महाराष्ट्र

Parinay Fuke : गोसेखुर्द प्रकल्पबाधित तरुणांना नोकरीचा मार्ग मोकळा

Bhandara : शासनाच्या नियमात अडकलेल्या स्वप्नांना आमदाराने दिले पंख

Post View : 36

Author

गोसेखुर्द प्रकल्पबाधित विद्यार्थ्यांच्या समांतर आरक्षणातील अडचणी दूर करण्यासाठी माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले आहे.

समस्यांच्या गुंतागुंतीच्या जाळ्यातून मार्ग काढत लोकांच्या अपेक्षांना उंच भरारी देणारे नेतृत्व राज्याच्या राजकारणात विरळाच आहे. भंडाऱ्याचे लोकप्रिय माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके हे त्यातलंच एक जिवंत उदाहरण. आमदार डॉ परिणय फुके हे केवळ राजकारणापुरते मर्यादित नाही, तर लोकांच्या संघर्षाशी जोडलेले आहे. गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर त्यांनी अनेकदा ठोस भूमिका घेतली आणि आता याच लढ्यातील एक मोठं यश त्यांच्या झोळीत पडलं आहे. गोसेखुर्द प्रकल्पातील प्रकल्पबाधित विद्यार्थ्यांनी 2023-24 मधील विविध स्पर्धा परीक्षांमधून यश संपादन केलं आहे.

महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांमध्ये त्यांच्या निवडी झाल्या आहेत. मात्र, ‘प्रकल्पग्रस्त समांतर आरक्षण’ अंतर्गत नियुक्ती मिळवताना एक अडचण त्यांच्या वाट्याला आली. यापूर्वी पुनर्वसन विभागाकडून मिळालेले 2.90 लाखांचं एकरकमी अनुदान हे त्यांच्यासाठी अडथळा ठरू लागले होते. नियम असा की, एकाच वेळी दोन शासकीय लाभ घेता येत नाहीत. यामुळे प्रकल्पग्रस्त म्हणून दिलं जाणारं प्रमाणपत्रच अडकवण्यात आलं. परिणामी, ज्या नोकरीसाठी या मुलांनी घाम गाळला, ती नोकरी मिळवताना आता मोठं संकट उभं राहिलं होतं. पण या तरुणांनी हार मानली नाही.

Vijay Wadettiwar : शेतकरीच तुमचे मूल्य शून्यावर आणणार

संवादात आभार व्यक्त

विद्यार्थ्यांनी शासनाकडे स्पष्टपणे सांगितले की, आम्ही घेतलेलं 2.90 लाख रुपयांचं अनुदान परत द्यायला तयार आहोत. पण आमचा नोकरीचा हक्क हिरावला जाऊ नये. या प्रामाणिक निर्धाराच्या मागे उभे राहिले माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके. गेल्या अनेक महिन्यांपासून ते सातत्याने या प्रकरणाचा पाठपुरावा करत होते. डॉ परिणय फुके यांनी या प्रकरणावर केवळ विभागीय पातळीवर पाठपुरावा केला नाही. तर थेट महाराष्ट्र विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडून हा विषय शासनाच्या निदर्शनास आणला.

पत्रव्यवहार, चौकशी अहवाल, तांत्रिक बाबी अशा सगळ्या टप्प्यांतून हा विषय मार्गक्रमण करत होता. या संघर्षाचे फलित आता मिळताना दिसत आहे. शासनस्तरावरून सकारात्मक हालचाली सुरू झाल्या आहेत. हे प्रकरण अंतिम टप्प्यात पोहोचले असून, लवकरच निर्णय होणार असल्याचे खात्रीपूर्वक सांगण्यात येत आहे. आता या संघर्षात वाटचाल करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नागपूर येथील डॉ. परिणय फुके यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि मनःपूर्वक आभार व्यक्त केले. संवादादरम्यान त्यांनी आपल्या भावना मोकळेपणाने मांडल्या. हा लढा केवळ एका प्रमाणपत्रासाठी नव्हता, तर आपल्या न्यायासाठी होता, असं या विद्यार्थ्यांचं स्पष्ट मत होतं.

Sunil Mendhe : लोकशाहीला बेड्या घालणारी इंदिरा गांधींची मानसिकता

संघर्षातून मिळाले न्याय

डॉ. परिणय फुके यांच्यासह या लढ्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री आशिष जैस्वाल यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या सर्वांच्या संयुक्त प्रयत्नातून गोसेखुर्द प्रकल्पबाधित तरुणांच्या भविष्यासाठी नवी दारं खुली होत आहेत. हे केवळ नोकरीचं प्रकरण नव्हतं. ही कहाणी आहे संघर्षाची, संधीच्या शोधाची आणि न्यायाच्या विजयाची, असं डॉ परिणय फुके यांनी यावेळी नमूद केलं. गोसेखुर्दच्या या तरुण स्वप्नांना आता न्याय मिळताना दिसत आहे. त्यांच्या या विजयाच्या कहाणीला भविष्यात अनेक प्रकल्पग्रस्तांसाठी प्रेरणादायी वळण मिळेल, यात शंका नाही.

Vijay Wadettiwar : मनुस्मृतीच्या सावलीत संविधानाचा दिवा लावण्याचं नाटक 

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित यांनी अनेक वर्ष सकाळ माध्यम समूहासोबत रिपोर्टर म्हणून काम केलं. साम टिव्हीचे ते रिपोर्टर होते. याशिवाय सरकारनामा या सकाळ समूहाच्या राजकीय वेब पोर्टलचे प्रतिनिधी देखील होते.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!