महाराष्ट्र

साधेपणाचा पुन्हा एकदा Chief Minister देवाभाऊंनी दिला परिचय

पुष्पगुच्छ, मानवंदना याला दिला पुन्हा एकदा फाटा

Post View : 24

Author

Views: 25733

मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी बडेगावपणाला फाटा दिला आहे. आपल्या साधेपणाचा परिचय त्यांनी दिला आहे.

देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांकडून पालन करण्यात येणाऱ्या काही राज्य शिष्टाचाराला फाटा दिला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून याबाबत सर्व अधिकाऱ्यांना सक्त सूचना दिली आहे. त्यानुसार मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांनी सोबत पुष्पगुच्छ आणू नये, असे आदेश देण्यात आले आहेत. इतकेच नव्हे तर एखाद्या जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर मंत्र्यांना पोलीस दलाकडून मानवंदना दिली जाते. ही मानवंदना देखील देण्यात येऊ नये, असे आदेश देण्यात आले आहेत.

देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी बडेजावपणाला तिलांजली दिली होती. मुख्यमंत्री असताना नेत्याच्या टाक्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यापासून सगळेच अधिकारी असतात. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर वारंवार अधिकाऱ्यांना ताफ्यामध्ये येण्याची गरज नाही, असे आदेश दिले होते. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा असते. मात्र मुख्यमंत्री झाल्यानंतर सगळ्यात छोटा ताफा असलेले नेते म्हणून देवेंद्र फडणवीस नवा रुपाला आले होते. यंदाही काहीसे असेच चित्र दिसणार आहे.

Show Off नको 

कोणत्या जिल्ह्यामध्ये दौऱ्यावर गेल्यानंतर मंत्र्यांची बडदास्त ठेवण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांवर असते. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी या प्रथेला बंद केले होते. नागपूर शहरात दर शनिवारी आणि रविवारी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना दौऱ्यावर यायचे. यावेळी वाहतूक सिग्नल देखील बंद करण्यात येत नव्हते. मात्र आता देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेमध्ये आणखी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्यात आपल्यासाठी सिग्नल यंत्रणा बंद केली जाण्याची शक्यता आहे.

गडचिरोलीतून खंडणी गोळा केल्याची Sanjay Raut यांची टीका

देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या पत्रानंतर काही मंत्र्यांनी त्यांचा कित्ता गिरवला आहे. भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी देखील असेच पत्र अधिकाऱ्यांना दिले आहे. नितेश राणे यांनी देखील अधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ आणू नये, असे आदेश दिले आहेत. वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाणाऱ्या मंत्र्यांना राजशिष्टाचारानुसार पोलीस दलाकडून सलामी दिली जाते. आतापर्यंत थंडी, ऊन, पाऊस आणि वारा यामुळे काही मंत्र्यांनी पोलिसांबद्दल माननीय दृष्टिकोन ठेवला. त्यामुळे त्यांनी प्रसंगी सलामी घेणे टाळले. आता देवेंद्र फडणवीस हे देखील मुख्यमंत्री असेपर्यंत सलामी स्वीकारणार नाहीत.

सुरक्षेच्या नियमाप्रमाणे मात्र देवेंद्र फडणवीस यांच्यात आपल्यामध्ये पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या कायम ठेवण्यात येणार आहे. सध्या फडणवीस यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा आहे. याशिवाय त्यांना अत्याधुनिक शस्त्र धारण केलेल्या कमांडोंची सुरक्षा देखील पुरवण्यात आली आहे. या सुरक्षेमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!