महाराष्ट्र

भाजपच्या दुर्लक्षाने Bhandara ZP काँग्रेसच्या ताब्यात

पक्षात येण्यासाठी तयार असलेल्या कविता उईके Congress कडे 

Share:

Author

भंडारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक रंजक ठरली. भाजपमध्ये येण्यासाठी आतुर असलेल्या कविता उईके अखेर अध्यक्ष झाल्या आहेत.

भंडारा जिल्हा परिषदेमध्ये हातात असलेले अध्यक्षपद भारतीय जनता पार्टीने काँग्रेसच्या घशात घातले आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये येण्यासाठी उत्सुक असलेल्या कविता उईके अखेरच्या क्षणी काँग्रेसमध्ये कायम राहिल्या. भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यकारिणी कडून उईके यांना प्रतिसाद मिळाला नाही. भाजपकडून उईके यांना सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी काँग्रेसचा ‘हात’ आपल्या हातात कायम ठेवला. 

आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या जिल्ह्यामध्ये काँग्रेसला मोठे यश मिळाले. हातामध्ये असलेले पद भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यकारिणीच्या चाल ढकलपणामुळे आणि दुर्लक्षामुळे काँग्रेसच्या पदरात पडले आहे. त्यामुळे भाजपचे मोठे नेते भंडारा जिल्ह्यामध्ये भाजपला मोठे करण्यासाठी जीवतोड मेहनत करीत आहेत. पण दुसरीकडे भाजपचे जिल्हा कार्यकारणीमधील पदाधिकारी वरिष्ठ नेत्यांना घडामोडी सांगण्याचेही सौजन्य दाखवत नसल्याचे या घटनेवरून निष्पन्न झाले आहे.

लवकरच बदलणार Washim जिल्ह्याचा पालकमंत्री

पक्षविरोधी काम 

भंडारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीला मोठे करण्यासाठी पक्षाचे नेते दिवस रात्र एक करीत आहेत. मात्र जिल्हा कार्यकारणीकडून पक्ष विरोधी काम केले जात आहे. कविता उईके या भारतीय जनता पार्टीमध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत ही बाब पक्षातील वरिष्ठ नेत्यांपर्यंत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कळवलीच नाही. तुम्हारे आठ दिवस सतत कविता उईके या भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात होत्या. मात्र त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. या पदासाठी भाजपच्या माहेश्वरी नेवारे इच्छुक होत्या. मात्र त्यांचे जात प्रमाणपत्र रद्द झाले. त्यामुळे कविता उईके यांना भारतीय जनता पार्टीमध्ये घेऊन जिल्हा कार्यकारिणीला झेडपीवर झेंडा फडकवता आला असता. मात्र तसे झाले नाही.

कविता उईके यांच्या पक्षप्रवेशाला भारतीय जनता पार्टी मधील गटनेत्याचा विरोध होता. त्यामुळे त्यांच्याकडून हा विषय पक्ष पातळीवर वरिष्ठापर्यंत गेलाच नाही. हा विषय जर वरपर्यंत कळला असता तर कदाचित कविता उईके या भाजपमध्ये असत्या आणि जिल्हा परिषद अध्यक्षपदावर भाजपला कब्जा करता आला असता. भाजपला अध्यक्षपद मिळाले तर उपाध्यक्ष पद राष्ट्रवादीकडे जाईल. त्यामुळे आपला उपाध्यक्ष पदाचा पत्ता गट होईल म्हणून गटनेत्याने कविता उईके यांच्या पक्षप्रवेशाबाबत सगळ्यांनाच अंधारात ठेवल्याचे आता दिसत आहे.

भंडारा जिल्हा परिषदेतील अध्यक्ष पद अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांसाठी राखीव आहे. या पदासाठी महाविकास आघाडी आणि महायुती मध्ये रस्सीखेच सुरू होती. मात्र आता हे पद स्वतःकडे कायम राखण्यात काँग्रेसला यश आले आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!