
अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. पुणे पोलीस आयुक्तांनी त्यांच्या वक्तव्याला क्लीन चीट दिल्याने अमोल मिटकरी संतापले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत अभिनेते राहुल सोलापूरकर वादग्रस्त वक्तव्य केले होते. राहुल सोलापूरकर यांना पुणे पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे. या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आणि प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना खुले आव्हान दिले आहे.
आमदर अमोल मिटकरी यांनी ट्विटरवरून (X) पोलिस आयुक्तांना उद्देशून लिहिले की, “छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यातून सुटताना औरंगजेबाच्या पत्नीला लाच देऊन सुटले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे रामजी संकपाळ यांना दत्तक गेले होते आणि कर्माने ब्राह्मण होते, हे सिद्ध करावे. त्यानंतरच तुम्ही सोलापूरकर यांची पाठराखण करावी, असे मिटकरी म्हणाले आहेत.

https://x.com/amolmitkari22/status/1889878028752437476?t=tlbEBj2J6W1wFOGz4VAedA&s=19
विवादाचे कारण
शिवाजी महाराज हे आग्र्यातून सुटताना एका पेटाऱ्यात लपून नव्हे, तर त्यांनी औरंगजेबाच्या लोकांना आणि त्याच्या पत्नीला लाच देऊन सुटका करून घेतली, असे विधान राहुल सोलापूरकर यांनी एका मुलाखतीदरम्यान केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर महाराष्ट्रभर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. सोलापूरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.
अमोल मिटकरी यांनी या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. सोलापूरकर यांच्यावर तातडीने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा,” अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना टॅग करत अमोल मिटकरी यांनी केली आहे.
आणखी एक महिला अधिकारी IAS Puja Khedkar यांच्यानंतर वादाच्या भोवऱ्यात
आंदोलनाला पाठिंबा
अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेर शिवप्रेमींनी आंदोलन छेडले होते. या आंदोलनाला पाठिंबा देत मिटकरी म्हणाले की, सोलापूरकर नावाच्या विकृत व्यक्तीने छत्रपती शिवरायांचा केलेला एकेरी उल्लेख आणि इतिहासाचे विकृतीकरण केल्याच्या निषेधार्थ पुण्यातील शिवभक्तांनी केलेल्या आंदोलनाचे मी समर्थन करतो.
या प्रकरणावरून राज्यात मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया उमटत आहेत. राहुल सोलापूरकर यांना पुणे पोलिसांची क्लीन चिट दिली. पुणे पोलिसांच्या या निर्णयावर शिवप्रेमी समुदाय नाराज झाला आहे. आता पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या विरोधात कायदेशीर आणि सामाजिक पातळीवर आंदोलन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मिटकरींसह काही नेत्यांनी या निर्णयाच्या विरोधात आवाज उठवला आहे. तर काहींनी सोलापूरकर यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. आता पुण्यातील शिवभक्तांची प्रतिक्रिया काय असेल आणि पोलिसांच्या निर्णयामुळे वातावरण आणखी तापते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.