महाराष्ट्र

Parinay Fuke : अभिनेते जुगाराच्या जाहिराती करतातच कसे?

Budget Session : माजी मंत्री आमदार डॉ.परिणय फुके यांचा सवाल

Share:

Author

राज्यामध्ये ऑनलाईन जुगार सुरू झाला आहे. वेगवेगळ्या ॲपच्या माध्यमातून जनतेची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे. यासंदर्भात विधान परिषदेत माजी मंत्री आमदार डॉ. परिणाम फुके यांनी आवाज उठवला. 

महाराष्ट्र मध्ये गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन जुगार मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. वेगवेगळ्या ॲपच्या माध्यमातून हा जुगार लोकांना खेळण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे. बॉलीवूड मधील काही अभिनेते देखील या जुगाराच्या जाहिराती करीत आहेत. अभिनेते अशा जाहिराती करूच कसे शकतात, असा सवाल करीत भाजप नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी संताप व्यक्त केला.

राज्यामध्ये सुरू असलेल्या ऑनलाइन गेमिंग जुगाराबाबत परिणय फुके यांनी विधान परिषदेत आवाज उठवला. अलीकडेच एका ॲपच्या माध्यमातून राज्यभरातील जनतेची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाली. जुगाराला प्रवृत्त करणारे असे अनेक ॲप सध्या इंटरनेटवर उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या खेळांच्या माध्यमातून लोकांना युगासाठी पैसे लावण्यास प्रवृत्त केले जात आहे. या खेळांच्या जाहिराती करताना हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलावंतांचा वापर केला जात आहे.

Parinay Fuke : एमआयडीसीतील प्लॉट बळकावणाऱ्यांविरुद्ध एल्गार 

मोठ्या रकमेची उलाढाल

मराठी आणि हिंदी सिनेमा सृष्टीतील कलाकार लाखो रुपये कमवून असे जाहिराती करीत आहे. या कलाकारांनी केलेल्या जाहिरातीला बळी पडत राज्यातील अनेक लोक ऑनलाईन जुगार खेळत आहेत. या विभागाच्या माध्यमातून आतापर्यंत अनेकांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. लोकांना जुगार खेळायला प्रवृत्त करणाऱ्या अशा ऑनलाइन साधनांवर बंदी घालण्याची गरज आता भासत आहे. अशा सर्व ॲपच्या चालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा. ऑनलाइन जुगाराची जाहिरात करणाऱ्या अभिनेत्याविरुद्ध देखील प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार डॉ. परिणय फुके यांनी केली.

ऑनलाइन जुगाराच्या माध्यमातून आतापर्यंत राज्यांमध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली आहे. हा पैसा कुठून येतो, कुठे जातो याची चौकशी होणे गरजेचे आहे. चुकीच्या मार्गाने आलेल्या पैशाचा वापर चुकीच्या कामांसाठी होऊ शकतो. त्यामुळे अशा सर्व ॲपवर बंदी घालण्याची मागणी आमदार डॉ. परिणय फुके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. या संदर्भात सरकारने तातडीने कायदा करावा. तत्काळ गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी देखील त्यांनी केली.

कायद्याची अडचण 

ऑनलाइन जुगाराचे अनेक ॲप इंटरनेट आणि गुगल प्ले स्टोअरवर सहज उपलब्ध आहेत. या सर्व प्रकाराला ऑनलाइन गेमिंगचे नाव देण्यात आले आहे. यासंदर्भामध्ये देशात कुठेही कोणताही कायदा नाही. त्यामुळे असे खेळ खेळल्याने व्यसन लागू शकते आणि आर्थिक जोखीम वाढू शकते, केवळ एवढी एक ओळ जाहिरात करताना वाचली जाते. अशा गेमिंग साईट आणि ॲपच्या विरोधात कायदा तयार झाल्यास अनेक कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचतील, अशी भावना देखील आमदार डॉ. परिणय फुके यांनी व्यक्त केली

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!