महाराष्ट्र

Bhandara : ‘किधर है…?’च्या तालावर काँग्रेसची हाक

Mukund Sakharkar : विकासाच्या मुद्द्यावर ज्वलंत व्हिडीओ

Post View : 81270

Author

देशभरात काँग्रेसच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना, भंडारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मुकुंद साखरकर यांचा डान्स करत शहरातील समस्यांवर भाष्य करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

Question On Development : देशभरात काँग्रेसची राजकीय घसरण सुरू असल्याची चर्चा असतानाच भंडारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मुकुंद साखरकर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या तुफान व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओत स्वत: साखरकर नृत्य करताना दिसतात. या व्हिडीओतून साखरकर यांच्याकडून भंडारा शहरातील मूलभूत सुविधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. त्यामुळे हा व्हिडीओ सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

व्हिडिओमध्ये “किधर है सड़क?”, “किधर है ड्रेनेज?”, “किधर हैं डॉक्टर?”, “किधर हैं शिक्षक?” आणि “किधर है विकास?” असे प्रश्न विचारण्यात आले आहेत. हा व्हिडीओ म्हणजे केवळ मनोरंजानासाठी नाही तर भंडारा शहरातील नागरिकांच्या संतापाच्या भावना त्यातून व्यक्त झाल्याचा दावा करण्यात होत आहे. नागरिकांनी कर भरला, मतदान केले, विश्वास ठेवला; मात्र बदल्यात खराब रस्ते, तुंबलेल्या नाल्या, अपुऱ्या आरोग्य सुविधा आणि इतर मूलभूत समस्याच मिळाल्याचा आरोपही आता यामुळे होत आहे.

Anil Deshmukh : पेपर फुटीविरोधातील आंदोलनाला पाठिंबा

वाली कोण?

व्हिडीओच्या शेवटी “सवाल जनता का है… जवाब प्रशासन को देना ही होगा!” असा संदेश देत शहरातील प्रश्न सातत्याने मांडण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. पूर्व विदर्भातील भंडारा हा मातब्बर नेत्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले याच जिल्ह्याचे. भंडाऱ्याच्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोहोच असलेल्या नेत्यांच्या जवळचे पुढारीही भंडाऱ्याचेच. त्यानंतरही भंडाऱ्याचे नाव बदलून आता ‘भंगारा’ करण्याची वेळ आल्याच सत्य या व्हिडीओतून पुढे आल्याचे बोलले जात आहे.

राजकारणात टीका टीप्पणीचे भाषण करीत बसण्यापेक्षा आता रील, डान्स आणि ट्रेंडिंग म्युझिकच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचण्याची नवी पद्धत स्वीकारली जात असल्याचे साखरकर यांच्या या व्हिडीओतून बघायला मिळत आहे. भंडाऱ्यात खरोखर विकास झाला का, हा मुद्दा वादाचा ठरू शकतो. परंतु सध्या तरी साखरकर यांच्या या व्हिडीओची नागरिकांमध्येही चर्चा रंगली आहे. विकासाची उत्तरे रीलमध्ये मिळणार की प्रत्यक्ष कामांमधून? “किधर है?” या प्रश्नापेक्षा “कब मिलेगा?” हा प्रश्न आता अधिक महत्त्वाचा ठरत आहे.

मुकुंद साखरकर यांच्या या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी याला जनजागृतीचा अभिनव प्रयत्न म्हटले आहे, तर काहींनी काँग्रेसच्या बदलत्या प्रचारशैलीवर मत व्यक्त केले आहे. राजकीय वातावरण तापवणारा हा व्हिडीओ आगामी स्थानिक राजकारणात चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र सध्या हा व्हिडीओ भंडाऱ्याच्या कानाकोपऱ्यात पाहिला जात आहे, ही वास्तविकता नाकारून चालणार नाही.

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित यांनी अनेक वर्ष सकाळ माध्यम समूहासोबत रिपोर्टर म्हणून काम केलं. साम टिव्हीचे ते रिपोर्टर होते. याशिवाय सरकारनामा या सकाळ समूहाच्या राजकीय वेब पोर्टलचे प्रतिनिधी देखील होते.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!