महाराष्ट्र

Parinay Fuke : धागा नेतृत्वाचा, वीण विकासाची 

Bhandara : सुईनं शिवलं आत्मभान अन् विकासाची नवी ओळख

Post View : 37

Author

भाजप नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी मोहाडीतील गारमेंट युनिटमध्ये शिलाई मशीन चालवत सर्वांचे लक्ष वेधले. विकासाच्या धाग्यांना नेतृत्त्वाच्या सुईने जोडत रोजगार आणि स्वयंपूर्णतेचा आत्मविश्वास त्यांनी शिवला.

भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील एका साध्यासुध्या गारमेंट युनिटमध्ये जेव्हा एक पांढरशुभ्र पोशाखातील नेताच स्वतः शिलाई मशीनवर बसतो, तेव्हा ती केवळ एक औपचारिक भेट राहात नाही. ही भेट होते एक संदेशाची सुरुवात. हे दृश्य होतं भाजप नेते माजी मंत्री, आमदार डॉ. परिणय फुके यांच्या कार्यकर्तृत्वाचा जीवंत दाखला.

सुई-धाग्याच्या गप्पांमधून विकासाचे सूत्र डॉ. परिणय फुके यांनी विणले आहे. यावेळी डॉ. फुके यांनी गारमेंट युनिटमधील महिलांशी संवाद साधला. त्यांच्या कौशल्याचं कौतुक केलं. त्यांच्यासाठी कापडाच्या जशा शिवण तयार केल्या, तशाच आश्वासनाच्या वीणीने रोजगाराच्या संधीही पक्क्या केल्या. कपड्यांप्रमाणे युनिटमध्ये तयार झालेल्या हिमतीला बाजारपेठ मिळवून देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. फक्त शब्दांनी नव्हे, तर कृतीनेही दाखवून दिलं.

बळकट कर्तृत्व

शिलाई मशीन चालवतानाही रणनीतीचा धागा फुके यांनी पकडलेला होता. शिलाई मशीनवर डॉ. फुके जेव्हा स्वतः बसले, तेव्हा केवळ दोर शिवला गेला नाही. शिवले गेला विश्वास, प्रयत्न, आणि नेतृत्वाच्या योजनांचा तंतू. त्यांच्या हातून कपड्याची जेवढी वीण घडली, तेवढीच त्यांनी राजकीय बांधणीची वीणही अधिक बळकट केली आहे.

भंडारा-गोंदिया जिल्ह्यांमध्ये भाजपचं सक्षम जाळं विणताना, महायुतीच्या यंत्रणेला बळकट करताना ज्या गुंड्या सैल पडल्या, त्यांना डॉ. फुके यांनी प्रसंगी उखडून फेकलं आणि नवं निर्माण केलं. डिझाईन तयार करताना प्रत्येक धागा महत्वाचा असतो, पण अडथळा करणाऱ्या गुंड्या दूर करणं, हेच खरे नेतृत्व. हे कसब डॉ. फुके यांनी कुणालाही न दुखवता करून दाखवले.

Parinay Fuke : आमदारांच्या छत्रछायेत विरोधी नेत्यांची भाजपात नवी साथ

महायुतीचं जाळं

भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांच्या धाग्यांनी विणलेलं एक भक्कम महायुतीचं राजकीय कापड भंडारा-गोंदिया जिल्ह्यात डॉ. फुके यांच्या नेतृत्वाखाली आकार घेत आहे. शिलाई मशीनवर जशी कलाकुसर झाली, तशीच योजनांमध्येही त्यांनी बारीकसारीक तपशीलांवर भर दिला आहे. केवळ आकडेवारीसाठी नव्हे, तर परिणामकारकतेसाठी.

शिलाई मशीनवरील काही मिनिटांची उपस्थिती म्हणजे केवळ फोटोसाठीचा शो नव्हता. ती होती एका नेतृत्वाच्या स्वभावाची झलक. जोमाने विकासाच्या कामात उतरायचं, हे तत्व ज्यांनी स्वीकारलं आहे, अशा डॉ. फुके यांची खासीयत. महिलांना सन्मान, स्वयंपूर्णतेला बळ आणि रोजगाराला दिशा देणं, हे त्यांचे खरे उद्दिष्ट.

जेथे इतर केवळ भाषणं देतात, तिथे डॉ. फुके विश्वास शिवण्याचं साहसही ठेवतात. गाव, तालुका, जिल्हा यांची वीण घालत, विकासाचे धाहे थेट जनतेपर्यंत नेत असलेले डॉ. परिणय फुके पुन्हा एकदा या एका साध्या शिलाई मशीनवरील कृतीतून लोकांच्या मनात ‘खास’ ठरले आहेत.

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित यांनी अनेक वर्ष सकाळ माध्यम समूहासोबत रिपोर्टर म्हणून काम केलं. साम टिव्हीचे ते रिपोर्टर होते. याशिवाय सरकारनामा या सकाळ समूहाच्या राजकीय वेब पोर्टलचे प्रतिनिधी देखील होते.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!