महाराष्ट्र

Vijay Chordiya : कमळाची पाने गळली, धनुष्यबाणाची कमान ताणली

Yavatmal : गटबाजीच्या वादळात भाजपचे जहाज डगमगले

Post View : 28

Author

महाराष्ट्रातील राजकारण लोकांसाठी नवीन नाही. परंतु स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते आता तापत आहे. पक्षांतराची मालिका, बैठक सत्र, चर्चा या सर्व घडामोडी सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात रंगत आहेत.

राजकारणाच्या या रंगीबेरंगी पटावर कधी कोणता खेळाडू कोणत्या संघाकडे जाईल, याचा नेम नाही. एकेकाळी विचारधारा आणि निष्ठा हे राजकारणाचे आधारस्तंभ होते. पण आता ते फक्त इतिहासाच्या पानांपुरते उरले आहेत. आजकाल महत्वाकांक्षा आणि अपूर्ण स्वप्ने यामुळे नेते आणि कार्यकर्ते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात सहज उडी मारतात. जणू काही पक्ष हे फक्त निवडणुकीचे वाहन असावेत. गेल्या तीन-चार वर्षांत हे पक्षांतराचे नृत्य इतके वेगवान झाले आहे, की त्याला थांबविणे कठीण वाटते. विशेषतः मागील वर्षी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तर हे प्रमाण कमालीचे वाढले. महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गट आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला याचा सर्वाधिक फटका बसला. या दोन्ही पक्षांतून नेते आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात फुटून बाहेर पडले. जणू काही पक्षाच्या भिंतीत भेगा पडल्या असाव्यात.

आता महाराष्ट्रात महापालिका, नगरपालिका, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांची निवडणूक तोंडावर आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षांतराची ही स्पर्धा आणखी तीव्र होणार आहे. विशेषतः महायुतीत हे चित्र अधिक स्पष्ट दिसते. जिथे प्रत्येक पक्ष जास्तीत जास्त नेते आणि कार्यकर्त्यांना आपल्याकडे ओढण्यासाठी धडपडतो. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप हे दोन्ही सत्ताधारी आहेत. पण तरीही यवतमाळच्या वणी भागात शिंदे सेनेने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते विजय चोरडिया यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला. हे पक्षांतर म्हणजे राजकीय पटावरचा एक मोठा टर्निंग पॉइंट आहे. ज्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपला मागे ढकलले जाण्याची शक्यता वाढली आहे. या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वाखाली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

Gondia : पालकमंत्री पदाची धुरा आता इंद्रनील नाईक यांच्याकडे

राजकीय ट्रेंड बदलतोय

विजय चोरडिया हे यवतमाळमधील मोठे व्यावसायिक आणि भाजपच्या संघटनेत सक्रिय नेते म्हणून ओळखले जातात. मात्र, पक्षांतर्गत गटबाजी आणि मानसन्मानाच्या अभावामुळे त्यांनी ‘कमळ’ सोडून ‘धनुष्यबाण’ हाती घेण्याचा निर्णय घेतला. मुंबईत झालेल्या या पक्षप्रवेशात त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिंदे सेनेचा झेंडा उंचावला. आता स्थानिक निवडणुकीत धनुष्यबाणाच्या मदतीने निवडणुकीचा गड भेदणार आहेत. यामुळे यवतमाळमध्ये शिंदे गटाची ताकद कमालीची वाढली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ते अधिक आक्रमक भूमिका घेणार आहेत. या घटनेमुळे केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांना मोठा धक्का बसला आहे. भाजपने आधीच वणी विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघ गटबाजीमुळे गमावले आहेत.

आता चोरडिया यांच्या पक्षांतराने ते आणखी कमकुवत झाले आहेत. हे पक्षांतर म्हणजे आगामी निवडणुकींसाठी भाजपसाठी धोक्याची घंटा आहे. दुसरीकडे, शिंदे सेनेसाठी हा एक मोठा विजय आहे. विजय चोरडिया यांच्यासारख्या बड्या नेत्याच्या प्रवेशाने पक्षाची जडणघडण मजबूत होत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.राजकारणात असे पक्षांतर काही नवे नाही. पण अलीकडच्या काळात ते इतके वारंवार होत आहेत की, ते एक ट्रेंडच झाले आहे. यवतमाळसारख्या जिल्ह्यात, जिथे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते हे पक्षाच्या यशाचे आधार असतात, तिथे अशा घटना अधिक प्रभावी ठरतात. विजय चोरडिया यांनी पक्ष सोडण्यामागे पक्षांतर्गत गटबाजी हे मुख्य कारण सांगितले आहे. पक्षात मानसन्मान शिल्लक नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. हे फक्त चोरडिया यांचेच नाही, तर अनेक नेत्यांचे दुखणे आहे. महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात अशी असंतोषाची ठिणगी कधीही पेट घेऊ शकते.

Bacchu Kadu : प्रहारचा विषारी साप भाजपला डसला

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर यांनी नागपुरातील धनवटे नॅशनल कॉलेजमधून पत्रकारिता व जनसंज्ञापन विषयात पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. 2023-24 मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी द लोकहित लाइव्ह येथे आपल्या करीअरला सुरुवात केली.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!