महाराष्ट्र

Akola Shiv Sena : जिल्हा प्रमुख बदलण्याची ‘सेठ’ची मागणी धुडकावली

Gopikishan Bajoriya : साजिद पठाणसाठी काम केल्याचा आरोप पुन्हा ऐरणीवर

Post View : 43

Author

गेल्या काही दिवसांपासून अकोला जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्याविरोधातील वाद चांगलाच चिघळला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

अकोल्यातील शिवसेना एकनाथ शिंदे गटामध्ये सध्या मोठी राजकीय धुमटचक्री सुरू आहे. महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर पक्षामध्ये संपर्कप्रमुख तथा माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या विरोधात बंड पेटले आहे. आपल्या धनशक्तीच्या जोरावर संपर्कप्रमुख गोपीकिशन बाजोरिया यांनी शिवसेनेतील काही नेत्यांना मॅनेज केल्याचा आरोप झाल्यानंतर,अकोल्यामध्ये कार्यकर्त्यांनी त्यांचा पुतळा जाळला, बॅनर फाडले आणि त्यांना तातडीने पदावरून हटवावे अशी मागणी केली. या घटनेनंतर काही तासांपूर्वी गोपीकिशन बाजोरिया हे शिवसेनेच्या सर्वोच्च नेत्यांच्या भेटीला गेले. त्यावेळी त्यांनी जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर आणि अश्विन नवले यांना पदावरून हटवण्याची मागणी केली. परंतु शिवसेनेच्या सर्वोच्च नेतृत्वाने संपर्कप्रमुख बाजोरिया यांच्या सर्व मागण्या धुडकावून लावल्या आहेत.

शिवसेनेच्या अकोल्यातील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी संपर्कप्रमुखांच्या विरोधात उघडपणे तक्रार केली आहे. पक्षाच्या नावाने आलेला निधी कुठे वापरला गेला, कोणी पक्षाच्या कार्यक्रमांसाठी किती पैसा खर्च केला याचा आढावा घेतल्यानंतर लवकरच माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या अधिकार क्षेत्राचा संपर्क ‘प्रायव्हेट लिमिटेड’ करण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया हे शिवसेनेमध्ये मर्यादित काम करतांना दिसतील अशी शक्यता निर्माण झाली आहे. 19 जूनला शिवसेनेचा स्थापना दिवस साजरा होत आहे. या दिवशी राज्यभरातील कार्यकारणीमध्ये व्यापक फेरबदल करण्यात येणार आहे. यामध्ये नागपूर, अमरावती, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्याचा देखील समावेश आहे.

Shiv Sena : स्थापना दिनाला एकनाथ शिंदे देणार ‘सरप्राइज गिफ्ट’

नेतृत्वाच्या भूमिकेचा अभ्यास

काही जिल्ह्यांमध्ये संपर्क प्रमुख बदलणार येणार आहेत. तर काही जिल्ह्यांमध्ये संपर्क प्रमुखांचे अधिकार मर्यादित करण्यात येणार आहेत. त्यामध्ये अकोल्याचा समावेश आहे. लवकरच अकोल्यामध्ये महापालिका आणि जिल्हा परिषदेची निवडणूक होणार आहे. अशा परिस्थितीमध्ये माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया हे महाविकास आघाडीसाठी काम करतील असा थेट आरोप करण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीच्यावेळी बाजोरिया यांनी महाविकास आघाडीचे उम्मेदवार साजिद खान पठाण यांच्यासाठी काम केल्याचा आरोप आजही त्यांच्यावर होतो. साजिद खान यांच्या मदतीने महाविकास आघाडीचे जास्तीत-जास्त नगरसेवक महापालिकेमध्ये पाठवायचे आणि त्यानंतर विधान परिषद निवडणुकीसाठी आपला मार्ग मोकळा करायचा असा कट बाजोरिया यांनी रचल्याचा आरोप शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांकडून करण्यात आला होता.

आरोपाला बळकटी देणारे अनेक पुरावे स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून शिवसेनेच्या सर्वोच्च नेत्यांकडे पाठवण्यात आले. हे सर्व पुरावे आणि एकूणच बाजोरिया यांच्या कामाचा हिशोब घेतल्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी बाजोरिया यांच्या मागणीच्या आधारे श्रीरंग पिंजरकर आणि अश्विन नवले यांना पदावरून हटविण्यास नकार दिला आहे. इतकेच नव्हे तर शहरप्रमुख रमेश गायकवाड यांचेही पद कायम राहणार आहे. अलीकडेच शिवसेनेमध्ये माजी आमदार नारायण गव्हाणकर आणि चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी प्रवेश केला होता. त्यांनाही जिल्हाप्रमुख पद देण्यात आले. त्यामुळे अकोला जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे चार जिल्हाप्रमुख झाले आहे. शिवसेनेच्या इतिहासात आजपर्यंत कधीही एका जिल्ह्यामध्ये चार जिल्हाप्रमुख झाले नव्हते. मात्र अकोला याला अपवाद ठरले.

Akola Politics : अकोल्यात शिंदे – ठाकरे गट फुटीच्या उंबरठ्यावर 

आता नेमलेले नवीन दोन जिल्हाध्यक्ष धनशक्तीसाठी नव्हे तर पक्ष वाढीसाठी काम करतील अशी व्यवस्था उपमुख्यमंत्री तथा शिवसेनाप्रमुख एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी करून ठेवली आहे. 19 तारखेनंतर हे बदल मोठ्या प्रमाणावर दिसणार आहे. त्यामुळे अकोला जिल्हा शिवसेनेमध्ये निर्माण झालेल्या नाराजी नाट्यांवर आता पडदा पडण्याची शक्यता आहे.

Ashish Deshmukh : शेतकऱ्यांच्या सुखासाठी आमदारांचा थेट मातीशी संवाद

प्रसन्न जकाते | Prasannaa Jakate

प्रसन्न जकाते | Prasannaa Jakate

मातृभूमी (अकाेला), सकाळ (अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशीम, अमरावती), दैनिक भास्कर हिंदी (मराठवाडा वृत्त विभाग प्रमुख) , महाराट्र टाइम्स (नागपूर), भास्कर समूहाचे मराठी दैनिक दिव्य मराठी (अमरावती), सकाळ माध्यम समूहाचे पॉलिटिकल वेब पोर्टल सरकारनामा असा प्रसन्न यांचा पत्रकारितेचा सुमारे 26 वर्षांचा प्रवास आहे. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या हस्ते प्रसन्न यांचा शोध प्रबंध भुवनेश्वर येथील भारतीय विज्ञान मेळाव्यात प्रकाशित करण्यात आला. क्राइम रिपोर्टिंग पासून आपल्या पत्रकारितेचा प्रवास सुरू करणाऱ्या प्रसन्न यांनी गडचिरोली, छत्तीसगडमधील बक्स, अबुजमाड या नक्षलवाद्यांची भीषण दहशत असलेल्या भागात ग्राऊंड रिपोर्टिंग केले आहे. उत्तर प्रदेश, दिल्ली, मध्य प्रदेश येथील अनेक निवडणुकीचे रिपोर्टिंगही त्यांनी केले आहे. महाराष्ट्रातून स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट (सिमी) आणि दिनदार-ए-अंजुमन या दोन प्रतिबंधित संघटनांचे नेटवर्क उद्ध््वस्त करणारे रिपोर्टिंगही त्यांनी केले. मुंबई हल्ल्यातील दहशतवादी याकुब मेमन याच्या फाशीच्या घटनेचे ‘ऑन द स्पॉट’ आणि कुठेही न प्रकाशित झालेले वार्तांकनही त्यांनी नागपूर येथे केले.

More Posts

Follow Me:Add me on XAdd me on Facebook

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!