महाराष्ट्र

हे बावनकुळे नाहीत तर रावनकुळे, Sanjay Raut यांची टीका 

ईडी, सीबीआयच्या भीतीने Eknath Shinde पळून गेले 

Post View : 44

Author

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आदित्य ठाकरे यांचा बालिश राजकारणी म्हणून उल्लेख केला. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत चांगलेच संतापले आहेत. 

राज्याचे महसूल मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर तिखट टीका केली होती. आदित्य ठाकरे हे बालिश राजकारणी आणि उद्धव ठाकरे बिनडोक नेते, असल्याचे बावनकुळे म्हणाले होते. या टिकेवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर पलटवार केला आहे.

संजय राऊत म्हणाले, कोण आहेत बावनकुळे? ज्यांनी 600 कोटींचा भूखंड एक रुपयाला घेतला आणि महाराष्ट्र लूटला, हे तेच बावनकुळे आहेत ना. अशाप्रकारे महाराष्ट्राला लुटण्याचा बालिशपणा आम्ही करणार नाही. ईडी आणि सीबीआय कुठे आहे? या माणसाला अटक करण्यात आली पाहिजे. फडणवीस यांनी त्यांना महसूलमंत्री बनवले कसे. फडणवीस यांनी हा गुन्हा केला आहे. बावनकुळे तुम्ही 600 कोटींचा भूखंड एक रुपयाला घेतला. आम्हाला मिळणार का? कोण हे बावनकुळे, हे बावनकुळे नाहीत तर रावणकुळे आहेत.” त्यांना ताबडतोब अटक केली पाहिजे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

Chandrashekhar Bawankule म्हणाले, वडील बिनडोक तर मुलगा बालिश

एकनाथ शिंदेंवर टीका

एकनाथ शिंदे हे काही शिवसेनाप्रमुख नाहीत किंवा शिवसेनाप्रमुखांचे वारसदार सुद्धा नाहीत. एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक ईडी, सीबीआयच्या भितीमुळे पळून गेलेले आहेत. शिंदेंच्या भाषणाकडे फार लक्ष देऊ नका. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. कधी एक पुस्तक तरी वाचलंय का? पेपर तरी वाचतो का हा माणूस, असा शब्दांत राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वबळावर लढण्यासाठी मनगटात ताकद लागते, घरात बसून निवडणूक जिंकता येत नाही, असा टोला उद्धव ठाकरेंना लगावला. यावर प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत म्हणाले की, आम्ही तुमच्यासारखी लाचारी पत्करली नाही. नरेंद्र मोदी आणि अमित शाह महाराष्ट्राचे शत्रू आहेत. शिंदे यांनी लाचारी पत्करणं म्हणजे औरंगजेबाच्या दरबारात त्याच्यापुढे मुजरे घालण्यासारखे असल्याची टीका राऊत यांनी केली आहे. तुमची सत्ता आणि प्रतिष्ठा कायम राहणार नाही. तुम्ही तात्पुरतेच आहात. ज्यांनी ही पदे तुम्हाला दिली तेच तुमची पदे काढून घेणार. तुमच्यातीलच लोक तुमच्या उरावर बसवतील. आमची मनगटं आम्ही बघू, तुमच्यावर मनगटं चावण्याची वेळ येणार आहे. तुमच्यासारखी आम्ही लाचारी पत्करली नाही, अशा शब्दांत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!