महाराष्ट्र

Parinay Fuke : भंडाऱ्यानंतर आता नागपुरातही आणणार विकासाची गंगा

Nagpur BJP : समस्यांच्या धाग्याला जोडला संवादाचा गाठोडा

Post View : 39

Author

भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी नागपूरमध्ये पुन्हा सक्रिय होत कार्यकर्त्यांशी संवाद साधून विकासकामांचा आढावा घेतला.

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची धामधूम जोरात सुरू आहे. प्रत्येक राजकीय पक्षाने कंबर कसली आहे. कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. अशा चुरशीच्या वातावरणात, भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी नागपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा आपली सक्रिय भूमिका दाखवली आहे. पूर्व विदर्भात विकासाची नवी लाट आणण्यासाठी ते सज्ज झाले असून, त्यांचा दमदार प्रवेश निवडणूक रणसंग्रामात चर्चेचा विषय ठरला आहे. नागपूर येथील त्यांच्या निवासस्थानी नुकतेच अनेक कार्यकर्ते आणि पक्षाचे पदाधिकारी यांनी भेट घेतली.

डॉ. फुके यांनी यावेळी कार्यकर्त्यांशी सौहार्दपूर्ण संवाद साधला आणि शहरात सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. पक्षाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या जनहिताच्या योजनांबाबतही त्यांनी चर्चा केली. कार्यकर्त्यांनी मांडलेल्या समस्या आणि अडचणी त्यांनी लक्षपूर्वक ऐकून घेतल्या. प्रत्येक कार्यकर्ता हा पक्षाचा कणा आहे. तुमच्या समस्या सोडवणे आणि नागपूरच्या विकासाला गती देणे हे माझे प्राधान्य आहे, असे आश्वासन देत त्यांनी सर्वांचे मन जिंकले. यावेळी कार्यकर्त्यांनीही त्यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत आभार मानले. नागपूर, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृहनगर विकासाच्या बाबतीत नेहमीच आघाडीवर राहिले आहे.

Maharashtra : चार तडफदार अधिकाऱ्यांना नवीन पदाचा डबल भार

नागपूरला स्मार्ट सिटी

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉ. फुके यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कंबर कसली आहे. रस्ते, पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा आणि शिक्षण यासारख्या क्षेत्रांत नव्या प्रकल्पांना गती देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. विशेषतः पूर्व विदर्भातील ग्रामीण भागातील शेतकरी आणि सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यांच्या या प्रयत्नांना स्थानिक जनतेकडूनही मोठा पाठिंबा मिळत आहे. डॉ. फुके यांचे नेतृत्व नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी भंडारा गोंदिया जिल्ह्यात अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना चालना दिली.

शेतकऱ्यांपासून ग्रामीण भागातील रस्त्यांच्या विकासापर्यंत, त्यांनी प्रत्येक स्तरावर काम केले आहे. यावेळीही, निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी कार्यकर्त्यांना एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. नागपूरला देशातील सर्वोत्तम शहर बनवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करायचे आहेत. विकासाची ही लाट थांबणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. नागपूरच्या विकासासाठी डॉ. फुके यांनी अनेक नाविन्यपूर्ण कल्पना मांडल्या आहेत. यामध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत नव्या तंत्रज्ञानाचा वापर, पर्यावरणपूरक उपक्रम आणि युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे यांचा समावेश आहे. विशेषतः, शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. येत्या काळात नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला यश मिळवून देण्यासाठी डॉ. फुके यांचा अनुभव आणि त्यांचे जनसंपर्क कौशल्य निश्चितच मोलाचे ठरणार आहे.

Baban Taywade : सरकार पाडण्याची धमकी, पण आमदार किती?

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित यांनी अनेक वर्ष सकाळ माध्यम समूहासोबत रिपोर्टर म्हणून काम केलं. साम टिव्हीचे ते रिपोर्टर होते. याशिवाय सरकारनामा या सकाळ समूहाच्या राजकीय वेब पोर्टलचे प्रतिनिधी देखील होते.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!