महाराष्ट्र

Sanjay Gaikwad : पैशासाठी मुली विकायला लावणाऱ्या सावकारांचा भांडाफोड

Shiv Sena : आमदाराचा पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर

Post View : 41

Author

नेहमीच आपल्या परखड, रोखठोक आणि वादग्रस्त विधानांसाठी ओळखले जाणारे शिवसेना शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करत राजकारणात जोरदार खळबळ उडवली आहे.

नेहमीच आपल्या थेट आणि बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत असलेले शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचा यंदाचा दावा पुन्हा एकदा राजकारणात खळबळ उडवणारा ठरला आहे. राज्यात त्यांच्या पक्षाची सत्ता असून, गृहमंत्री देखील त्यांच्या गटात असतानाही त्यांनी पत्रकार परिषद घेऊन एक गंभीर आणि धक्कादायक आरोप मांडला आहे. त्यांनी एका सावकाराविरुद्ध अवैध कर्जव्यवहार आणि आदिवासी बांधव, महिलांवर होत असलेल्या अत्याचारांची माहिती दिली. संजय गायकवाड यांच्या आरोपानुसार, बुलढाण्यातील तारापूर बोरखेड या आदिवासी बहुल गावातील सुनील बुरड नावाचा एक सावकार कर्ज फेडता न आल्यामुळे अवैध सावकारीचा धंदा करत आहे.

कर्जदार महिलांची मुली राजस्थानमध्ये विकायला लावल्याचा भयंकर आरोप त्यांनी केला आहे. या सावकाराने तर एका १२ वर्षांच्या मुलीवर अतिप्रसंग केला असल्याचा देखील दावा केला आहे.राज्यातील अनेक शेतकरी, मजूर आणि गरिबांच्या त्रासामागे अशाच अवैध सावकारी व्यवसायाचा हात असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. मात्र, या प्रकारात बड्या लोकांचा, पोलीस अधिकाऱ्यांचा संरक्षणामुळे सावकार सहज पोलीस दंडकाच्या जाळ्यातून सुटत असतात. त्यामुळे वेळेवर त्यांच्यावर कारवाई होणं शक्य होत नाही. परंतु यावेळी आमदारांनी स्वतःच सावकारांविरुद्ध ठसठशीत भूमिका घेत गंभीर आरोप मांडल्यामुळे या प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे.

Maharashtra : एचएसआरपी लावायची अंतिम घंटा वाजली

मुख्यमंत्र्यांना खुले आव्हान

संजय गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, सावकारकीचा कर्जदारांवर आणि विशेषतः शेतकऱ्यांच्या बायका आणि मुलींवर अत्याचार करून कायद्याचा भेद करून हे धंदे चालवत आहेत. अनेक ठिकाणी सावकारांनी कर्जदारांच्या मुलींवर अतिप्रसंग केल्याचे, तसेच शेतकऱ्यांच्या बायका गहाण ठेवल्याचे आरोपही त्यांनी केले. आमदारांनी या प्रकरणात उच्च न्यायालयापर्यंत लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. ते म्हणाले, या आदिवासी गावात सावकार शेतकऱ्यांच्या शेती हडप करत आहेत.

जो सावकार पैशासाठी मुलीला विकायला लावतो, अशा सावकाराची मस्ती सरकारने उतरवावी. याशिवाय त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना या प्रकरणी लक्ष देण्याची आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची विनंती केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील तारापूर बोरखेड या आदिवासी बहुल गावातील सुनील बुरड या अवैध सावकारावर कठोर कारवाई करण्याची मागणी संजय गायकवाड यांनी जोरदारपणे केली आहे. या गंभीर प्रकरणावर राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनाने तत्काळ कारवाई करून न्याय दिला नाही तर याचा परिणाम सामाजिक अशांततेत होण्याची भीती आहे.

Amruta Fadnavis : फडणवीसांचं योगतत्त्व अमृतांच्या शब्दांत 

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर यांनी नागपुरातील धनवटे नॅशनल कॉलेजमधून पत्रकारिता व जनसंज्ञापन विषयात पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. 2023-24 मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी द लोकहित लाइव्ह येथे आपल्या करीअरला सुरुवात केली.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!