महाराष्ट्र

Prashant Padole : खासदारांनी हाती घेतली भंडाऱ्याच्या विकासाची कमान

East Vidarbha : निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेसचा ऍक्टिव्ह सूर

Post View : 50

Author

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्ष सजग झाले असून, खासदार डॉ. प्रशांत पडोळे भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या विकासासाठी प्रशासनास मार्गदर्शन करत आहेत.

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे. सहा वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर महापालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून, येत्या काही महिन्यांत मतदानाचा उत्साह संपूर्ण राज्यात पाहायला मिळणार आहे. न्यायालयाच्या स्पष्ट संकेतांनंतर राज्य निवडणूक आयोगाने तयारीला वेग दिला आहे. नुकतीच प्रभाग रचनेची घोषणा झाल्याने राजकीय वातावरणात खळबळ माजली आहे. प्रत्येक पक्षाने कंबर कसली असून, कार्यकर्ते रणनीती आखण्यात आणि जनतेशी संवाद साधण्यात व्यस्त झाले आहेत.

विशेषतः पूर्व विदर्भात निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. या साऱ्या घडामोडींमध्ये भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रशांत पडोळे यांनी आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी थेट पुढाकार घेतला आहे. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन विविध समस्यांवर सविस्तर चर्चा केली. ज्यामुळे त्यांचा विकासाचा दृष्टिकोन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. प्रशांत पडोळे यांनी भंडाऱ्यातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाला ठोस पावले उचलण्याचे आवाहन केले आहे. रस्ते, पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, शेतीच्या समस्या आणि विशेषतः कारधा पुलाजवळील बायपास रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न त्यांनी प्रामुख्याने उपस्थित केला.

Harshwardhan Sapkal : महाविकास आघाडीला काँग्रेसचं इट्स कॉम्प्लिकेटेड साइन

कार्यकर्त्यांशी संवादावर जोर

भंडारा, वरठी, तुमसर आणि सिहोरा या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यावर तातडीने उपाययोजना करून नवीन रस्त्यांचे बांधकाम सुरू करण्याची मागणी त्यांनी लावून धरली. पडोळे यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे प्रशासनही खडबडून जागे झाले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील विकासकामांना गती मिळेल, अशी आशा जनतेला आहे.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशांत पडोळे यांनीही आपल्या पक्षाच्या बळकटीकरणासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. कार्यकर्त्यांशी थेट संवाद, नेत्यांशी बैठका आणि जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी मैदानात उतरले आहे.

भंडाऱ्यातील रस्त्यांपासून ते पिण्याच्या पाण्यापर्यंत आणि रुग्णालयांच्या सुविधांपासून शेतीच्या समस्यांपर्यंत प्रत्येक मुद्द्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्यांच्या या प्रयत्नांमुळे जनतेत एक विश्वास निर्माण होत आहे की, पडोळे यांच्या नेतृत्वात भंडाऱ्याचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. महाराष्ट्र विधानसभेतील दारुण पराभवानंतर काँग्रेस पक्ष आता सावध झाला आहे. महापालिका निवडणुकीत बाजी मारण्यासाठी काँग्रेसने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. आमदार नाना पटोले यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतही विकासाच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली. काँग्रेसला आता मतांच्या लालसेपोटी नव्हे, तर खऱ्या अर्थाने विकासाची गंगा आणण्याची संधी आहे.

Parinay Fuke : वैनगंगेच्या लाटांवर आता लघु उद्योग होणार स्वार

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित यांनी अनेक वर्ष सकाळ माध्यम समूहासोबत रिपोर्टर म्हणून काम केलं. साम टिव्हीचे ते रिपोर्टर होते. याशिवाय सरकारनामा या सकाळ समूहाच्या राजकीय वेब पोर्टलचे प्रतिनिधी देखील होते.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!