महाराष्ट्र

Akola : स्वच्छ सौरऊर्जेसाठी तांत्रिक भरारी

PDKV Drone Project : मेड इन 'अकोला’ ते मेड फॉर 'इंडिया’

Author

कधीकाळी मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जाणारा अकोला जिल्हा आता विकासाच्या मार्गावर वेगाने वाटचाल करत आहे. कृषी विभागासाठी अकोला जिल्ह्यात नवकल्पनांवर आधारित अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे.

अकोला जिल्ह्याने विकसनाच्या शर्यतीत मागे राहण्याचा कल मोडीत काढत आता एका क्रांतिकारी यशाने देशाचं लक्ष वेधलं आहे. ‘प्रधानमंत्री सूर्यघर’ योजनेंतर्गत सौरऊर्जेचा प्रसार झपाट्याने वाढत असताना, या योजनेला बळकटी देणारी एक महत्त्वपूर्ण कामगिरी अकोल्यातून घडली आहे. पारंपरिक अडथळ्यांना मागे टाकत, सौर पॅनेल्सच्या देखभालीसाठी एक अत्याधुनिक आणि स्वदेशी ऑटोमॅटिक ड्रोन विकसित करण्यात आला आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयातील ‘रिसर्च अँड इन्क्युबेशन फाउंडेशन’ आणि अकोल्यातील ‘इंडियन ड्रोन रिसर्च अँड डेव्हलपमेंट’ या कंपनीच्या संयुक्त प्रयत्नातून हे नावीन्यपूर्ण ड्रोन तंत्रज्ञान साकारले आहे. या ड्रोनच्या साहाय्याने अवघ्या ३० मिनिटांत १ मेगावॉट क्षमतेचा सौर प्रकल्प स्वच्छ करता येतो, तेही संपूर्ण स्वयंचलित पद्धतीने. सौर पॅनेल्सच्या कार्यक्षमतेवर थेट परिणाम करणाऱ्या धुळीमुळे अनेक प्रकल्पांमध्ये ऊर्जा उत्पादनात घट होते. पॅनेल्स ज्या इमारतींच्या छतांवर बसवले जातात.

Akola Shiv Sena : अकोल्याची सूत्रं ‘काकां’कडे की थेट मुंबईत?

हरित भारताची नांदी

तेथे स्वच्छतेचं काम अधिक कठीण आणि वेळखाऊ असतं. यावर उपाय शोधत पीडीकेव्ही आरआयएफचे संचालक डॉ. एस.आर. काळबांडे आणि इंडियन ड्रोन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आशीष हांडे यांच्या नेतृत्वाखाली अत्याधुनिक ड्रोन विकसित करण्यात आला. या ड्रोनद्वारे सौर पॅनेल्सच्या स्वच्छतेसाठी लागणारा वेळ, श्रम आणि पाण्याचा अपव्यय पूर्णतः टाळता येतो. हे तंत्रज्ञान पूर्णपणे पर्यावरणपूरक असून त्याद्वारे पॅनेल्सच्या कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ होते. पारंपरिक पद्धतीत खर्च होणाऱ्या मनुष्यबळाच्या तुलनेत हे नवतंत्रज्ञान अधिक फायदेशीर ठरते.

कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या मार्गदर्शनात विकसित झालेल्या या जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिक चाचणीही यशस्वी झाली आहे. या ड्रोनचा वापर सौर प्रकल्पांच्या नियमित देखभालीसाठी करणे सहज शक्य होणार आहे. देशभरातील सौर ऊर्जा प्रकल्पांमध्ये याला मोठी मागणी येण्याची शक्यता आहे. आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया आणि हरित ऊर्जा धोरणाच्या दिशेने टाकलेलं हे पाऊल भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रात मैलाचा दगड ठरू शकतो. या उपक्रमाबद्दल बोलताना भाजपचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण म्हणाले, अकोला जिल्ह्यातून अशा नावीन्यपूर्ण संकल्पना जन्म घेत असल्या तरच महाराष्ट्र आणि भारताचा हरित भविष्याचा मार्ग अधिक सुकर होणार आहे.

Shiv Sena : स्थापना दिनाला एकनाथ शिंदे देणार ‘सरप्राइज गिफ्ट’

या प्रकल्पातून एक गोष्ट स्पष्ट होते. जर दृष्टी आणि दिशा योग्य असेल, तर मागे राहिलेला भागसुद्धा तंत्रज्ञानाच्या आघाडीवर झेप घेऊ शकतो. अकोल्याची ही झेप, केवळ जिल्ह्यापुरती नाही, तर संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!