महाराष्ट्र

नाना पटोले ठरले लकी; Bhandara मध्ये महायुती पडली फिकी 

अध्यक्षानंतर संपूर्ण Zilla Parishad घेतली ताब्यात 

Post View : 28

Author

भंडारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले हे बाजीगर ठरले आहेत. संपूर्ण भंडारा जिल्हा परिषद आता काँग्रेसच्या ताब्यात आहे. 

विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या विरोधात वातावरण तयार करण्यात आले होते. मात्र महायुतीच्या तावडीतून अख्खी जिल्हा परिषद स्वतःकडे ओढत नाना पटोले यांनी काँग्रेसमध्ये आपलं वर्चस्व दाखवून दिला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षच नव्हे तर अख्खी जिल्हा परिषद नाना पटोले यांनी आपल्या ताब्यात घेतली आहे.

भारतीय जनता पार्टीकडे जाऊ पाहणाऱ्या उमेदवाराला नाना पटोले यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद मिळवून दिले. त्यानंतर महायुतीमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे यशस्वी झाले. विषय समिती सभापती पदाच्या निवडणुकीत नाना पटोले यांनी संपूर्ण जिल्हा परिषद आपल्या ताब्यात घेऊन दाखवली. निवडणुकीच्या काही तासापूर्वी भारतीय जनता पार्टीचा एक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे चार असे पाच सदस्य गायब झाले होते. हे पाचही सदस्य फुटल्याने संपूर्ण भंडारा जिल्हा परिषद काँग्रेसच्या ताब्यात गेली आहे.

साहेब.. Bhandara Zilla Parishad बाबत आता फोन लावाच

ईश्वराने दिली साथ 

नाना पटोले यांचे नशीब सध्या जोरावर असल्याचे दिसत आहे. भंडारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ईश्वराने देखील नाना पटोले यांना साथ दिली आहे. सभापती पदाच्या निवडणुकीत नरेश ईश्वरकर, आनंद मल्लेवार, अनिता नलगोकुलवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य ईश्वरचिठ्ठीने विजयी झाले. काँग्रेसच्या शीतल राऊत यांनाही निवडणुकीमध्ये याच ईश्वरचिठ्ठीने साथ दिली. भाजपचे उमेश पाटील निवडणुकीदरम्यान गायब होते. त्यामुळे काँग्रेसला या निवडणुकीमध्ये यश मिळवणे सहज शक्य झाले.

भंडारा जिल्ह्यामध्ये अध्यक्षपद स्वतःहून भाजपकडे चालून आले होते. मात्र हे पद भाजपला स्वतःकडे कायम ठेवता आले नाही. त्यामुळे भंडारा जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष काँग्रेसचा झाला. राष्ट्रवादी काँग्रेसकडे उपाध्यक्ष पद गेले. मात्र त्यानंतर पूर्ण फासे फिरले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे मिळून पाच सदस्य गायब झाले. त्यांनी महायुतीचा पूर्ण ‘गेम’ केला. त्यामुळे भंडारा जिल्ह्यामध्ये नाना पटोले यांची कॉलर आणखी ‘स्टाईट’ झाली आहे. अख्खी जिल्हा परिषदच महायुतीच्या हातून निघून गेल्याने अनेकांना आता मोठा धक्का बसला आहे. महायुतीच्या या पराभवाला कोण कारणीभूत आहे? याचा शोध आता वरिष्ठ नेत्यांना घ्यावा लागणार आहे.

सोशल मीडियावर होणार BJP आक्रमक 

भंडारा जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळाले नाही. भारतीय जनता पार्टीचे नेतेच घरचे भेदी ठरले आहेत. त्यामुळे भंडारा जिल्ह्यामध्ये आता भारतीय जनता पार्टीला गंभीर देणे आत्मपरीक्षण करण्याची गरज भासणार आहे. या आत्मपरीक्षणानंतर गरज पडल्यास मोठे ऑपरेशन भारतीय जनता पार्टीला करावे लागेल. प्रसंगी काही नेते देखील बदलावे लागणार आहेत.

भंडारा जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीला यश मिळाले नाही. त्यात भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्तेच घरचे भेदी ठरले आहेत. त्यामुळे भंडारा जिल्ह्यामध्ये आता भारतीय जनता पार्टीला गंभीरपणे आत्मपरीक्षण करण्याची गरज भासणार आहे. या आत्मपरीक्षणानंतर गरज पडल्यास मोठे ऑपरेशन भारतीय जनता पार्टीला करावे लागेल. प्रसंगी काही पदाधिकारी देखील बदलावे लागणार आहेत. भंडारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीला सक्षम करण्यासाठी नेते दिवस-रात्र एक करीत आहेत. आपल्या रक्ताचे पाणी करीत आहेत. परंतु पदाधिकाऱ्यांना याचं गांभीर्य वाटत नाही. त्यांच्याच चुकीमुळे भंडारा जिल्हा परिषद हातून निघून गेल्याचं आता बोललं जात आहे.

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित यांनी अनेक वर्ष सकाळ माध्यम समूहासोबत रिपोर्टर म्हणून काम केलं. साम टिव्हीचे ते रिपोर्टर होते. याशिवाय सरकारनामा या सकाळ समूहाच्या राजकीय वेब पोर्टलचे प्रतिनिधी देखील होते.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!