महाराष्ट्रातील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांसाठी शासनाकडून मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. लवकरच त्यांना अनुदानाची रक्कम वाढीच्या स्वरूपात थेट खात्यात मिळणार आहे.
पूर्व विदर्भाच्या राजकीय पटलावर एक नाव नेहमीच चर्चेत असते. ते म्हणजे भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके. शेतकऱ्यांचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचवण्यात आणि त्यांना न्याय मिळवून देण्यात त्यांचा हातखंडा आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी नेहमीच अथक परिश्रम घेतले आहेत. मग तो निधी खेचून आणण्याचा प्रश्न असो किंवा शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याचा. डॉ. फुके यांनी प्रत्येकवेळी आपली सक्रियता आणि नेतृत्वगुण दाखवले आहेत. त्यांच्या या कार्यशैलीमुळे पूर्व विदर्भातील शेतकरी आणि सामान्य नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष आदर आहे.
‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या सातव्या हप्त्याच्या घोषणेमुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच अनुदानाची रक्कम जमा होणार आहे. कृषी विभागाने यासाठी शासन निर्णय जारी केला असून, तब्बल 92 लाख 36 हजार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. यासाठी राज्य शासनाने 1932.72 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याने, शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळणार आहे. डॉ. फुके यांनी यासाठी महायुती सरकारचे आभार मानले असून, हा निर्णय शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
Corporation Election : अकोल्याच्या वीस प्रभागांत, कोण लुटणार मतांचा खजिना?
महायुती सरकारचे निर्णायक पाऊल
डॉ. परिणय फुके यांनी नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. पूर्व विदर्भातील शेतीला बळ देण्यासाठी त्यांनी अनेक विकासकामांना चालना दिली. मग ती सधन शेतीसाठी योजना असो, पाणीपुरवठ्याची कामे असो, किंवा शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देणे असो. डॉ. फुके यांनी प्रत्येक पावलावर शेतकऱ्यांसाठी लढा दिला आहे. ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या सातव्या हप्त्याच्या वितरणातही त्यांचा मोलाचा वाटा आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट निधी जमा व्हावा, यासाठी त्यांनी शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा केला होता. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळणार असून, शेतीसाठी लागणाऱ्या खर्चाला हातभार लागणार आहे.
विशेषत: छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ही योजना वरदान ठरत आहे. या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनीही विशेष प्रयत्न केले आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1932.72 कोटींचा निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा होईल, याची खबरदारी घेतली जात आहे. डॉ. फुके यांनी या योजनेच्या यशस्वीतेबद्दल आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले, शेतकऱ्यांचे कल्याण हेच माझे ध्येय आहे. महायुती सरकारने घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांना सशक्त करेल आणि त्यांच्या जीवनात समृद्धी आणेल. ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेचा सातवा हप्ता हा शेतकऱ्यांसाठी नव्या आशेचा किरण आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा सरकारचा मानस आहे.
Maharashtra : नितीन गडकरींच्या ‘समृद्धी’ने अपघातांना लावले अंकुश
