महाराष्ट्र

Parinay Fuke : धान उत्पादक शेतकऱ्यांवर लक्ष्मीची कृपा, बोनस मिळाला…

Paddy Crop: आमदार डॉ. परिणय फुके यांच्या प्रयत्नांना मोठे यश; बळीराजा सुखावला 

Post View : 148

Author

उन्हाळा संपून आता मृग नक्षत्राची चाहूल लागली आहे. अश्या परिस्थितीमध्ये भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर लक्ष्मीची कृपा बरसली आहे.

भंडारा आणि गोंदिया या दोन्ही जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्यात यावा यासाठी भाजप नेते माजी मंत्री आमदार डॉ, परिणय फुके यांनी व्यापक पाठपुरावा केला होता. या  संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धानाला बोनस मिळावा यासाठी पाठपुरावा केला. आमदार फुके यांच्या पाठपुराव्यामुळे केवळ दोनच जिल्ह्यातील न्हवे तर राज्यातील सर्व धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे. धानाला बोनस देण्यासंदर्भातील पत्र महाराष्ट्र स्टेट कोपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनने काढले आहे.

आमदार डॉ. परिणय फुके यांच्या या प्रयत्नांमुळे २ लाख ३६ हजार ४८६ शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यानुसार धान लागवडीखालील जमीन धारणेनुसार प्रतिहेक्टरी २० हजार रुपये बोनस मिळाला आहे. हि रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाली आहे. दोन हेक्टर पर्यटनच्या मर्यादांमध्ये प्रति हेक्टरी २० हजार रुपये प्रमाणे राज्यातील अनेक शेतकऱ्यांना शनिवारी (१४ जून) सुमारे अर्धा लाख रुपये पर्यांतची रक्कम प्राप्त झाली आहे.

खात्यात जमा

डॉ. फुके यांच्या पर्यटनामुळे नागपूर जिल्ह्यात २८ कोटी ६३ लाख ८५ हजार ८०० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वळते झाले आहे. गडचिरोलीत ४८ कोटी ८४ लाख ९० हजार ८६८ रुपये शेतकारयुणन मिळले आहे. भंडारा जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांना २१३ कोटी १२ लाख १५ हजार २०० रुपयांचा धनलाभ झाला आहे. १८० कोटी ६१ लाख  ५३ हजार ३८० रुपयांचा बोनस गोंदिया जिल्ह्यातील धान  उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. राज्यभरातील दहा जिल्ह्यांमध्ये ६६९ कोटी २० लाख ८९ हजार ८४८ रुपयांचा बोनस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वळता झाला आहे.

एकाएकी शनिवारी सकाळपासून राज्यातील सर्व धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोबाईल अचानक खणखणू लागले. शेतकऱ्यांनी मोबाईलवर आलेला संदेश पाहिल्यानंतर त्यांना बोनस मिळाल्याची आनंदवार्ता कळली. त्यानंतर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या तोंडून एकच वाक्य  बाहेर पडलं. ‘दादांनी मिळवून दिला गड्या बोनस’.

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित यांनी अनेक वर्ष सकाळ माध्यम समूहासोबत रिपोर्टर म्हणून काम केलं. साम टिव्हीचे ते रिपोर्टर होते. याशिवाय सरकारनामा या सकाळ समूहाच्या राजकीय वेब पोर्टलचे प्रतिनिधी देखील होते.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!