महाराष्ट्र

भंडारा-गोंदियात Parinay Fuke यांच्या एन्ट्रीने चित्र बदलले

दोन्ही जिल्ह्यामध्ये Mahayuti विजयाच्या शिखरावर

Share:

Author

महाराष्ट्रात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. या विजयात विदर्भाचा वाटा मोठा आहे. त्यातच पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्याचे योगदान महत्वाचे आहे.

विधानसभा निवडणुकीत BJP मोठे यश मिळविण्यात यशस्वी झाली आहे. या यशात पूर्व विदर्भातील भंडारा-गोंदिया जिल्ह्याने मोठी भूमिका निभावली आहे. भाजपकडून या दोन्ही जिल्ह्यांची जबाबदारी माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ. परिणय फुके यांना देण्यात आली होती. ही जबाबदारी पेलण्यात डॉ. फुके यशस्वी झाल्याचे दिसत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा भंडारा गृहजिल्हा. पटोले यांना अवघ्या दोनशेच्या आसपास मतांनी मिळालेला विजय फुके यांच्या रणनीतीची ग्वाही देतो.

महायुतीचा धर्म पाळत डॉ. परिणय फुके यांनी गोंदियात विनोद अग्रवाल यांच्यासाठी विजय खेचून आणला. तिरोड्यात विजय रहांगडाले यांनाही यश मिळाले. आमगाव-देवरीत संजय पुराम यांनाही विजय मिळाला. मोरगाव अर्जुनी मतदारसंघात माजी मंत्री राजकुमार बडोले हे विजयी झालेत. बडोले हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात असले तरी ते पूर्वी भाजपमध्ये होते. आताही ते महायुतीचा घटक आहेत. त्यामुळे गोंदियातील यशातही परिणय फुके यांचा वाटा मोठा आहे.

जादू Parinay Fuke यांची; मधुकर कुकडे तिकडून इकडे

Home Pitch वर ताकद

भंडारा जिल्हा डॉ. परिणम फुके यांची ‘होम पीच.’ येथे महायुतीच्या उमेदवारांना भक्कम कौल मिळाला. अखेरच्या क्षणी दमदार एन्ट्री मारत फुके यांनी दमदार बॅटिंग केली. उमेदवारांसाठी विजय ओढुन आणला. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नरेंद्र भोंडेकर पुन्हा आमदार झालेत. तुमसर-मोहाडीतूनही राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू कारेमोरे यांनी युद्ध जिंकले. साकोलीत नाना पटोले यांना यश मिळाले. पण जो व्यक्ती मुख्यमंत्रिपदाचा दावेदार होता, तो अवघ्या 208 मतांनी जिंकणे बरेच काही सांगून गेला.

प्रचाराची धुरा यशस्वीपणे सांभाळत डॉ. परिणय फुके यांनी अविनाश ब्राह्मणकर यांची ताकद वाढविली. अखेरच्या क्षणापर्यंत नाना आणि ब्राह्मणकर यांच्यात चूरस सुरू होती. नानांना अक्षरश: दम लागला. राजकीय वैरी असलेले चरण वाघमारे भारत राष्ट्र समितीची मोटार पंक्चर झाल्याने नव्या पक्षाच्या शोधात होते. वाघमारे शरद पवारांसोबत गेले. मात्र फुके यांनी त्यांच्या तुतारीचीही पुंगी वाजविली. योग्य व्यूहरचना करीत राजू कारेमोरे यांच्यासाठी देखील काम केलं. त्यामुळं फुके यांची मदत अनेकांना मोलाची ठरली. विशेषत: नरेंद्र भोंडेकर यांच्यासाठी तर डॉ. परिणय फुके नवसंजीवनी आणणारे हनुमानच ठरले. या सगळ्यामुळे फुके यांचे भाजपमधील वजन वाढले आहे. महायुतीचे सरकार आल्यानंतर डॉ. फुके यांना नक्कीच याचा परतावा मिळेल यात संशयच नाही. सध्यापेक्षा मोठी जबाबदारीही त्यांच्या खांद्यावर दिली जाऊ शकते.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!