महाराष्ट्र

Prashant Padole : शेतकरी हितासाठी खासदारांचा ‘नो डिले’ मिशन

Gondia : जिल्हाधिकारी कार्यालयात पडोळेंचा दणका

Post View : 22

Author

काँग्रेस खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत शेतकऱ्यांच्या धान खरेदी, देयक व बोनससह विविध समस्या सोडवण्यावर भर दिला.

पूर्व विदर्भ म्हटले की भंडारा आणि गोंदिया हे दोन जिल्हे प्रत्येकाच्या मनात घर करतात. या भागाच्या विकासासाठी सातत्याने झटणारा आणि सत्ताधाऱ्यांना जाब विचारणारा एक चेहरा नेहमीच चर्चेत असतो. तो म्हणजे काँग्रेसचे भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, शिक्षण-आरोग्यासाठी आणि रस्त्यांच्या सुधारणेसाठी त्यांचा आवाज नेहमीच बुलंद राहिला आहे. त्यांच्या या लढवय्या वृत्तीने पुन्हा एकदा गोंदियात जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वाची बैठक घेतली. जिथे विकासाच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली. 

धान खरेदीपासून ते शेतकऱ्यांच्या बोनस पर्यंत, रस्त्यांच्या दुरवस्थेपासून ते शिक्षण-आरोग्याच्या समस्यांपर्यंत, डॉ. पडोळे यांनी प्रत्येक मुद्द्याला हात घातला. गोंदियाच्या जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीत शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकल्या गेल्या. ज्या त्यांना वर्षानुवर्षे त्रास देत आहेत. शेतकऱ्यांना वेळेवर पैसे मिळत नाहीत, धान खरेदी केंद्रांवर लूट होत आहे. गेल्या रब्बी हंगामातील नुकसान भरपाई अजूनही प्रलंबित आहे. या सगळ्या प्रश्नांना भिडण्यासाठी डॉ. पडोळे यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या. 

ShivSena : गणरायाच्या मंडपातून मतदारांच्या मनापर्यंत पोहोचण्याचा मास्टरप्लॅन

बोनस त्वरित जमा

बैठकीत धान खरेदी केंद्रांवरील गैरप्रकार, बोनसची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणे आणि पावसामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून मदत देण्यावर भर देण्यात आला. डॉ. पडोळे यांनी सांगितले, शेतकऱ्यांचे कष्ट हे आपल्या अर्थव्यवस्थेचा पाया आहे. त्यांच्या मेहनतीला योग्य मूल्य आणि वेळेवर पैसे मिळणे हा त्यांचा हक्क आहे. कोणत्याही प्रकारची टाळाटाळ खपवून घेतली जाणार नाही. त्यांनी अधिकाऱ्यांना खरेदी केंद्रांवर पारदर्शकता सुनिश्चित करण्याचे आणि शेतकऱ्यांच्या समस्यांचे प्राधान्याने निराकरण करण्याचे निर्देश दिले. 

बैठकीला जिल्हाधिकारी, गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, माजी आमदार दिलीप बनसोड, कृषी आणि सहकार विभागाचे वरिष्ठ अधिकारी, धान खरेदी केंद्रांचे प्रतिनिधी आणि शेतकरी उपस्थित होते. डॉ. पडोळे यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवत, प्रत्येक सरकारी योजनेचा लाभ शेवटच्या व्यक्ती पर्यंत पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त केला. शेतकऱ्यांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्या. धान खरेदी केंद्रांवर गैरप्रकारांना आळा घाला आणि बोनस तात्काळ जमा करा, असा त्यांचा स्पष्ट आदेश होता. डॉ. पडोळे यांच्या या बैठकीने गोंदियातील शेतकऱ्यांना एक नवी आशा दिली आहे. त्यांनी केवळ शेतकऱ्यांच्याच नव्हे, तर शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांच्या समस्यांवरही लक्ष केंद्रित केले. पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी, यासाठी त्यांनी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश दिले. 

Devendra Fadnavis : राजकारणाच्या पलीकडे आरक्षणाचा मार्ग

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित यांनी अनेक वर्ष सकाळ माध्यम समूहासोबत रिपोर्टर म्हणून काम केलं. साम टिव्हीचे ते रिपोर्टर होते. याशिवाय सरकारनामा या सकाळ समूहाच्या राजकीय वेब पोर्टलचे प्रतिनिधी देखील होते.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!