महाराष्ट्र

फुकेंच्या एन्ट्रीने Bhandara Pauni मध्ये भोंडेकरांना नवसंजीवनी

भाजपचा वजनदार नेता अखेर Mahayuti सोबत आलाच

Share:

Author

भंडारा-पवनी मतदारसंघातील लढत रंगतदार होत आहे. नरेंद्र भोंडेकर यांच्यासाठी शिंदे पितापुत्रांनी जोर लावला आहे. आता भाजपचे वजनदार नेता परिणय फुके हे देखील प्रचारात उतरले आहेत.

Maharashtra राज्यात सध्या विधानसभा निवडणूक काही तासांवर आली आहे. अशा परिस्थितीत सगळेच नेते प्रचारात व्यस्त आहेत. भंडारा जिल्ह्यातही प्रचाराचा धुराळा उडत आहे. परगावी दर्शनाला जाऊन कितीही ‘देव’ प्रसन्न केले तरी ग्रामदेवतेची साथ ही लागतेच. ग्रामदेवता प्रसन्न झाल्याशिवाय काही कार्य होत नाहीत. इच्छित फळ मिळत नाही. ही बाब अखेर भंडारा-पवनी मतदारसंघाचे उमेदवार नरेंद्र भोंडेकर यांना उमजली आहे.

विद्यमान आमदार नरेंद्र भोंडेकर हे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार आहेत. त्यांच्या यशासाठी मुख्यमंत्री Eknath Shinde आणि खासदार Shrikant Shinde पितापुत्रांनी धुनष्याची प्रत्यंचा ताणली आहे. पण आता भोंडेकर यांचे बळ दुप्पट झाले आहे. त्याला कारणही तसेच आहे. भाजपचे वजनदान नेते तथा उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची नीकटवर्तीय असलेले माजी राज्यमंत्री आमदार डॉ. परिणय फुके आता प्रचारात उतरले आहेत.

प्रचाराचे Mission Successful

आमदार डॉ. परिणय फुके यांची नाराजी दूर करण्यात आमदार नरेंद्र भोंडेकर यांना अखेर यश आले आहे. त्यामुळे दाढीवाल्या ठाणेकरांबरोबर आता डॉ. फुके यांचे देखील पाठबळ भोंडेकर यांना मिळाले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात भोंडेकर यांना नवसंजीवनी मिळाली आहे. डॉ. फुकेंच्या एन्ट्रीने भोंडेकरांचे पारडे आणखी जड झाले आहे.

16 नोव्हेंबरला भंडारा शहरातील शास्त्री चौकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदें यांनी सभा घेतली. सभेत त्यांनी नरेंद्र भोंडेकर यांचा जोरदार प्रचार केला. या सभेच्या स्टेजवर श्रीकांत शिंदे यांच्याबरोबर भाजप नेते आमदार डॉ. परिणय फुके हे देखील दिसले. ज्या फुकेंनी आतापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्या प्रत्येक सभेला पाठ दाखिविली, ते स्टेजवर दिसल्याने सगळ्यांनी ‘जमलं राजे हो आता’ अशी प्रतिक्रिया दिली. Narendra Bhondekar and Parinay Fuke came together to increase the strength of the Mahayuti In Bhandara district.

डॉ. फुके 8 नोव्हेंबरला भंडाऱ्यात होते. त्यावेळी पवनीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होती. सभेला हजर राहण्यात डॉ. फुके यांनी स्वारस्य दाखविले नाही. मात्र आता डॉ. परिणय फुके भोंडेकर यांच्या स्टेजवर दिसले आहेत. त्यामुळे राजकीय जाणकार भोंडेकर यांचे वजन वाढल्याचे ठामपणे सांगत आहेत. फुके-भोंडेकर वादात खासदार श्रीकांत शिंदें यांची भूमिका तोडगा काढणारी ठरली आहे. श्रीकांत शिंदे अखेर फुकेंना भोंडेकरांच्या स्टेजवर घेऊन आलेच. यामुळे जे बापाला जमले नाही ते लेकाने करून दाखविले, अशी चर्चा भंडाऱ्यातील राजकारणात रंगली आहे.

Full Support मिळणार

आतापर्यंत नाराज असलेले आमदार डॉ. परिणय फुके हे आता प्रचारात आले आहेत. त्यांची नाराजी दूर होणे भोंडेकरांच्या फायद्याची ठरली आहे. डॉ. परिणय फुके यांनीही मोठेपणा दाखवत जाहिर सभेत साळे-भाटव्याचे संबध जोडले. त्यातून त्यांनी वादावर पडला टाकला आहे. आपण आता भोंडेकरांना निवडून आणण्यास सर्व प्रयत्न करु, अशी जाहिर सभेत कबुलीही त्यांनी दिली आहे.

ठाकचंदची Tumsar Mohadi मध्ये ‘ठाकूर’की

आतापर्यंत पडद्यामागे असलेले भाजप नेते आता खऱ्या अर्थाने मैदानात उतरले आहेत. डॉ. परिणय फुके, माजी खासदार सुनील मेंढे भोंडेकरांचा प्रचारात दिसू लागले आहेत. मतदारसंघात भाजपची 90 हजार कार्यकर्त्यांची फौज आहे. संभ्रमात असलेले भाजप कार्यकर्ते फुकेंच्या एन्ट्रीने भोंडेकरांच्या पाठिशी आले आहेत. 90 टक्के भाजप कार्यकर्त्यांचा पाठिंबा भोंडेकराना मिळाला आहे. त्यामुळे साहजिकच भोंडेकरांचे पारडे जड झाले आहे. भंडारा-पवनी मतदारसंघात भोंडेकरांमुळे का होईना डॉ. परिणय फुके व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. त्यामुळे भंडाऱ्याची लढत पुन्हा एकदा रंगतदार ठरत आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!