प्रशासन

Operation Thunder : मारुती स्विफ्ट मध्ये स्मगलिंगचा स्पीड ब्रेकर

MD Drugs Bust : गुन्हेगारीच्या सावटावर नागपूर पोलिसांचा थंडर स्ट्राइक

Author

नागपूरमध्ये वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नागपूर पोलिसांकडून ‘ऑपरेशन थंडर’ मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत पोलिसांनी पुन्हा एकदा एमडी तस्करांवर कारवाई करत त्यांची तब्येत घेतली आहे.

नागपूरच्या गुन्हेगारी विश्वावर पोलिसांनी पुन्हा एकदा जोरदार कारवाई करत जबरदस्त धक्का दिला आहे. गुन्हेगारीच्या गडद सावल्यांवर आता ‘ऑपरेशन थंडर’चा वज्रप्रहार सुरू झालाय. नागपूर पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या नेतृत्वाखाली या मोहीमेअंतर्गत सुरू असलेल्या शिस्तबद्ध कारवायांनी शहरातील गुन्हेगारी जगतात खळबळ उडवून दिली आहे. नियम व सुव्यवस्थेचा बुलंद गजर करत पोलिस दलाने अमली पदार्थांच्या वाढत्या साखळीवर नियंत्रण मिळवण्याची गाठ बांधली आहे. गेल्या काही दिवसांत गुप्तचर यंत्रणांच्या माहितीवरून गांजा, एमडी ड्रग्ज यांची साखळी नागपूर आणि आजूबाजूच्या भागात वाढल्याचे दिसून आले.

नागपूर पोलिसांनी एका भयंकर गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश केला आहे. इमामवाडा पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाने अचूक आणि वेगवान कारवाई करत जाटतरोडी परिसरात एक कार अडवली. गुप्त माहितीनुसार, मुंबईहून येणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या मारुती स्विफ्ट कारमध्ये MD ड्रग्जची मोठी खेप नागपूरमध्ये येणार असल्याची बातमी पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी ट्रॅप लावून कार अडवली आणि चौकशी केली असता, जवळपास 240 ग्रॅम MD ड्रग्जसह तस्करीसाठी वापरली जाणारी कार जप्त करण्यात आली. ही कारवाई म्हणजे केवळ एक नोंद नाही, तर शहरातील गुन्हेगारी चक्राच्या मुळावर घातलेला घाव होता.

Chandrapur : विसरलेल्या शब्दांचे आवाज बनले ‘सुधीरभाऊ’

जुन्या आरोपींचा पर्दाफाश

पोलिसांनी केवळ अमली पदार्थच नाही, तर आरोपींचे मोबाईल फोन आणि इतर साधनेही ताब्यात घेतली आहेत. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत तब्बल 18 लाख 65 हजार 790 रुपये इतकी आहे. यामध्ये ड्रग्ज, गाडी व मोबाईल यांचा समावेश आहे. अटक केलेल्या आरोपींची पार्श्वभूमी देखील चिंताजनक आहे. निलेश देशमुख, प्रणय उर्फ सुमित गायधने, आशीष मडावी आणि शुभम उर्फ भूरया तिडके हे सर्वजण जुने ड्रग्स तस्कर असून त्यांच्या नावावर याआधीही गुन्हे दाखल आहेत. या चौघांनी ही खेप मुंबईहून नागपूरला एक दिवस आधी रस्त्याने आणली होती. विक्रीपूर्वीच पोलिसांनी त्यांना जेरबंद करून, त्यांच्या कारवायांवर पूर्णविराम दिला.

ही कारवाई म्हणजे नागपूर पोलिसांच्या धाडसी आणि नियोजनबद्ध कामगिरीचं प्रत्यक्ष उदाहरण आहे. ऑपरेशन थंडर अंतर्गत अशा अनेक कारवाया करण्यात येत आहेत. ज्या केवळ गुन्हेगारी रोखण्यासाठी नाहीत, तर शहराच्या शांततेचा आणि तरुणाईच्या भवितव्याचा बचाव करण्यासाठी आवश्यक ठरत आहेत. ऑपरेशन थंडर केवळ एक मोहीम नसून, ही नागपूर शहरातील कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी घेतलेली ठोस पावले आहेत. या कारवाईमुळे केवळ शहरातील नव्हे तर राज्यभरातील ड्रग्ज साखळीतील गुन्हेगारांच्या गोटात भीती निर्माण झाली आहे. नागपूर पोलिस दलाने दाखवलेली तत्परता आणि कुशलता निश्चितच शहरवासीयांसाठी आश्वासक आहे.

Yashomati Thakur : देवाभाऊ कर्जमाफीची ‘योग्य वेळ’ कधी येणार?

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!