महाराष्ट्र

काँग्रेस नेते Rahul Gandhi यांनी घेतली दोन नेत्यांची धास्ती

पूर्वीचा अनुभव पाहता Congress प्रदेशाध्यक्ष नेमताना दक्षता

Post View : 60

Author

विधानसभा निवडणूक हरल्यानंतर महाराष्ट्रात नाना पटोले यांना हटविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. लवकरच काँग्रेसला नवा प्रदेशाध्यक्ष मिळेल असं चित्र आहे. मात्र नवीन अध्यक्ष नेमताना राहुल गांधी यांना दोन नेत्यांची धास्ती वाटत आहे.

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून आमदार नाना पटोले यांना लवकरच हटविण्यात येणार आहे. त्यांच्या जागेवर अमित देशमुख यांचं नाव जवळपास निश्चित झालं आहे. नवीन प्रदेशाध्यक्ष नेमताना काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी बरीच दक्षता घेत आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र काँग्रेसला नवीन अध्यक्ष देताना राहुल यांनी दोन नेत्यांची धास्ती घेतली आहे. हे दोन नेते कोणत्याही क्षणी काँग्रेसला खिंडार पाडू शकतात. त्यामुळं या दोन नेत्यांपासून काँग्रेसला सुरक्षित ठेवणारा प्रदेशाध्यक्ष राहुल गांधी यांना हवा आहे. त्यामुळं अमित देशमुख यांचं नाव निश्चित झाल्यानंतरही अधिकृत घोषणा करण्यासाठी इतका विलंब लावला जात असल्याचं सांगण्यात येत आहे.

महाराष्ट्रात भाजपनं महाविकास आघाडीचं सरकार उलथवून टाकलं. सरकारच्या आणि दिग्गज नेत्यांच्या नाकाखालून 40 आमदार आणि मंत्री पळविले. मुंबईतून गुवाहटीला ही मंडळी पोहोचेपर्यंत कोणालाही कानोकान खबर लागली नाही. त्यामुळं भाजप काहीही करू शकते याची धास्ती आता काँग्रेसला वाटत आहे. महायुतीचं सरकार स्थापन करताना भाजपनं अख्खी शिवसेना फोडली. काँग्रेसमधूनही अशोक चव्हाण यांच्या सारख्या मातब्बर नेत्याला आपल्याकडं ओढलं. त्यामुळं भाजप कोणत्याही क्षणी काहीही करू शकते, हे आता राहुल गांधी यांना पटलं आहे.

विदर्भातील प्रदेशाध्यक्ष Rahul Gandhi यांना नको

त्यामुळंच विदर्भ नको

नवीन प्रदेशाध्यक्ष नेमताना राहुल गांधी यांनी विदर्भातील नेत्यांची नावं सोडून बोला अशी सूचना केली आहे. त्याला कारणही तसेच आहे. काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले पूर्वी भाजपमध्ये होते. तेव्हापासून त्यांची देवेंद्र फडणवीस यांच्याशी आणि पटोले चांगले मित्र असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. पटोले यांना नुकतेच देवेंद्र फडणवीस भेटून आले. त्यासाठी त्यांनी स्पेशल हेलिकॉप्टर यात्राही केली. पटोले हे भाजपसाठी छुप्या पद्धतीनं काम करतात, असा आरोप त्यांच्यावर आता काँग्रेसमधूच होत आहे. नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघातून पराभूत झालेले काँग्रेस उमेदवार ऋषीकेश ऊर्फ बंटी शेळके यांनी तर हा आरोप उघडपणे केला. त्यामुळं राहुल गांधी चिंतेत आहेत.

प्रदेशाध्यक्ष पदासाठी दुसरं नाव होतं विजय वडेट्टीवार यांचं. त्यांचेही देवेंद्र फडणवीस यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याची बाब राहुल गांधी यांच्या कानावर टाकण्यात आली आहे. यशोमती ठाकूर यांचंही नाव प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेत आलं होतं. ठाकूर अध्यक्ष झाल्या तर मोठ्या कालखंडानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसला महिला अध्यक्ष मिळेल असं सांगण्यात येत होतं. राहुल गांधी यांना ठाकूर यांच्या सक्षमतेवर कोणतीही शंका नव्हती. पण त्यांना देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी या दोन नावांची चिंता आहे. त्यातल्या त्यात त्यांना सर्वाधिक चिंता वाटत आहे ती देवेंद्र फडणवीस यांची.

सत्ता न आल्यानं Congress पुढे 50 लाखांचा प्रश्न

ऑपरेशनचे यशस्वी डॉक्टर

देवेंद्र फडणवीस यांनाही मानद आचार्य पदवी मिळाली आहे. त्यामुळं ते राजकारणातील आचार्य अर्थात डॉक्टर ठरले आहेत. भाजपचं ‘ऑपरेशन लोटस’ अनेक ठिकाणी देवेंद्र फडणवीस यशस्वी करून दाखविलं आहे. महाराष्ट्रात त्यांनी महाविकास आघाडीत जो भूकंप घडविला त्याचे हादरे आजपर्यंत उद्धव ठाकरे, शरद पवार यांना बसत आहेत. फडणवीसांनी आधी शिवसेनेला धक्का दिला त्यानंतर राष्ट्रवादीच्या काकासाहेबांना. अशोक चव्हाणांना आपल्याकडं घेत त्यांनी काँग्रेसलाही आपण खरोखर महाराष्ट्र भाजपमधील चाणक्य असल्याचं दाखवून दिलं. अशात विदर्भातील प्रदेशाध्यक्ष राहिला तर फडणवीस उरलीसुरली काँग्रेसही लंबी करतील हे राहुल गांधी यांना पटवून देण्यात आलं.

राहुल गांधी यांनाही ही बाब पटली आहे. त्यामुळं महाराष्ट्र काँग्रेसला वाचवायचं असेल तर विदर्भातील प्रदेशाध्यक्षला ‘ना.. ना..’ म्हणा असा सल्ला त्यांनी ऐकला. याच कारणामुळं आता राहुल गांधी यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याशी दूरदूरपर्यंत संबंध नसलेल्या अमित देशमुख यांच्या नावावर सहमती दर्शविली आहे. अमित यांचे वडिल विलासराव देशमुख हे काँग्रेसशी एकनिष्ठ होते. आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी काँग्रेसचा ‘हात’ सोडला नाही. त्यामुळं एकनिष्ठतेचा ‘डीएनए’ त्यांच्यात असल्याचं राहुल गांधी यांना पटवून देण्यात आलं आहे. सतेज पाटील यांचाही भाजप आणि संघाशी कोणताही संबंध नाही. परिणामी देशमुख यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतं, असं अनेक नेत्यांनी ठामपणे सांगितलं आहे.

प्रसन्न जकाते | Prasannaa Jakate

प्रसन्न जकाते | Prasannaa Jakate

मातृभूमी (अकाेला), सकाळ (अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशीम, अमरावती), दैनिक भास्कर हिंदी (मराठवाडा वृत्त विभाग प्रमुख) , महाराट्र टाइम्स (नागपूर), भास्कर समूहाचे मराठी दैनिक दिव्य मराठी (अमरावती), सकाळ माध्यम समूहाचे पॉलिटिकल वेब पोर्टल सरकारनामा असा प्रसन्न यांचा पत्रकारितेचा सुमारे 26 वर्षांचा प्रवास आहे. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या हस्ते प्रसन्न यांचा शोध प्रबंध भुवनेश्वर येथील भारतीय विज्ञान मेळाव्यात प्रकाशित करण्यात आला. क्राइम रिपोर्टिंग पासून आपल्या पत्रकारितेचा प्रवास सुरू करणाऱ्या प्रसन्न यांनी गडचिरोली, छत्तीसगडमधील बक्स, अबुजमाड या नक्षलवाद्यांची भीषण दहशत असलेल्या भागात ग्राऊंड रिपोर्टिंग केले आहे. उत्तर प्रदेश, दिल्ली, मध्य प्रदेश येथील अनेक निवडणुकीचे रिपोर्टिंगही त्यांनी केले आहे. महाराष्ट्रातून स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट (सिमी) आणि दिनदार-ए-अंजुमन या दोन प्रतिबंधित संघटनांचे नेटवर्क उद्ध््वस्त करणारे रिपोर्टिंगही त्यांनी केले. मुंबई हल्ल्यातील दहशतवादी याकुब मेमन याच्या फाशीच्या घटनेचे ‘ऑन द स्पॉट’ आणि कुठेही न प्रकाशित झालेले वार्तांकनही त्यांनी नागपूर येथे केले.

More Posts

Follow Me:Add me on XAdd me on Facebook

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!