महाराष्ट्र

NMC Election : नवीन प्रभाग रचनेच्या ट्विस्टने राजकीय नेत्यांचे स्वप्न भंग

Nagpur : पालिका निवडणुकीसाठी भाजप, काँग्रेसची रंगीत तालीम

Post View : 88

Author

नागपूर महापालिका निवडणुकीत वाढलेली मतदारसंख्या आणि नवीन प्रभाग रचनेमुळे राजकीय गोंधळ उडाला आहे. ज्यामुळे नेत्यांचे भवितव्य अनिश्चित बनले आहे.

नागपूर शहरात राजकीय वातावरण तापू लागले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा ज्वर आता चढला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगाने तयारीला सुरुवात केली आहे. प्रत्येक पक्षाने आपली मोर्चेबांधणी तीव्र केली आहे. सरकारही या रणधुमाळीत मागे राहिलेले नाही. त्यांनी तयारीच्या बटणावर हात ठेवला आहे. येत्या काही महिन्यांत नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेषत: विधानसभेच्या निवडणुकीत मतदारसंख्येत झालेली लक्षणीय वाढ आणि आता प्रत्येक वॉर्डात मतदारांचा झपाट्याने वाढणारा आलेख यामुळे ही निवडणूक आणखी चुरशीची आणि गुंतागुंतीची बनली आहे.

कोण विजयी होणार, हा प्रश्न आता सर्वांच्या मनात घोंगावतोय. नागपूरच्या राजकीय आखाड्यात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. महापालिकेच्या नव्या प्रभाग रचनेमुळे इच्छुक उमेदवारांच्या मनात धाकधूक वाढली आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि विरोधी महाविकास आघाडी यांनी निवडणुकीच्या रणनितीला धार चढवली आहे. इच्छुक उमेदवार आपल्या जागेच्या भवितव्यासाठी आसुसलेले दिसत आहेत. नव्या प्रभाग रचनेमुळे अनेक नेत्यांचे स्वप्न भंग होण्याची शक्यता आहे. तर काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

Vijay Wadettiwar : मतचोरीच्या वादात निवडणूक आयोगाने घेतला राजकीय बाजू?

नवे चेहरे उदयास

सर्व घडामोडींमुळे नागपूरच्या राजकारणात एक वेगळीच चमक आणि उत्साह पाहायला मिळतोय. महापालिकेने तयार केलेली नवीन प्रभाग रचना आता राज्य सरकारकडे सादर झाली आहे. नगरविकास विभागाने 22 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट या कालावधीत हरकती आणि सूचना मागवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर अंतिम प्रभाग रचना जाहीर होईल. या नव्या रचनेत प्रभागांची संख्या आणि त्यांच्या सीमांकनात मोठे बदल अपेक्षित आहेत. यामुळे काही जुन्या नेत्यांचे राजकीय गणित बिघडण्याची शक्यता आहे. तर काही नव्या चेहऱ्यांना आपली चमक दाखवण्याची संधी मिळेल.

गेल्या काही महिन्यांपासून निवडणुकीच्या तयारीत असलेले नेते आता या नव्या रचनेमुळे गोंधळले आहेत. त्यांच्या मनात एकच प्रश्न: आता पुढे काय? भाजपने आपली रणनीती आणखी तीव्र केली आहे. पक्षाच्या संघटना पातळीवर सातत्याने बैठकी होत आहेत. संभाव्य उमेदवारांना सक्रिय राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नव्या प्रभाग रचनेनंतर केवळ भाजपमध्येच नव्हे, तर विरोधी पक्षांमध्येही राजकीय समीकरणे बदलणार आहेत. काही ठिकाणी नवे चेहरे उदयास येण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी जुन्या नेत्यांना आपली जागा टिकवण्यासाठी कसोटी लागणार आहे. या सगळ्या घडामोडींमुळे राजकीय गोटात एक वेगळीच खळबळ उडाली आहे.

Parinay Fuke : प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी आमदार झाले ‘डिसिप्लिन मास्टर’

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर यांनी नागपुरातील धनवटे नॅशनल कॉलेजमधून पत्रकारिता व जनसंज्ञापन विषयात पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. 2023-24 मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी द लोकहित लाइव्ह येथे आपल्या करीअरला सुरुवात केली.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!