महाराष्ट्र

Maharashtra : अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांवर नुकसान भरपाईचा पाऊस

Chandrashekhar Bawnkule : बळीराजाच्या अश्रूंवर महसूल मंत्र्यांचा दिलासा

Post View : 33

Author

महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंचनामे करून भरपाई देण्याचे निर्देश दिले आहेत.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा नेहमीच चर्चेत आहे. मात्र सत्ताधारी सरकारने अद्याप कोणतीही ठोस योजना राबवली नसल्याने शेतकरी अनेकदा संकटात पडत आहेत. दरम्यान, काही शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखे गंभीर पाऊल उचलल्याचे वृत्त देखील समोर येत आहे. विरोधक या मुद्यावर सतत टीका करत असतात. मात्र सरकारकडून कर्जमाफीबाबत नेमके काही ऐकायला मिळालेले नाही. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यापूर्वी सांगितले होते की, योग्य वेळ येताच शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल. मात्र, योग्य वेळ कधी येईल, यावर आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

अशातच, संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले आहे. ज्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. विशेषतः विदर्भातील मुसळधार पावसामुळे शेतमाल आणि पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिलासादायक वक्तव्य केले आहे. नागपूर येथे नियोजन भवनात रविवारी नागरिकांशी संवाद साधताना बावनकुळे म्हणाले की, राज्यातील ज्या ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे, तिथे पंचनामे करून एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या निकषांनुसार शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे निर्देश दिले आहेत.

Chandrashekhar Bawankule : भाजप जिंकलं, चोरीचं नाव, काँग्रेस जिंकलं, जनतेचा ठाव?

भाजपची निवडणूक तयारी

नागरिकांचे निवेदन त्वरित संबंधित अधिकाऱ्यांना पाठवण्याचेही आदेश त्यांनी दिले. जेणेकरून नुकसान भरपाईसाठी लवकरात लवकर पावले उचलली जावीत.  मुसळधार पावसामुळे विदर्भासह राज्यातील अनेक भागात पिकांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बावनकुळे यांनी सांगितले की, सरकारने ज्या भागात नुकसान झाले आहे, तिथे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी, यासाठी संबंधित विभागांनी काम सुरू केले आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात दिलासा जाणवेल असे अपेक्षित आहे. 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींसाठी भाजपची तयारी विचारल्यावर बावनकुळे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवी चव्हाण आणि ते स्वतः महाराष्ट्र दौऱ्यात महायुतीसोबत निवडणूक लढवण्याच्या सूचना देत आहेत. जिथे शक्य नाही, तिथे स्थानिक नेत्यांनी निवडणूक सौहार्दपूर्ण पद्धतीने लढवाव्यात आणि महायुतीला कोणतेही नुकसान होऊ नये, याची दक्षता घ्यावी लागेल.विरोधकांकडून मतचोरीचे आरोप आल्याबाबत बावनकुळे यांनी काँग्रेसला आवाहन केले की, त्यांनी लगेचच मतदार यादी तपासावी. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक  विधानसभा मतदार यादीच्या आधारे होणार आहेत. त्यामुळे कोणत्याही आक्षेपास पात्र असल्यास ते वेळेवर मांडावे. निवडणूक हरल्यानंतर दोष मतदार यादीवर टाकण्याचा प्रयत्न करणे चुकीचे ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Nagpur : एआय वापरून गुन्ह्याचा मागोवा घेण्यात उपराजधानीला यश

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!