महाराष्ट्र

Chandrapur : विसरलेल्या शब्दांचे आवाज बनले ‘सुधीरभाऊ’

Sudhir Mungantiwar : मानधन वाढीतून सेनानींना मिळाला न्याय

Post View : 63

Author

चंद्रपूर जिल्ह्यातील लोकशाही सेनानींच्या मानधनवाढीसाठी केलेल्या संघर्षाला आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे न्याय मिळाला आहे.

‘सुधीरभाऊ नसते तर आमचा लढा विस्कृतिक गेला असता’ असा आवाज सध्या चंद्रपूर जिल्ह्यात ऐकू येत आहे. वारंवार विनंती केली, प्रयत्न केले पण दखल काही घेतली गेली नाही. मात्र ‘सुधीरभाऊ असताना चिंता कशाची’ असा सूर सध्या ऐकू येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील लोकतंत्र सेनानी यांच्या मानधन वाढीत गेल्या अनेक काळापासून समस्या सुरू होत्या. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर मतदारसंघाचे आमदार असलेले सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या संघर्षाला अखेर न्याय मिळवून दिलेला आहे. चंद्रपूरच्या मातीत आज (21 जून रोजी) एक अनोखा उत्सव साजरा झाला.

लोकतंत्र सेनानींच्या चेहऱ्यावर हास्य फुललं, डोळ्यांत आनंदाश्रू तरळले आणि मनात एकच भावना उमटली ‘सुधीरभाऊ, तुमच्याशिवाय हा लढा अधुरा राहिला असता’. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सेनानींच्या वर्षानुवर्षांच्या संघर्षाला न्याय मिळवून दिला आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांनी लोकतंत्र सेनानींच्या मानधन वाढीचा प्रश्न अखेर मार्गी लागला. हा विजय फक्त कागदोपत्री नाही, तर हजारो हृदयांना स्पर्श करणारा आहे. वर्षानुवर्षे चंद्रपूर जिल्ह्यातील लोकतंत्र सेनानी आपल्या हक्कांसाठी लढत होते. निवेदने दिली, आंदोलने केली, पण त्यांच्या व्यथेकडे कुणी कानाडोळा केला.

Sanjay Gaikwad : पैशासाठी मुली विकायला लावणाऱ्या सावकारांचा भांडाफोड

निराशेतील नवा प्रकाश

निराशेच्या काळोखात त्यांचा आवाज हरवत चालला होता. पण सुधीर मुनगंटीवार यांनी या उपेक्षितांच्या वेदनेला आपलंसं केलं. त्यांनी सेनानींच्या भावना विधानसभेत पोहोचवल्या आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न सोडवला. आज, 20 हजार रुपयांच्या सन्मान निधीच्या निर्णयाने सेनानींच्या आयुष्यात नवचैतन्य आलंय. या निमित्ताने चंद्रपूरच्या जनसंपर्क कार्यालयात सुधीर मुनगंटीवार यांचा सेनानी यांच्याकडून सत्कार करण्यात आला. चंद्रपूरच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या हृदयस्पर्शी भेटीत सेनानींनी सुधीरभाऊंचा सत्कार केला.

टाळ्यांच्या कडकडाटात आणि आनंदाश्रूंच्या साक्षीने त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. एका सेनानीने थरथरत्या आवाजात सांगितलं, आम्ही खूप प्रयत्न केले, पण कुणी ऐकलं नाही. सुधीरभाऊंनी आमची व्यथा समजली आणि आमच्या लढ्याला न्याय मिळवून दिला. त्यांच्याशिवाय आमचा लढा विस्मृतीत गेला असता. या शब्दांनी उपस्थितांचे हृदय हेलावून गेले. सुधीर मुनगंटीवार यांनी नेहमीच गरीब आणि उपेक्षितांसाठी आवाज उठवला आहे. मग ती विधानसभा असो वा कोणतंही व्यासपीठ. ते जनतेच्या प्रश्नांसह धडाडीने उभे राहतात.

Maharashtra : एचएसआरपी लावायची अंतिम घंटा वाजली

लढ्याला मिळाला न्याय

प्रसंगी ते म्हणाले, तुमचा लढा देशासाठी होता. त्याचा सन्मान व्हावा, हे माझं कर्तव्य होतं. तुमच्या उर्वरित मागण्यांसाठीही मी तुमच्यासोबत आहे. या शब्दांनी सेनानींच्या मनात विश्वास आणि आशेची पालवी फुलली आहे. हा क्षण केवळ मानधन वाढीपुरता मर्यादित नाही. हा एका नेत्याच्या जनतेशी असलेल्या नात्याचा उत्सव आहे. सुधीरभाऊंनी केवळ प्रश्न सोडवला नाही, तर हजारो सेनानींच्या हृदयात आदर आणि प्रेम कमावलं आहे. राज्यभरातील ४ हजार १०३ लोकतंत्र सेनानींना मिळालेला हा न्याय त्यांच्या प्रयत्नांचं फळ आहे. चंद्रपूरच्या रस्त्यांवर आज एकच चर्चा आहे. सुधीरभाऊ नसते, तर आमचा लढा कधीच हरला असता त्यांच्या या कार्याने पुन्हा एकदा सिद्ध झालं, की खरा नेता तोच, जो जनतेच्या हृदयात घर करतो.

Amruta Fadnavis : फडणवीसांचं योगतत्त्व अमृतांच्या शब्दांत 

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर यांनी नागपुरातील धनवटे नॅशनल कॉलेजमधून पत्रकारिता व जनसंज्ञापन विषयात पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. 2023-24 मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी द लोकहित लाइव्ह येथे आपल्या करीअरला सुरुवात केली.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!