महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेला बांगलादेशी महिलांनी बनावट कागदपत्रांद्वारे लाभ घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे सरकारच्या योजनांच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
महायुती सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली होती. विधानसभा निवडणुकीपूर्वी या योजनेचा मोठा प्रचार करण्यात आला आणि त्याचा परिणाम निवडणुकीच्या निकालावरही दिसून आला. तथापि, मंत्री आदिती तटकरे यांच्या नेतृत्वात अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर काही महिला अपात्र ठरल्या आहेत. परंतु, या योजनेचा लाभ बांगलादेशी नागरिकांनीही घेतला असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे.
बांगलादेशी महिलांनी बनावट कागदपत्रांद्वारे योजनेचा लाभ घेतला आहे. मुंबई पोलिसांनी दक्षिण मुंबईतील कामठीपुरा परिसरात केलेल्या कारवाईत एक बांगलादेशी महिला योजनेचा लाभ घेत असल्याचे उघडकीस आले. या महिलेने बनावट कागदपत्र तयार करून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला. यामध्ये एक दलाल देखील अटक करण्यात आला असून, हा प्रकरण तात्काळ तपासाच्या कक्षेत घेतला आहे.
नवीन जिल्ह्यांबाबत Chandrashekhar Bawankule यांनी फायनलच सांगितलं
बांगलादेशी नागरिकांच्या घुसखोरीचा वाढता धोका
बांगलादेशी नागरिक भारतीय सीमांवरून देशात घुसखोरी करत असून, अनेकजण दलालांच्या मदतीने भारतात प्रवेश करत आहेत. यामध्ये त्यांनी बनावट कागदपत्रे तयार करून भारताचे नागरिक असल्याचा बनाव केला आहे. या कागदपत्रांचा उपयोग करून बांगलादेशी महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे. सध्या मुंबईतील गुन्हे शाखा आणि पोलिसांनी बांगलादेशी नागरिकांविरोधात सखोल तपास सुरू केला आहे.
योजनेचा लाभ पात्र महिलांनाच मिळावा – अजित पवार
महाराष्ट्रातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे की, लाडकी बहीण योजनेचा लाभ केवळ पात्र महिलांनाच मिळावा, हे अत्यंत आवश्यक आहे. त्यांनी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांकडून कोणताही पैसे परत घेण्यात येणार नाही, असे देखील स्पष्ट केले आहे.
विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले की, समाजकंटक घुसखोरी करून भारतात येतात आणि आधार कार्ड तयार करतात. यासारखी अपप्रवृत्ती देशासाठी धोका बनते. बांगलादेशी महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याबाबत ते खंत व्यक्त करत आहेत.
योजना वादग्रस्त; विरोधकांने सरकारवर प्रहार
लाडकी बहीण योजनेचा लाभ भारतीय नागरिकांना मिळावा अशी शपथ घेतलेल्या महायुती सरकारने फसवणूक कशी होऊ शकते, असा सवाल विरोधक उपस्थित करू शकतात.
वोट विकत घेण्यासाठी एक योजना सुरू करण्यात आलेली होती. प्रारंभिक अवस्थेत, या योजनेचा लाभ सर्व नागरिकांना मिळावा आणि त्यानंतर फेरतपासणी करून धोखा दिला जाण्याची शक्यता व्यक्त केली गेली होती, असे विरोधकांचे म्हणणे होते. तथापि, या संदर्भात पुढे काय नवीन वळण येईल आणि परिस्थिती कशी आकार घेईल, हे येणारा काळच ठरवेल.
