महाराष्ट्र

नातेवाईकांसाठीच Bhandara मधील Job Scam बद्दल लोकप्रतिनिधी गप्प

शंभरावर जागांसाठी भरती करणाऱ्या Agency कडे डोळेझाक

Post View : 14

Author

भंडारा जिल्ह्यात मोठा नोकर भरती घोटाळा होत आहे. एका एजन्सीच्या माध्यमातून हा कोट्यवधी रुपयाचा घोळ करण्यात येत आहे. यातून अनेक राजकीय लोकप्रतिनिधींच्या नातेवाईकांना कायमस्वरूपी नोकरी लागणार आहे.

आपल्या जवळच्या नातेवाईकांना कायमस्वरूपी नोकरी मिळावी म्हणून भंडारा जिल्ह्यातील नोकर भरतीकडं दुर्लक्ष केलं जात आहे. राजकीय नेत्यांकडून भरती घोटाळ्याबद्दल मौन बाळगण्यात येत आहे. सुमारे शंभरावर जागांसाठी भंडारा जिल्ह्यात नोकर भरती करण्यात येत आहे. ही नोकर भरती पूर्णपणे ‘फिक्स’ करण्यात आली आहे. एका एजन्सीच्या माध्यमातून पैसा गोळा करण्यात येत आहे. पैसे देणाऱ्या उमेदवाराला कायमस्वरूपी नोकरी देण्यात येणार आहे. या वसुलीचं काम ‘कैलास’वर बसून गोळा केला जात आहे. पैसे वसूल करणाऱ्या दुसऱ्याला ‘अभय’ दिलं जात आहे.

केवळ ‘द लोकहित लाइव्ह’नं या भरती घोटाळ्याचा पर्दाफाश केला. भरतीची प्रक्रिया सुरू आहे. मात्र निवडण्यात आलेल्या उमेदवारांची अंतिम यादी आधीच तयार झाली आहे. ही ‘कन्फर्म’ याची ‘द लोकहित लाइव्ह’च्या जवळ आहे. अत्यंत जबाबदारीनं हे वृत्त प्रकाशित झाल्यानंतरही भंडारा जिल्ह्यातील अनेक राजकीय लोकप्रतिनिधी गप्प आहेत. त्यांचेच नातेवाईक या नोकर भरतीमध्ये कामावर लागणार आहेत. त्यामुळं सगळंकाही ठाऊक असतानाही या भ्रष्टाचाराकडं डोळेझाक केली जात आहे. बेरोजगारांच्या समस्येपेक्षा या लोकप्रतिनिधींना आपल्या नातेवाईकांच्या नोकरीची चिंता अधिक आहे.

भाऊ!! Bhandara मध्ये नोकरी हवी? 40 लाख तयार ठेव

नेत्यांची भूमिका We Don’t Care

भंडाऱ्यात सुरू असलेल्या या मेगा नोकर भरती घोटाळ्याकडं स्वार्थामुळं नेते शांत बसले आहेत. नेत्यांकडूनच एजन्सीला उमेदवारांकडून पैसे गोळा करण्यास सांगण्यात येत आहे. आपल्या नातेवाईकांकडं थेट पैशांची मागणी करता येत नसल्यानं नेत्यांनीही एजन्सीला पुढं केलं आहे. ‘द लोकहित लाइव्ह’ लवकरच हा भरती घोटाळा कुठं सुरू आहे, याचा ठोस पुरावा आणि यादीसह योग्य क्षणी पर्दाफाश करणार आहे. या भरतीतून बेरोजगारांची मोठ्या प्रमाणावर फसवणूकही होत आहे. नोकरीच्या नावाखाली बेरोजगार तरूणांकडून मोठी रक्कम वसूल केली जात आहे.

तरुणांकडून वसूल करण्यात आलेल्या पैशांच्या मोबदल्यात त्यांना नोकरीची हमी दिली जात आहे. परंतु ही रक्कम घेताना नोकरी न मिळाल्यास काही टक्केवारी कपात करण्यात येणार असल्याचंही सांगण्यात येत आहे. ज्या ठिकाणी नोकरी भरती होत आहे, तो विभाग ‘नोटांशी’ संबंधित आहे. त्यामुळं नोटांशी संबंधित विभागात काम मिळवायचं असेल तर नोटा मोजाव्या लागतील, असं सांगितलं जात आहे. त्यामुळं ‘अभय’ मिळालेले दोन लोक ‘कैलास’ मार्गे सध्या मोठ्या प्रमाणावर नोटांचे बंडल गोळ्या करण्यात गुंतले आहेत. या दोघांना राजकीय नेते ही ‘सहकार’ करीत आहेत.

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित यांनी अनेक वर्ष सकाळ माध्यम समूहासोबत रिपोर्टर म्हणून काम केलं. साम टिव्हीचे ते रिपोर्टर होते. याशिवाय सरकारनामा या सकाळ समूहाच्या राजकीय वेब पोर्टलचे प्रतिनिधी देखील होते.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!