महाराष्ट्र

Parinay Fuke : भंडारा तुमसर स्थानकांना अमृताची जोड

Vidarbha : जिल्ह्याच्या पायाभूत सुविधांना नवा श्वास

Post View : 49

Author

माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या पाठपुरवठ्यामुळे भंडारा रोड आणि तुमसर रोड रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास होणार आहे.

भंडारा जिल्ह्यातील दोन प्रमुख रेल्वे स्थानकांमध्ये आधुनिकतेचा नवा अध्याय सुरू होतोय. भारतीय रेल्वेच्या अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत भंडारा रोड व तुमसर रोड या स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांच्या सुविधांमध्ये क्रांतिकारी बदल होणार आहेत. माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या पाठपुराव्याला यशाची किनार मिळाली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील एकूण 132 स्थानकांचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे.

अमृत भारत स्टेशन ही योजना केवळ सौंदर्यवाढीसाठी नसून, प्रवाशांना आरामदायी आणि अत्याधुनिक सेवा पुरवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. डॉ. परिणय फुके यांनी सतत या प्रकल्पासाठी पाठपुरवठा केला होता. त्यांच्या प्रयत्नाला यश मिळाले आहे. भंडारा रोड स्थानकासाठी 7.7 कोटी आणि तुमसर रोडसाठी तब्बल 11 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यासाठी भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे आमदार डॉ. परिणय फुके यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे या दोन्ही रेल्वे स्थानकांच्या चेहऱ्यामोऱ्यात आमूलाग्र बदल होणार आहे.

Chandrashekhar Bawankule : विकासाच्या गतीत ‘पाणी’च राहिलं मागे 

तांदळाच्या नगरीत प्रगती

डॉ. परिणय फुके यांनी केवळ निधी मंजुरीसाठी नव्हे, तर कामाच्या वेळापत्रकाचीही नियमितपणे पाहणी करत, रेल्वे मंत्रालयाकडे या कामांबाबत गांभीर्याने पाठपुरावा केला होता. यामुळेच आज या प्रकल्पांना प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. तुमसर रोड हे नागपूर विभागातील क्रमांक तीनचे मोठे जंक्शन आहे. येथे दररोज सुमारे 2 हजार 500 ते 3 हजार प्रवासी प्रवास करतात. अमृत भारत योजनेअंतर्गत या स्थानकात वेटिंग लाउंज, स्वच्छतागृहे, लिफ्ट, एस्केलेटर आणि डिजिटल सुविधा यांसारख्या अत्याधुनिक सुविधांचा समावेश होणार आहे.

स्थानकाच्या प्रवेशद्वारावर स्थानिक सांस्कृतिक झलक दर्शविणाऱ्या विशेष कलाकृतींना स्थान देण्यात येणार आहे. विशेषतः, तुमसरचा तांदळासाठी असलेला लौकिक आणि सांस्कृतिक परंपरा या स्टेशनच्या डिझाइनमध्ये प्रतिबिंबित होणार आहे. पूर्वी या कामांचा वेग अपेक्षेप्रमाणे नसल्याचे दिसून आले होते. मागील दीड वर्षांपासून या प्रकल्पांची कामे संथगतीने सुरू होती. एका कंत्राटदाराकडे चार ते पाच स्थानकांची जबाबदारी दिल्यामुळे गतीवर परिणाम झाल्याचेही उघड झाले होते. या बाबत डॉ. परिणय फुके यांनी वेळोवेळी रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले.

Devendra Fadnavis : ‘सर्किट’च्या वेगाने होणार जाणता राजाच्या पराक्रमांचे दर्शन 

स्थानिक नागरिकांच्या सुविधेसाठी कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, असा आग्रह त्यांनी धरला आहे. हे दोन्ही स्थानक केवळ प्रवासाचे केंद्र राहणार नाहीत, तर ते स्थानिक ओळखीचे प्रतीक ठरणार आहेत. प्रगत तंत्रज्ञान, स्वच्छता, आणि सौंदर्यवर्धन यामुळे प्रवाशांना आता नव्या अनुभूतीचा आनंद घेता येणार आहे. या सर्व बदलांच्या केंद्रस्थानी असलेले डॉ. फुके यांच्या नेतृत्वाखाली भंडारा जिल्ह्याचा विकास हा केवळ स्वप्न न राहता, प्रत्यक्ष वास्तवात उतरत असल्याचे चित्र उभे राहते आहे.

Akola : सूर्याचं हाय टेम्परेचर पाहून, शाळांची सेफ मॉर्निंग शिफ्ट 

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित यांनी अनेक वर्ष सकाळ माध्यम समूहासोबत रिपोर्टर म्हणून काम केलं. साम टिव्हीचे ते रिपोर्टर होते. याशिवाय सरकारनामा या सकाळ समूहाच्या राजकीय वेब पोर्टलचे प्रतिनिधी देखील होते.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!