महाराष्ट्र

Akola : आमदाराला शिवीगाळ; आधी बदली आता निलंबन

Harish Pimple : वर्धित होता मान-गौरव, पण वाणीने घातला सगळा घोळ

Author

अकोला जिल्ह्यात राजकीय वर्तुळात खळबळ उडवणाऱ्या प्रकरणात, बार्शीटाकळी पोलीस निरीक्षक प्रकाश तुनकलवार यांना आमदार हरीश पिंपळे यांच्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. अशोभनीय भाषा आणि शिस्तभंगामुळे ही कारवाई करण्यात आली असून प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश तुनकलवार यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकले यांनी बुधवार 23 एप्रिल रोजी हा निलंबन आदेश जारी केला. तुनकलवार यांच्यावर मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे आणि कार्यकर्त्याशी असभ्य भाषेत बोलल्याचा आरोप करण्यात आला आहे.

अकोल्यातील हे प्रकरण पशू तस्करीशी संबंधित आहे. पशु तस्करी करणाऱ्यांवर कुठलीही कारवाही न झाल्यास आमदार हरीश पिंपळे यांनी पोलीस निरीक्षक तुंकलवार यांच्याशी संपर्क साधला. परंतु पोलीस निरीक्षकाने आमदार पिंपळे यांनाच शिवीगाळ केली. त्या अनुषंगाने वाद निर्माण झाला होता. या वादात पोलीस निरीक्षक तुनकलवार यांनी आमदार हरीश पिंपळे आणि पक्ष कार्यकर्ता हरीश वाघ यांच्याशी अशोभनीय आणि अवमानजनक भाषेत संवाद साधल्याचा आरोप आहे. याबाबतची एक ऑडिओ क्लिपही सोशल मिडियावर प्रसारित झाली. त्यामुळे संपूर्ण राजकीय आणि पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मुख्यमंत्र्यांना तक्रार

आमदार पिंपळे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे याबाबत तक्रार दाखल केली होती. यानंतर तातडीने अकोल्याचे प्रभारी पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांनी 21 एप्रिल रोजी तुनकलवार यांची बदली नियंत्रण कक्षात केली होती. मात्र, प्रकरणाची गांभीर्य लक्षात घेता विशेष पोलीस महानिरीक्षक पोकले यांनी तुनकलवार यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई केली.

Prashant Padole : गोंदियाला रेल्वे कनेक्टिव्हिटीच्या विस्ताराची नवी दिशा

निलंबन आदेशात नमूद करण्यात आले आहे की, पोलीस निरीक्षक तुनकलवार यांनी अत्यंत अशोभनीय आणि पोलीस खात्याच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारे वर्तन केले. त्यांच्या या वागणुकीमुळे संपूर्ण पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाली आहे. याशिवाय, एका संशयित वाहनाची तपासणी करूनही ती माहिती पोलीस स्टेशनच्या डायरीत नोंदवली नाही, हे त्यांच्या गैरजबाबदारपणाचे प्रतीक आहे.

निलंबनामुळे बार्शीटाकळी परिसरात आणि अकोला जिल्ह्यातील पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पातळीवरून झालेली ही कारवाई प्रशासनाच्या शिस्तप्रियतेचे उदाहरण ठरली आहे, असे मत काहींचे आहे. दुसरीकडे, या प्रकरणात अजून काही बाबी पुढे येण्याची शक्यता आहे. पोलीस निरीक्षक तुनकलवार यांच्याविरोधात आणखी चौकशी सुरू असल्याची माहितीही समोर येत आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!