महाराष्ट्र

Nana Patole : अदानीला कोटींचे कंत्राट पण शेतकऱ्यांना केवळ आश्वासनं

Congress : भाजपची कर्जमाफी म्हणजे फसवणुकीचा पॉलिटिकल वचननामा

Post View : 34

Author

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी सात दिवसांपासून सुरू असलेले बच्चू कडू यांचे अन्नत्याग उपोषण स्थगित झाले असले, तरी हा मुद्दा अद्यापही पेटता आहे. यावरून नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांवर तीव्र शाब्दिक हल्ला चढवला आहे.

शेतकरी गरीब नाही तर गरजू आहे. आणि गरजूंना मदत करणे हे सरकारचे कर्तव्य आहे, अशी आक्रमक भूमिका घेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. अन्नत्याग आंदोलनाच्या सातव्या दिवशी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आपले उपोषण स्थगित केले असले तरी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांची तीव्रता मात्र अद्यापही कायम आहे. राज्यातील हजारो शेतकरी सध्या अस्मानी व सुलतानी संकटाच्या कातडीत अडकले आहे. निसर्गाच्या कोपापासून ते कर्जाच्या जोखडापर्यंत प्रत्येक टप्प्यावर त्यांना संकटांचा सामना करावा लागत आहे.

अशा वेळी त्यांचं सातबारा कोरं करून त्यांना नवा श्वास देणं, ही शासनाची नैतिक जबाबदारी आहे. पण दुर्दैवाने, शासनात असलेल्या काही मंत्र्यांकडून गरजूंनाच मदत असे वक्तव्य करून शेतकऱ्यांची थट्टाच केली जात आहे, असा घणाघात नाना पटोले यांनी केला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे फक्त गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी असं विधान म्हणजे शेतकऱ्यांचा अपमानच असल्याचं पटोले म्हणाले. ते म्हणाले, कर्जमाफीची घोषणा करताना कुठल्याही समितीचा उल्लेख भाजपाने केला नव्हता. आता मात्र आश्वासन दिल्यानंतर विविध निकष आणि अटी घालून शेतकऱ्यांना मूळ मुद्द्यापासून दूर केलं जात आहे.

Congress : आश्वासनं पूर्ण करा, नाहीतर खुर्च्या रिकाम्या करा 

महाविकासने दिली साथ

शेतकऱ्यांवर उपकार करण्याची भावना ठेवून मदत केली जात नाही, तर ती त्यांची हक्काची मागणी आहे. नाना पटोले यांनी भाजपाच्या उद्योगधंद्यांसाठी असलेल्या धोरणांवरही सवाल उपस्थित केला. अदानी समूहासाठी नियम झुकवले जातात. प्रकल्पांचे कंत्राट वाढवले जाते, हजारो कोटींची सवलत दिली जाते, मग शेतकऱ्यांसाठीच नियम कडक का ठेवले जातात? हेच भाजपाचं दुटप्पी धोरण असून त्यातूनच त्यांच्या शेतकरीविरोधी भूमिकेची पोलखोल होते, असे ते म्हणाले. नाना पटोले यांनी यूपीए सरकारच्या काळात झालेल्या ऐतिहासिक कर्जमाफीची आठवण करून दिली. डॉ. मनमोहनसिंह आणि काँग्रेस सरकारने कोणताही गाजावाजा न करता ७० हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली होती.

महाविकास आघाडी सरकारनेही अटी-शर्तीशिवाय सरसकट मदत केली. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याची दानत काँग्रेसने वेळोवेळी दाखवली आहे, असं सांगताना त्यांनी सध्याच्या सरकारच्या खोट्या गाजरांची आठवणही करून दिली. मेघा इंजिनिअरिंगसारख्या कंपन्यांना 3 हजार कोटींचं वाढीव कंत्राट सरकारकडे देण्यास पैसे असतात. पण जे हातात नांगर आणि डोक्यावर उन्हं घेऊन जगाला अन्न देतात, त्या शेतकऱ्यांसाठी मात्र सरकारला काहीच देता येत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. या संपूर्ण पार्श्वभूमीतून, पटोले यांचा स्पष्ट संदेश असा की, शेतकरी कोणत्याही पक्षाचा नसतो, तो फक्त देशाचा असतो. त्याच्या मागे उभं राहण्याची जबाबदारी राजकीय पक्षांवर आहे. सरसकट कर्जमाफी देऊन शेतकऱ्याला कर्जाच्या विळख्यातून मुक्त करा, असा पुन्हा एकदा स्पष्ट संदेश त्यांनी राज्य सरकारला दिला आहे.

Congress : आश्वासनं पूर्ण करा, नाहीतर खुर्च्या रिकाम्या करा 

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!