
भंडाऱ्यात एका खासगी बँकेचा मॅनेजर लकी होता होता ‘अनलकी बास्कर’ बनला. बँकेच्या पाच कोटींच्या रकमेची हेराफेरी करताना भंडारा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं.
दक्षिणात्य चित्रपट लकी बास्कर मध्यंतरीच्या काळात चांगलाच गाजला. यात मुख्य भूमिकेत असलेला नट दुल्कर सलमान एका खासगी बँकेत कॅशियर असतो. आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी तो बँके तील पैशांच्या आर्थिक घोटाळ्यात अडकत. यावर या चित्रपटाचं कथानक आहे. घोटाळा करून कमाविलेल्या पैशांनी शेवटी हा अभिनेता विदेशात सेटल झाल्याचं दाखविण्यात आलं. असाच एक लकी बास्कर भंडाऱ्यात तयार होणार होता. परंतु पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळं तो अनलकी बास्कर ठरला.
आर्थिक उन्नती साधण्यासाठी भंडाऱ्यातील एका खासगी बँकेत काम करणाऱ्या मॅनेजरनं रकमेत झोल सुरू केला. तुमसर येथे या बँकेची शाखा आहे. पोलिसांना याबाबत कळल्यानंतर त्यांनी वेगानं तपास केला. त्यानंतर या अनलकी बास्करच्या हाती कॅश नव्हे तर बेड्या पडल्या. मंगळवार, 4 फेब्रुवारी दुपारी अचानक भंडारा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांचा फोन वाजला. त्यांना तुमसरमधील एका लाँड्री दुकानात पाच कोटी रुपयांचाी रोकड ठेवण्यात आल्याची माहिती मिळते. त्यानंतर नुरूल हसन तातडीनं कामाला लागतात. पोलिस अधीक्षक हसन यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळं बँकेची रक्कम रफादफा होण्यापूर्वीच पकडली जाते.

पाच कोटींच्या रकमेची हेराफेरी करताना #Bhandara जिल्ह्यातील तुमसर येथील अॅक्सिस बँकेच्या मॅनेजरसह नऊ जणांना अटक.#nagpur #BankScam #AxisBank #maharashtra #maharashtranews pic.twitter.com/ZomZC3aChL
— The Lokhit Live (@thelokhitlive) February 5, 2025
कडकी धुण्याचा प्रयत्न
भंडाऱ्यातील खासगी बँकेत नोकरी करणारा मॅनेजर आपल्या आयुष्याची कडकी दूर करण्याच्या बेतात होता. तळहाताच्या रेषांवर असलेली कडकीची रेषा धुण्यासाठी त्यानं पाच कोटी एका लाँड्रीच्या दुकानात ठेवले. तुमसर येथील इंदिरा चौकात एक छोटेसे हे दुकान होतं. दुकानाचं नाव राजकमल लाँड्री. सगळं काही सुरळीत सुरू असतानाच अचानक अचानक सायरन वाजवत पोलिसांचा दुकानात प्रवेश होतो. त्यानंतर पोलिस छडती घेतात. पोलिसांना झडतीत चार बँगा सापडतात. बँग उघडताच त्यातील नोटांचे बंडल पाहून पोलिसांचेही डोळे विस्फारतात. त्यात पाच-पन्नास लाख नव्हे तर तब्बल पाच कोटी रुपये असतात. रोकड कोणाची, याचा तपास सुरू होतो. एकएक कडी जुळवत पोलिस पोहोचतात खऱ्या गुन्हेगारापर्यंत
एका खासगी बँकेच्या कॅश व्यवस्थापक पोलिसांच्या जाळ्यात मुख्य गुन्हेगार म्हणून अडकतो. त्यानंतर उलगडते अनलकी बास्करचं कथानक. पाच कोटी रुपयांच्या बदल्यात सात कोटी आरटीजीएस करून मिळण्याच्या आमिषाला हा व्यवस्थापक बळी पडलेला असतो. त्यानंतर पोलिस पोहोचतात तुमसर येथील अॅक्सीस बँकेच्या शााखेत. या बँकेचा मॅनेजर ‘ब्लॅकमनी’ कायद्याच्या चौकटीत बसवून देण्याच्या नादात हे काम करत असल्याचं पोलिसांना आढळतं. बँकेतील पाच कोटी रूपये कोणतीही सूचना न देता त्यानं परस्पर विड्रॉल केलेले असतात.
पाच कोटींची ही रोकड हा मॅनेजच राजकमल आर्ट ड्रायक्लिनर्सच्या दुकात ठेवतो. पण पोलिसांना कोण कसे जाणे माहिती होतेच. अन् मग पोहोचतात ‘कानुन के लंबे हात’ बँक मॅनेजरपर्यंत. पोलिस ड्रायक्लिनर्सच्या दुकानात छापा टाकतात. आमिषाला बळी पडलेल्या मॅनेजरचे पाच कोटीही जातात अन् नोकरीही. आरटीजीएस करून ही रोकड आरोपींना मिळणार होती. त्यामुळं आयुष्यभराची तंगी जाणार होती. पण नियतीला पैसे कमाविण्याचा हा ‘शॉर्टकट’ मान्य नव्हता. आता या प्रकरणी पोलिसांनी नऊ जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
सगळेच कोठडीत
तपास केल्यानंतर पोलिसांनी विनीत विशंभरलाल कक्कड, चंद्रशेखर सुधाकर धाबु, शुभम नरेंद्र नागदेवे, मिलिंद वीरेंद्र रामटेके, सागर रामकृष्ण मुलतानी, राजा सुरेंद्र खोब्रागडे, शुभम अनिल रंगारी, गौरीशंकर फुलचंद बावनकुळे, विशाल तेजराम ठाकरे, जगदीश शंकरराव काटकर यांना अटक केली आहे. पैशांची ही हेराफेरी हवालातून होती असा पोलिसांना संशय आहे. भंडारा पोलीस याचा तपास करीत आहेत. त्याचे धागेदोरे गोंदिया, छतीसगड, दिल्लीपर्यंत जात असल्याचं दिसत आहे. तपासानंतर आरोपीची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचं पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी सांगितलं. पाच कोटी इकडेचे तिकडे करू. कोणाला कानोकार खबरही होणार नाही. हाच विचार खासगी बँक मॅनेजर आणि हवालावाल्यांच्या मनात होता. मॅनेजरला आपण लकी बास्कर होणार याचा विश्वास होता. पण म्हणतात ना सिनेमा सिनेमा असतो आणि ‘रिअल लाइफ’ त्यापेक्षा वेगळी.