महाराष्ट्र

Yavtmal : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी संजय राठोड मैदानात

Vidarbha : भाजपच्या बालेकिल्ल्यात भगव्या झेंड्याची नवी लाट

Author

निवडणुकीचे वारे जोर धरू लागले असताना यवतमाळमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जोरदार हालचाली सुरू आहेत.

विदर्भ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. या भागात आता शिवसेना एकनाथ शिंदे गटाने आपली पकड मजबूत करायला तयारी सुरू केली आहे. यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे कार्यकर्त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. यामुळे आता इतर पक्षात राजकीय लढतीचे नवे चॅलेंज उभे राहतंय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये विजय मिळवण्यासाठी शिवसेना तयारीला लागली आहे. संजय राठोड यांनी आता पक्ष वाढवायला सुरुवात केली आहे.

काही आठवड्यापूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यवतमाळ दौऱ्यावर होते. तेव्हा यवतमाळच्या पोस्टल मैदानावर झालेल्या जाहीर सभेत शिंदे यांनी शिवसैनिकांना एक महत्त्वपूर्ण संदेश दिला होता. आपण गाफील न राहता निवडणुकीत भगवा फडकवायला हवा. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि पक्षाचे धोरण लोकांपर्यंत पोहोचवा. यशासाठी आतापासूनच कामाला लागा असं शिंदे यांनी सांगितलं होते. पालकमंत्री संजय राठोड यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना संघटना मजबूत करण्याच्या दिशेने मार्गदर्शन केलं.

Salil Deshmukh : अमरावती विमानतळाला कृषी मंत्र्यांचे नाव द्या

सदस्य नोंदणीला गती

यवतमाळमधील राधामंगलम सभागृहात झालेल्या शिवसेना जिल्हा पदाधिकारी मेळाव्यात ते म्हणाले. आपल्या कर्तव्यात सातत्य, वेळ आणि सचोटीने काम केल्यास प्रत्येक स्वप्न पूर्ण होईल. शिवसेनेचा भगवा घराघरात पोहोचवण्यासाठी आपल्याला खूप कष्ट घ्यावे लागतील. राठोड यांचा मुख्य उद्देश कार्यकर्त्यांना सक्रिय करून, त्यांच्या घराघरात पक्षाचे सदस्य नोंदवून पक्षाची ताकद वाढवणे आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या यादीत प्रत्येक मतदार संघाच्या घराघरात शिवसेनेचे सदस्य नोंदवले जाऊ शकतात असं ते म्हणाले.

आपण एकत्र येऊन कार्य करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर पक्षाच्या वाढीसाठी आम्हाला चांगले परिणाम मिळवता येतील असंही राठोड यांनी स्पष्ट केलं. शिवसेनेचा विश्वास आहे की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी जिद्दीने काम करेल. शिवसेनेच्या प्रत्येक सदस्याला एक लक्ष ठरवून काम करावं लागेल. प्रत्येक गावात शिवसेना आणि प्रत्येक घरात शिवसैनिक हा बाळासाहेब ठाकरे यांचा स्वप्न पूर्ण करणे आपल्याला गरजेचे आहे. या स्वप्नाची गती ध्येयावर केंद्रित करावी लागेल असं राठोड यांनी सांगितलं.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!