महाराष्ट्र

Parinay Fuke : हक्काच्या प्रत्येक थेंबासाठी झुंज

Bhandara : गोसेखुर्दच्या तळातून न्यायाचा आवाज

Post View : 77

Author

शेती गेली, आशा हरवली, पण आता प्रकल्पग्रस्तांच्या जीवनात उजेड देण्यासाठी माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके पुढे आले आहेत. गोसेखुर्द प्रकल्पातील वर्षानुवर्षांच्या समस्या मिटवण्यासाठी त्यांनी दिला ठोस, विश्वासार्ह आणि निर्णायक पुढाकार.

समस्यांची मालिका फोडण्याची क्षमता ज्याच्याकडे असते, तोच खरा नायक ठरतो लोकांच्या विश्वासाचा. अशाच एका निर्णायक आणि दूरदृष्टीपूर्ण पावलांनी भंडाऱ्याच्या जनतेच्या आशा पल्लवित करणारे भाजप नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या दीर्घकाळापासून प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. नागपूर येथील सिंचन भवनात आयोजित बैठकीत त्यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करत धरणग्रस्तांच्या हक्कासाठी ठोस भूमिका मांडली.

गेल्या अनेक वर्षांपासून गोसेखुर्द प्रकल्पामुळे नुकसान सहन करणाऱ्या खैरी, संगम, मुंढरी, भोजापूर, ओपरा, राजनी, गवराळा, डांबेवीरली यांसारख्या गावांच्या पुनर्वसन, नुकसान भरपाई, अर्धवट राहिलेल्या कालव्या कामांपासून ते उपसा सिंचन योजनांपर्यंत सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली. विशेषतः मोहाडी तालुक्यातील मुंढरी गावाचे पुनर्वसन, भोजापूर येथील बॅक वॉटरमुळे धोकादायक स्थितीत आलेल्या घरांचे संपादन आणि लाखांदूर तालुक्यात अर्धवट राहिलेल्या कालव्यांच्या तातडीच्या पूर्णतेवर भर देण्यात आला.

Operation Sindoor : पाकमध्ये ‘मातम’; काही मिनिटांत जम्मूत वीज सुरू

माणुसकीची लढाई

डॉ. फुके यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, प्रकल्पामुळे शेती गमावलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. ही फक्त विकासाची नव्हे, तर माणुसकीची लढाई आहे. त्यांच्या नेतृत्वात मांडण्यात आलेल्या प्रस्तावांमध्ये कन्हान नदीवरील पाण्याचा उपसा करून पिपरी, चिचोली, लोहारा, भंडारा, मोहाडी तालुक्यांतील 70 गावांमध्ये सिंचन सुविधा पोहोचवण्याची महत्वाकांक्षी योजना देखील आहे.

आथली, आसोला, परसोडी, मांदेड, सावरगाव यांसारख्या कालव्यालगतच्या गावांमध्ये लहान पाटचऱ्यांचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. प्रकल्पातील गट क्रमांक 205/3 आणि 241 मधील जमिनीचे संपादन प्रक्रियेस लवकरच गती मिळेल, असे आश्वासनही डॉ. फुके यांनी दिले. धारगाव उपसा सिंचन योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला मान्यता मिळाल्यास भंडारा जिल्ह्यातील 49 गावे सिंचनाच्या दृष्टीने सक्षम होतील, अशी ठोस मागणीही या बैठकीत झाली.

Operation Sindoor : दात घशात घातले; लाहोर, इस्लामाबाद, बाजवाडवर बॉम्बवर्षा

या निर्णायक बैठकीस व्हीआयडीसीचे कार्यकारी संचालक सोनटक्के, मुख्य अभियंता आर. जी. पाटील, अधीक्षक अभियंता विश्वकर्मा, कार्यकारी अभियंते सुहास मोरे, अंकुश कापसे, जितेंद्र तुरखेडे, ढुमने यांच्यासह अनेक नागरिक आणि स्थानिक प्रतिनिधी उपस्थित होते.

डॉ. परिणय फुके यांच्या सक्रिय हस्तक्षेपामुळे आशेचा किरण दाखवणाऱ्या या बैठकीने प्रकल्पग्रस्तांच्या जीवनात एक नवा प्रकाशफुल अंकुर फुलवला आहे. आज त्यांच्या नेतृत्वात निर्माण झालेली सकारात्मक दिशा, केवळ भंडाऱ्यातच नव्हे, तर संपूर्ण विदर्भाच्या ग्रामीण विकासाला एक नवी दिशा देऊ शकते.

Nagpur : महापालिका निवडणुकीत ओबीसी जागांसाठी आरक्षण

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित यांनी अनेक वर्ष सकाळ माध्यम समूहासोबत रिपोर्टर म्हणून काम केलं. साम टिव्हीचे ते रिपोर्टर होते. याशिवाय सरकारनामा या सकाळ समूहाच्या राजकीय वेब पोर्टलचे प्रतिनिधी देखील होते.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!