाला एका नव्या उंचीवर नेले जाणार आहे. ‘छय्या छय्या’, ‘जय हो’ यांसारख्या गाण्यांनी प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे.

रामटेक पर्यटन आणि सांस्कृतिक महोत्सवाने यंदाही मनोरंजन, कला, आणि सांस्कृतिक वारसा यांचा सुंदर संगम साधत प्रेक्षकांची मने जिंकली. स्थानिक आणि राष्ट्रीय स्तरावरील कलाकारांनी सादर केलेल्या कार्यक्रमांनी रामटेकवासीयांना एक अविस्मरणीय अनुभव दिला.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!