महाराष्ट्र

बालकापासून आजोबांपर्यंत सगळेच Parinay Fuke यांना म्हणाले, मिळाले उडण्याचे पंख

सामाजिक उपक्रमातून Bhandara मध्ये साजरा केला वाढदिवस

Share:

Author

राजकीय नेत्याचा वाढदिवस म्हणजे शक्ती प्रदर्शनाचा दिवस असं म्हटलं जातं. हारतुरे, स्वागत सत्कार, पेढेतुला यातच त्यांचा दिवस जातो. परंतु आमदार डॉ. परिणय फुके यांनी आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमातून स्पेशल केला.

आपल्या आगळ्यावेगळ्या कार्यशैलीमुळं आमदार डॉ. परिणय फुके सुपरिचित आहेत. राजकीयपेक्षा सामाजिक क्षेत्रात त्याचं नावलौकिक सर्वाधिक आहे. राजकीय पुढाऱ्यापेक्षा फुके हे सर्वसामान्यांना ‘दादा’ म्हणूनच आपलेसे वाटतात. फुके यांनीही आपल्या कामातून अशीच प्रतिमा तयार केली आहे. त्यामुळे पाय जमिनीवर ठेवत सामान्यांच्या हितासाठी उंच झेप घेण्यात ते आजपर्यंत यशस्वी झाले आहेत. अशाच साधेपणाचा परिचय त्यांनी पुन्हा एकदा दिला. निमित्त होतं त्यांच्या वाढदिवसाचं.

आमदार डॉ. परिणय फुके यांचा वाढदिवस नुकताच साजरा झाला. फुके यांनी यावेळी बडेजावपणा न करता सामाजिक उपक्रम राबविले. कुठे दिव्यांगांना ई-सायकलचं वितरण करण्यात आलं, तर कुठे ज्येष्ठांचा चष्म्यांचं. कर्णदोष असलेल्या ऐकू येईल यासाठी यंत्राचंही वितरण करण्यात आलं. बच्चे कंपनीपासून आजी-आजोबांपर्यंत अनेकांनी यावेळी आमदार फुके यांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या काही चाहत्यांनी त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमाही भेट दिली. अनेकांनी केक कापत आनंद व्यक्त केला. प्रचंड गराडा असतानाही फुके प्रत्येकाशी तितक्यात आपुलकीनं संवाद साधताना दिसून आलेत.

शब्दाची Commitment महत्वाची मानणारा सामाजिक डॉक्टर

अत्यंत खास Birthday

वाढदिवसानिमित्त लाडक्या बहिणींनी परिणय फुके यांना औक्षणही केलं. महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक मोठ्या नेत्यांनी यावेळी फुके यांना शुभेच्छाही दिल्या. अत्यंत विश्वासू सहकारी असल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फुके यांना आवर्जुन शुभकामना दिल्या. फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्टही टाकली. भाजपच्या अनेक नेत्यांनीही त्यांना सदिच्छा दिल्या. एमबीए, पी.एचडी. असं उच्च शिक्षण घेतलेल्या आमदार फुके यांनी प्रत्येक कार्यकर्त्याला जपलं आहे. त्यातूनच त्यांना भंडारा-गोंदिया जिल्ह्यात महायुतीच्या यशाचा मार्ग प्रशस्त करण्याचं ‘मॅनेजमेंट’ जमलं आहे. गरजवंतांना मदत आणि सामान्यांना त्रास देणाऱ्यांना योग्य ‘इंजेक्शन’ टोचण्यातही फुके मागेपुढं पाहत नाहीत. स्वत: पी.एचडी. असल्यानं कोणत्याही मुद्द्यावर सखोल ‘रिसर्च’ ही त्यांच्या अभ्यासू वृत्तीची जमेची बाजू आहे.

डॉ. परिणय फुके यांच्या या अष्टपैलू व्यक्तीमत्वामुळंच भंडारा-गोंदिया जिल्ह्यात त्यांच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतीच आहे. त्यातूनच त्यांचा वाढदिवस सगळ्यांनी एकत्र येत अगदी ‘स्पेशल’ केला. फुके यांनी देखील हा प्रत्येक क्षण हृदयात साठवला आहे. या प्रत्येक क्षणाचे अविस्मरणीच फोटोंनाही त्यांनी आपल्या फेसबुकवर कायमचं स्थान दिलं आहे. आपल्या लाडक्या दादाच्या वाढदिवशी भंडाऱ्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या प्रत्येकानं स्मृतींचं एक सुगंधी फुल परिणय फुके यांना भेट स्वरूपात दिलं आहे. स्मृतींचा हा सुगंध कायम आपल्या स्मरणात राहिल, अशी प्रतिक्रिया यानिमित्तानं आमदार फुके यांनी व्यक्त केली.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!