महाराष्ट्र

Nagpur : सरकारी फाइल्ससोबत बारमध्ये मद्यपान करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबनाचा फटका

Vijay Wadettiwar : शासनाची प्रतिष्ठा वाचवायची असेल तर शिस्त आणावी

Post View : 49

Author

नागपूरमधील एका बारमध्ये मद्यपान करताना शासकीय फायलींवर सह्या करताना आढळलेल्या गडचिरोलीच्या उपअभियंता देवानंद सोनटक्के याला निलंबित करण्यात आले.

नागपूरमधील कीर्ती बार अँड रेस्टॉरंट मध्ये सरकारी फायली हाताळताना आढळलेल्या उपविभागीय अभियंता देवानंद सोनटक्के याला अखेर निलंबित करण्यात आले आहे. चामोर्शी (गडचिरोली) येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी नागपूरच्या बारमध्ये मद्यपान करत असताना महाराष्ट्र शासनाच्या गोपनीय फायलींवर सह्या करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाने एकच खळबळ उडाली होती. या व्हिडीओ सोबतच बारमधील सीसीटीव्ही फुटेजही प्राप्त झाला आहे.

चौकशीत हे समोर आले की, फायली अधिकारी कार्यालयाबाहेर नागपूरपर्यंत नेऊन तपासत होता. या घटनेवर विरोधी पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर थेट सवाल उपस्थित केला आहे. नशेत असताना सरकारी फायलींवर सह्या कशासाठी? अशा प्रकारच्या घटनांची किती वेळा दखल घेतली जात नाही? एका अधिकाऱ्याला कार्यालयाबाहेर फायली नेण्याची, मग त्या मद्यपान करताना तपासण्याची हिंमत कशी झाली? असे विजय वडेट्टीवार यांनी कठोर शब्दात विचारले आहे. त्यांच्या मते, ही घटना फक्त एका व्यक्तीची चूक नाही तर यामागे संस्थात्मक दोषही पाहिले जाणे गरजेचे आहे.

Bacchu Kadu : शेतकऱ्यांना गिळणाऱ्या ‘नागनाथी’ सरकारच्या भ्रष्टाचाराचे पाळंमुळं उपटू

गोपनीयतेवर गंभीर आक्षेप

शासनाने या प्रकारामुळे संबंधित अधिकाऱ्यावर तातडीने कारवाई करून चौकशीचे आदेश दिले. ज्यामध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही तपासासाठी आदेश दिले. गडचिरोली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता नीता ठाकरे यांनी अधिकृतपणे सांगितले की, संबंधित अधिकारी चामोर्शी येथील असून त्याच्यावर शिस्तभंगाच्या गंभीर आरोपांवर निलंबनाचे आदेश शासनाकडून दिले गेले आहेत. या घटनेमुळे शासनाच्या गोपनीयतेच्या नियमांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.  शासकीय कागदपत्रे अत्यंत गोपनीय व संवेदनशील मानली जातात.

अशा दस्तऐवजांवर सार्वजनिक ठिकाणी, तेही मद्यपान करताना सह्या करणे हे अत्यंत गंभीर शिस्तभंग मानले जाते. त्यामुळे देवानंद सोनटक्के यांच्यावर केवळ निलंबनाचा उपाय न करता, त्यांच्याविरुद्ध सखोल आणि व्यापक चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अधिकार्‍याच्या वर्तनामुळे प्रशासनाच्या पारदर्शकतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शासनातर्फे याकडे मोठ्या गांभीर्याने पाहिले जात असून, पुढील तपशील चौकशीनंतर सार्वजनिक होण्याची शक्यता आहे. नागपूरतील बारमध्ये घडलेल्या या घटनेमुळे शासकीय कामकाजाची स्वच्छता आणि जवाबदारीवर प्रश्न उपस्थित होत आहेत, जे सरकारी यंत्रणेत सुधारणा आणण्यासाठी एक गंभीर इशारा आहे.

Anil Deshmukh : राज्यात जन सुरक्षेच्या नावाखाली दडपशाही सुरू

अभिजित कराळे | Abhijeet Karale

अभिजित कराळे | Abhijeet Karale

पत्रकारिता, बातम्या हा अभिजित यांच्या आवडीचा विषय. पत्रकारितेचा कोर्स केला नसला तरी त्यांनी न्यूज रिपोर्टिंगच्या आवडीतून त्यांनी आपलं लेखन कौशल्य विकसित केलं. ‘द लोकहित लाइव्ह’च्या माध्यमातून त्यांनी पत्रकारितेतील आपला प्रवास सुरू केला. पुण्यातून त्यांनी संगणशास्त्र, वेब डेव्हलपमेंट, कॉम्प्युटर प्रोग्रामिंगचे शिक्षणही पूर्ण केले आहे.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!